Maharashtra Mahanagar Palika Nivadnuk LIVE: अजितदादांकडून तुरुंगातल्या दोन गुंडाना उमेदवारी, तर गुंड गजा मारणेची पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात
Maharashtra Mahanagar Palika Nivadnuk LIVE Updates: राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा, मुंबई मबानगरपालिका निवडणुकीसह, सर्व महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Mahanagar Palika Nivadnuk LIVE Updates: मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आतापर्यंत 92 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची यादी कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची अधिकृत...More
Pune Mahanagar Palika Nivadnuk LIVE: अजित पवारांच्या पक्षाकडून हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरला उमेदवारी. प्रभाग क्रमांक २३ मधुन आंदेकर निवडणूक लढवणार . दोघीही तुरुंगातुन निवडणूक लढवणार. आयुष कोमकर हत्या प्रकरणात दोघी तुरुंगात आहेत
BMC Election 2025: मुंबई महानगरपालिकेतील शिवडीतील प्रभागांमधील पेच संपला, कोणाकोणाला उमेदवारी?
प्रभाग क्र. 202 श्रद्धा जाधव
प्रभाग क्र. 203 भारती पेडणेकर
प्रभाग क्र. 204 किरण तावडे
प्रभाग 202 मधून श्रद्धा जाधव यांचा मुलगा पवन जाधव होता इच्छुक मात्र स्थानिक शाखाप्रमुखाचा विरोध असल्याने श्रद्धा जाधव यांना उमेदवारी
प्रभाग 203 मधून माजी आमदार दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ इच्छुक होत्या
तर प्रभाग क्र. 204 मधून माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांना उमेदवारी नाकारून किरण तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे
Pune Mahanagar Palika Nivadnuk LIVE: भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर अमोल बालवडकर अजित पवारांच्या भेटीला येणार
अमोल बालवडकर राष्ट्रवादी प्रवेश करून राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेणार असल्याची माहिती
विधानसभेत चंद्रकांत पाटील त्यांच्या विरोधात भूमिका घेतली
Mahanagar Palika Nivadnuk LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रामदास आठवले यांना फोन
जागावाटप लवकर पूर्ण करण्यासाठी विनंती
भाजपाच्या कोट्यातून रामदास आठवले यांच्या रिपाईला जागा
बहुतेक जागावाटप पूर्ण, आता लवकर उर्वरित लवकर पूर्ण करावे
मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विनंती
Thane Mahanagar Palika Nivadnuk LIVE: खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाला प्रभाग क्रमांक 19 मधून उमेदवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाकारली...
आशुतोष म्हस्के गेले अनेक वर्ष आनंद नगर, हुजुरी भागात काम करत होते...
आनंद नगर भागातील लोक नाराज झाले आहे...
टेंभी नाका येथील बैठकीतून स्वतः खासदार नरेश मस्के यांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढली...
काही दिवसांपुर्वी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्के यांच्या प्रभागात केली होती निदर्शने.
NCP Candidates List: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर
पहिल्या यादीत 7 तर दुसऱ्या यादीत 4 उमेदवार
प्रभाग क्रमांक 224- सानिया शाह, 165- अभिजीत कांबळे, 107- भरत दनानी आणि 211 मधून सुफियान अन्सारी उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूसोबत युती करून निवडणूक लढत असून 11 जागा सोडण्यात आल्या
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाला प्रभाग क्रमांक 19 मधून उमेदवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाकारली..
आशुतोष म्हस्के गेले अनेक वर्ष आनंद नगर ,हुजुरी भागात काम करत होते...
आनंद नगर भागातील लोक नाराज झाले आहे...
टेंभी नाका येथील बैठकीतून स्वतः खासदार नरेश मस्के यांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढली...
काही दिवसांपुर्वी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्के यांच्या प्रभागात केली होती निदर्शने.
Vasai Virar Mahanagar Palika Nivadnuk LIVE: महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलचे उपाध्यक्ष आणि वसईचे आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या भावजय नेहा दुबे यांच ही भाजपानं तिकिट नाकारल्यानं त्या ही कमालीच्या संतापल्या आहेत. विधानसभेत आमदारकीला उभं होत असताना, त्यांना नगरसेवकाच तिकिटाच आश्वासन दिलं होतं. तसेच निवडणूका जाहीर होताच पक्षाकडे इच्छूकाचे अर्ज भरू नका तुमचे तिकिट फायनल असल्याचही सांगितलं होतं माञ ऐन मुव्हमेंटला त्याच तिकिट नाकारलं गेलं. नेहा दुबे प्रचंड नाराज झाल्या आहेत.
