Maharashtra Election 2025 : महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. असेअसतानादुसरीकडेमतदानाच्यापूर्वसंध्येलाराज्यातकाहीघटनांनीराजकीयवर्तुळातखळबळउडालीआहे. चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवत भाजप उमेदवाराच्या घराच्या मागील शेडमधून पैसे वाटतांनाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. तरदुसरीकडे बुलढाण्यातील नांदुरा येथेदेखील उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Chandrapur : भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष, पैसे वाटतांनाचा व्हिडीओ व्हायरल

चंद्रपूरमध्ये भाजप (BJP) उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवलेजात असल्याचाप्रकारसमोरआलाआहे. भाजप उमेदवाराच्या घराच्या मागील शेडमधून पैसे वाटतांनाचा व्हिडीओ व्हायरल झालाआहे. राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील आणि भाजप नेते पांडूरंग चिल्लावार हे निवडणूकीत 500 रूपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचा विडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बाबत निवडणूक विभागाकडे काँग्रेस नेते सुरज ठाकरे यांनी तक्रार केली आहे. अमोल चिल्लावार हा नगरसेवक पदासाठी उभा आहे. चिल्लावार यांचे घराचे मागे असलेल्या पिठाच्या चक्कीच्या शेडमधून हे पैसे वाटप होत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या व्हिडीओमध्ये चिल्लावार यांच्या हातात पाचशे रूपयांची गड्डी दिसत आहे. रक्कमेचे वाटप सुरू असल्याची तक्रार आली असल्याचं आणि ही तक्रार व व्हिडीओ आचारसंहिता प्रमुखांकडे पाठवल्याचं राजुऱ्याचे तहसीलदार आणि नगर नगरपरिषद निवडणूक प्रमुख ओमप्रकाश गोंड यांनी सांगितलं आहे.

Nandura : उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

तरअशीचएकघटना बुलढाण्यातील नांदुरा येथेघडलीआहे. नांदुरा नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया आज होणार आहे. मात्र आदल्या दिवशी रात्रीच प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार, हे बघणं आता महत्त्वाचं ठरणारआहे.

हेही वाचा