Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं. त्यानंतर आज निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 10 वाजतापासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात होईल. मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 53 ते 55 टक्के, ठाणे मनपात 56 टक्के, पुणे मनपात 52 टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये 58 टक्के, नवी मुंबईत 57 टक्के, नाशिक मनपात 57 टक्के मतदान झालंय. परभणीत 66 टक्के, जालन्यात 61 टक्के मतदान झालंय. आता आज लागणाऱ्या महानिकालांची उत्सुकता आहे.
राज्यातील 29 महापालिकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फैरी झडल्यानंतर मतदारराजाने त्याचा कौल गुरुवारी 'ईव्हीएम' बंद केला. कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हसण्याची संधी मिळते आणि कोणाला हादरे बसतात याचा फैसला शुक्रवारी सकाळी 10 पासून सुरू होणाऱ्या मतमोजणीद्वारे होणार आहे. मुंबईच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिकेवर झेंडा फडकविणार की भाजप-शिंदेसेना त्यांना धक्का देणार याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
राज्यातील पुढील 29 महापालिकांचा निकाल- (Maharashtra Municipal Corporation Election Result 2026)
1. बृहन्मुंबई - एकूण जागा- 227
2. भिवंडी-निजामपूर- एकूण जागा- 90
3. नागपूर – एकूण जागा-151
4. पुणे – एकूण जागा-162
5. ठाणे - एकूण जागा-131
6. अहमदनगर - एकूण जागा-68
7. नाशिक – एकूण जागा-122
8. पिंपरी-चिंचवड - एकूण जागा-128
9. छत्रपती संभाजीनगर - एकूण जागा-113
10. वसई-विरार - एकूण जागा-115
11. कल्याण-डोंबिवली - एकूण जागा-122
12. नवी मुंबई - एकूण जागा-111
13. अकोला - एकूण जागा-80
14. अमरावती - एकूण जागा-87
15. लातूर - एकूण जागा-70
16. नांदेड-वाघाळा - एकूण जागा-81
17. मीरा-भाईंदर - एकूण जागा-96
18. उल्हासनगर - एकूण जागा-78
19. चंद्रपूर - एकूण जागा-66
20. धुळे - एकूण जागा-74
21. जळगाव - एकूण जागा-75
22. मालेगाव - एकूण जागा-84
23. कोल्हापूर - एकूण जागा-92
24. सांगली-मिरज-कुपवाड - एकूण जागा-78
25. सोलापूर - एकूण जागा-113
26. इचलकरंजी – एकूण जागा-76
27. जालना - एकूण जागा-65
28. पनवेल - एकूण जागा-78
29. परभणी – एकूण जागा-65