Latur Mahanagar Palika Nivadnuk LIVE: महापालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये नाराजी उफाळून आली आहे. भाजपने केलेल्या कामाचे योग्य फळ मिळाले , असे म्हणत निखिल शिवाजी गायकवाड यांनी भाजपाच्या लातूर शहर संघटन सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुणे : भाजपला धक्का नाराज माजी नगरसेविका शिंदे गटाकडून लढणार
संगीता ठोसर शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार
शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपमध्ये प्रवेश केलेला संगीता ठोसर शिवसेना शिंदे गटाकडून आता निवडणूक लढवणार
कात्रज कोंडवा परिसरात 2017 ते 22 दरम्यान नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या नगरसेविका
Dhule Mahanagar Palika Nivadnuk LIVE: धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयात आज सकाळपासून उमेदवारांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. धुळे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवीत असून शिवसेना मनसे तीस जागा, काँग्रेस 30 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 14 जागा देण्याचा निर्णय झाला असून ही निवडणूक आम्ही भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्रित लढवत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे यांनी दिली आहे. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची गर्दी पाहायला मिळत आहे.
Vasai Virar Mahanagar Palika Nivadnuk LIVE: वसई : वसईचे माजी नगरसेवक ज्यांनी नुकतच भाजपातून प्रवेश केला होता. त्यांनी आज प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपच्या तिकीटीवर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Pune Mahanagar Palika Nivadnuk LIVE: मागील 28 तासांपासून अजित पवारठाण मांडून बसलेल्या उमेदवाराला अधिकृत उमेदवारी जाहीर, विकार अहमद या उमेदवाराला प्रभाग 13 मधून अधिकृत उमेदवारी जाहीर
विकार अहमद हे आणि त्यांचे कार्यकर्ते कालपासून अजित पवार यांच्या जिजाई बंगल्याबाहेर ए बी फॉर्म साठी वाट बघत बसले होते. अक्खी रात्र देखील त्यांनी अजित पवार यांच्या बंगल्या बाहेर काढली. तरुणांना अजित पवारांनी संधी द्यावी अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर आता अजित पवारांनी विकार अहमद याला प्रभाग क्रमांक 13 मधून एबी फॉर्म दिला आहे. आणि अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी दिल्यानंतर विकार यांचे डोळे पाणवले होते. अजित पवार यांनी दाखवलेल्या विश्वास सार्थ ठरवेल, अशी प्रतिक्रिया विकार अहमद यांनी दिली आहे.
Pune Mahanagar Palika Nivadnuk LIVE: भाजप कडून शिवसेनेला अवघ्या 16 जागांचा प्रस्ताव दिला होता, जो शिंदेंना मान्य नव्हता. शिवसेनेला 40 जागांची मागणी केली होती. तसा प्रस्तावही शिवसेनेनं भाजपला दिला होता. भाजपनं तेव्हा कुठलेही उत्तर न देता शिवसेनेला गाफिल ठेवले, आणि शेवटल्या क्षणी 16 जागाांचीच ऑफर दिली. त्यावर आज मंत्री उदय सामंत पुण्यामधे येऊन निर्णय होणं अपेक्षित होतं. मात्र नाना भानगिरेंनी मंत्र्यांची वाट न पाहता कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत युती तुटल्याचे जाहिर केले
Pune Mahanagar Palika Nivadnuk LIVE: कुख्यात गुंड गज्या मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे यांनी भरला उमेदवारी अर्ज
गुंड गजा मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी
प्रभाग क्रमांक 10 मधून जयश्री मारणे यांनी भरला उमेदवारी अर्ज
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरात ३ तिकीटं
राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहिण गौरवी शिवलकर-नार्वेकर यांना उमेदवारी
विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत तिन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार
आमदार-खासदारांच्या घरात तिकीट नाही असा भाजपचा पवित्रा असताना नार्वेकर यांच्या घरात मात्र ३-३ उमेदवार मुंबई महापालिकेच्या रिंगणात
Pune Mahanagar Palika Nivadnuk LIVE: कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे ला अजित पवार गटाकडून प्रभाग 10 बावधन मधून एबी फॉर्म देण्यात आलाय.
जयश्री मारणे या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार
गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला दिली उमेदवारी
Aaditya Thackeray Worli BMC Election: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात बंडखोरी होऊ नये यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी...
मातोश्रीवर AB फॉर्म वाटप करताना वरळीतील नाराजी नाट्य...
