Maharashtra Monsoon Session 2026: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (Monsoon Session) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्याप्रमाणे आपल्या अखत्यारीत असलेले विभाग दुसऱ्या मंत्र्यांकडे सभागृहात उत्तर देण्यासाठी विभागून देतात, त्याप्रमाणे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही आपले विभाग दुसऱ्या मंत्र्यांना उत्तरे देण्यासाठी दिले आहेत. सरकारच्या या भूमिकेला विरोधी पक्षातील नेते जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी तीव्र विरोध दर्शवला. या मुद्द्यावरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सभागृहात उपस्थित होते. मात्र, सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने अखेर या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या विरोधकांनी सभागृहातून थेट सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार टाकला. 

Continues below advertisement

Aaditya Thackeray on Eknath Shinde: आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला

सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. आदित्य ठाकरे म्हणाले की, "आज आम्ही सभागृहावर बहिष्कार टाकला. एक नवीन प्रकार या सरकारच्या काळात सुरू झाला आहे. हे मिंधे स्वतःच्या खात्याचा अभ्यास करत नाहीत. उत्तर देता येत नाही म्हणून दुसऱ्या मंत्र्यांवर जबाबदारी देतात. हे झालं तरी मंत्री उत्तर देतात. फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात आणि पळून जातात. आमच्या सरकारमध्ये कुठल्याही मंत्र्यांनी पळ काढला नाही की जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली नाही. जी खाती रडून घेतली त्याबाबत उत्तर द्यायला हवी. अध्यक्ष हे खोटं बोलले ते रेकॉर्डवर गेलं आहे हे रेकॉर्ड वरून काढावं," असे त्यांनी म्हटले.

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप

याच मुद्द्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आणि इंग्रजी शब्दांच्या वापरावर तीव्र आक्षेप नोंदवला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "अध्यक्ष काहीही इंग्रजी शब्द वापरून आम्हाला मूर्ख समजतात. आम्हीही चांगल्या शाळेत शिकलो आहोत. आम्हाला इंग्रजी कळतंय, आमचा बाप जरी गावी कुठे जन्माला आला असेल. आता त्यांनी वापरलेले शब्द शशी थरूर यांना पाठवतो. हातात कायदा आहे म्हणून सभागृह कसेही चालवायचे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

Continues below advertisement

Eknath Shinde on Aaditya Thackeray: एकनाथ शिंदेंचेही जशास तसं प्रत्युत्तर

विरोधकांच्या या जोरदार गदारोळानंतर आणि आदित्य ठाकरेंच्या थेट हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उभे राहून ठाकरे गटाचा आणि विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. एकनाथ शिंदे म्हणाले की, "सभागृहाचे कामकाज अध्यक्ष तुमच्या अध्यक्षतेखाली चालते. काल जोर का झटका दिला त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आणखी झटके देणार आहे," असा इशारा त्यांनी यावेळी दिला. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, "कोण होतास तू, काय झालास तू! विजयराव, जयंतराव तुम्ही ज्येष्ठ आहात, काय पोराटोरांचे (आदित्य ठाकरे) ऐकता, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. 

आणखी वाचा 

Video: काल जोर का झटका दिलाय, संतुलन बिघडलंय त्यांचं, विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल