Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू या पाच राज्यांच्या विधानसभेचा निकाल काल जाहीर झाला. भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक मुसंडी मारली. तब्बल 15 वर्षांच्या तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला धक्का देत भाजपनं बंगालमध्ये स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला. पश्चिम बंगालमधला हा विजय भाजपसाठी अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक मानला जातोय. याशिवाय पश्चिम बंगालप्रमाणे तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षानं सर्वांनाच मोठा धक्का दिला. टीव्हीकेनं बहुमत मिळवून सत्तापालट केलाय. तर आसाममध्ये भाजपनं सत्ता राखण्यात यश मिळवलं. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफनं सत्तापालट केला असून पुद्दुचेरीतही एनडीएनं आपली पकड मजबूत ठेवली. तर पुद्दुचेरीत एनडीए आघाडीने सत्ता कायम राखली.

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात 6 उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

देशभरात भाजपच्या पश्चिम बंगाल आणि आसामच्या विजयाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात 6 उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव यांचा समावेश आहे.

10 जागांसाठी 10 उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक बिनविरोध- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली होती. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार होती. 12 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या या 10 जागांसाठी निवडणूक होणार होती. परंतु 10 जागांसाठी 10 उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्यामुळे महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये भाजपच्या 6, शिवसेना शिंदे गटाच्या 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 आणि शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी) च्या एका उमेदवाराचा समावेश आहे. 

Continues below advertisement

भाजपच्या बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची यादी- (BJP Vidhan Parishad Candidate 2026)

  1. सुनील कर्जतकर 
  2. माधवी नाईक 
  3. संजय भेंडे
  4. विवेक कोल्हे
  5. प्रमोद जठार
  6. प्रज्ञा सातव

शिवसेना शिंदे गटाच्या बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची यादी- (Shivsena Vidhan Parishad Candidate 2026)

  1. नीलम गोऱ्हे
  2. बच्चू कडू

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची यादी- (Ajit Pawar NCP Vidhan Parishad Candidate 2026)

  1. झिशान सिद्दीकी

महाविकास आघाडीकडून बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची यादी- (Uddhav Thackeray Candidate Vidhan Parishad Candidate 2026)

  1. अंबादास दानवे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; कोणत्या पक्षाकडून कोण आमदार होणार?, A टू Z माहिती