वरळीतील नाराज उमेदवारांना समजवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न...
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात नाराजीचा फटका बसणार?
वरळी विधानसभेतील AB फॉर्म दिलेल्या उमेदवारांची आणि नाराज उमेदवारांची मध्यरात्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा...
प्रभाग क्र. 193 मधून हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देणार असताना सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिल्याने मातोश्रीवर बोलवण्यात आलं होत
प्रभाग क्र. 196 मध्ये विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने महिला शाखाप्रमुख संगीता जगताप आणि युवासेना पदाधिकारी आकर्षिका पाटील नाराज
प्रभाग क्र. 197 मनसेला दिल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवत थेट राजीनामा देण्याचा ईशारा दिला
या सर्वांची मनधरणी करण्यासाठी मध्यरात्री मातोश्रीवर बोलवण्यात आलं होत...
सोबतच रात्री वरळीतील AB फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांना देखील मातोश्रीवर बोलवण्यात आलं होत
Bhiwandi Mahanagar Palika Nivadnuk LIVE: भिवंडीत माजी महापौर विलास पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील यास भाजप आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांकडून शिवीगाळ करत मारहाणीची धमकी...
रात्रीच्या वेळी भर रस्त्यात उभे राहून शिवीगाळ केल्याने परिसरात तणाव...
निजामपूर पोलिस ठाण्यात भाजपा आमदार महेश चौघुले समर्थक उमेश सोनवणे व सोनल जाधव विरोधात गुन्हा दाखल...
BMC Election 2026: महाराष्ट्र नवनिर्माण सेना 52 जागांवर मुंबई महापालिकेची निवडणूक लढविणार
काल रात्री उशिरापर्यंत 49 उमेदवारांना अर्ज देण्यात आल्याची माहिती
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेकडून नेमके उमेदवार किती याची माहिती माझा च्या हाती
मात्र अद्याप मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर नाही…
मनसेकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवण्यात येणार…
आजही काही जणांना उमेदवारी अर्ज देण्यात येणार तर इच्छुकांची मनधरणी केली जाणार
BMC Election 2026: आमदार प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर हे वॉर्ड क्रमांक 3 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आग्रही असलेल्या वाॅर्ड 5 मधून त्यांचे चिरंजीव राज सुर्वे तर विद्यमान नगरसेवक संजय घाडींना वाॅर्ड 4 मधून संधी
काल रात्री नंदनवन बंगल्यावर ह्या तीन वाॅर्डवरुन भाजप सेनेत घमासान, विश्वसनीय सूत्रांची माहिती
Nagpur Mahanagar Palika Nivadnuk LIVE: नागपूरमध्ये महायुतीचा भाजप 143 आणि शिवसेना 8 हा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी शिवसेना या व्यतिरिक्त दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रही आहे.
अजय दलाल आणि जगाराम सिन्हा यांच्यासाठी प्रभाग 21 आणि प्रभाग 24 मैत्रीपूर्वक लढत करावी असा शिवसेनेचा आग्रह आहे.
त्यासाठी मंत्री आशिष जैस्वाल व कृपाल तुमाने हे थोड्यावेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे.
Pimpri-Chinchwad Mahanagar Palika Nivadnuk LIVE: पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक अजित पवार ही लढणार आहेत. शरद पवार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. प्रभाग क्रमांक 25 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज ही दाखल केलाय. हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय. अजित पोपट पवार हे प्रभाग क्रमांक 25 मधून ड या जागेसाठी स्वतःचं नशीब अजमावणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळाला तर ते अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असू शकतात. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रभाग क्रमांक 25 मधून अर्ज दाखलेले अजित पवार या दोघांच्या नावात साधर्म्य आहे. त्यामुळं अजित पवार पिंपरी चिंचवडची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरुये.
Pune Mahanagar Palika Nivadnuk LIVE: शरद पवारांचे राष्ट्रवादी 40 प्रभागात प्रत्येकी एक उमेदवार देणार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी 125 शरद पवारांची 40 जागा लढणार
पॅनल निवडून येण्यास सोपे जाण्यासाठी अजित पवारांचे तीन उमेदवार आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा एक उमेदवार प्रत्येक प्रभागात असणार
राजकीय अस्तितव टिकवण्यासाठी प्रत्येक प्रभागात आपला अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीची रणनीती
Pune Mahanagar Palika Nivadnuk LIVE: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक नितीन कदम अजित पवारांच्या भेटीला
तर शिवसेनेचे पदाधिकारी हे अजित पवारांच्या भेटीला जिजाईवर दाखल
जिजाऊ वर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
रुपाली ठोंबरेदेखील अजित पवारांच्या भेटीला..
माजी आमदार सुनील टिंगरे अजित पवारांच्या भेटीला
अजित पवारांच्या निवासस्थानी एबी फॉर्म वाटप सुरु झाल्याची माहिती
Nagpur Mahanagar Palika Nivadnuk LIVE: भाजप शिवसेना युतीचा गुंता अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. भाजपने शिवसेनेला 8 जागा देऊ केल्या आहेत. मात्र, शिवसेना प्रभाग 21 आणि 24 मधील प्रत्येकी एक अशा आणखी 2 जागांसाठी आग्रही आहे. काल रात्री भाजप शिवसेना नेत्यांच्या बैठकीत आठ जागांवर सहमती झाली. मात्र शिवसेनेला अतिरिक्त दोन जागा हव्या असल्याने आज सकाळी पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे.
नागपूरमध्ये भाजप शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब...
शिवसेनेला मिळाल्या 8 जागा तर भाजप 143 जागांवर लढणार...
शिवसेनेच्या 8 पैकी 2 जागेवर शिवसेनेचे उमेदवार दिले तर 6 जागेवर भाजपचे उमेदवार शिवसेना चिन्हावर लढणार आहे
रात्री उशीरपर्यंत चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत शेवटी निघाला तोडगा
शिवसेना भाजपचं युतीचं गणित जरी ठरलं असलं तरी शिवसेनेत अंतर्गत जागांमध्ये रस्सी खेच अजूनही कायम आहे
दादरच्या वाॅर्ड क्रमांक 192 चे उबाठाचे माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांना ठाकरेंनी तिकिट नाकारल्यानंतर
पाटणकर ऐनवेळी नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला सपत्नीक दाखल झाले
आता या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख, भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष जितेंद्र कांबळे, भाजप दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महामंत्री अक्षता तेंडुलकर आणि उबाठातून आलेले प्रकाश पाटणकर हे इच्छुक आहे
यात प्रकाश पाटणकर आणि अक्षता तेंडुलकर या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा आहे
आता शिंदे पक्षाबाहेरून आलेल्या उपर्यांना संधी देतात की, निष्ठावंतांना हे पाहणं महत्वाचे आहे
Solapur Mahanagar Palika Nivadnuk LIVE: सोलापूर महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाने उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर
रात्री उशिरा शिवसेना उबाठाने 9 उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर
या आधी शिवसेना उबाठाने 11 उमेदवारांची यादी केली होती जाहीर
सोलापुरात महाविकास आघाडीच्या जागा वाटपनुसार शिवसेना उबाठा एकूण 30 जागा लढवणार आहे.
त्यापैकी 20 जागावरील उमेदवार जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी जाहीर केलेत.
Shiv Sena Eknath Shinde Candidates List For BMC LIVE: मुंबईत पालिका निवडणुकीसाठी रात्री उशिरा इच्छुक माजी नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाॅर्म वाटले. यात पहिला एबी फाॅर्म हा वडाळ्याचे माजी नगरसेवक अमेय घोले यांना देण्यात आला. पालिका निवडणुकीत शिवसेना 90 जागांवर लढत असून शेवटच्या जागेपर्यंत भाजपसोबत वाटाघाटीत रस्सीखेच सुरू होती. बंडखोरी टाळणयासाठी शिंदेंकडून पूर्णतहा खबरदारी घेत रात्री उशिरा शिंदेंनी कुठलिही यादी न काढता, थेट इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटण्यास सुरुवात केली.
BMC Election 2026 LIVE: मुंबई महानगर पालिका निवणुकीत उमेदवारीवरून भाजपमध्ये वाॅर्ड क्रमांक 200 मध्ये नाराजी नाट्य समोर
आमदार कालिदास कोळंबकर यांच्या बाले किल्यात वाॅर्ड क्रमांक 200 ची उमेदवारी भाजपने संदीप देशपांडे यांना दिली
मात्र देशपांडे यांना तिकिट जाहिर झाल्यानंतर नाराज 2 इच्छुक भाजपच्या पदाधिकार्यांनी अपक्ष फाॅर्म भरण्याचा निर्णय घेतला आहे
यात भाजपचे दक्षिण मध्य मुंबईचे महामंत्री गजेंद्र धुमाळ, तर दुसरीकडे भाजपचे जुने पदाधिकारी संजय दास्ताने या दोघांच्या नावाचा समावेश आहे
गजेंद्र धुमाळ यांनी तर उमेदवारी न मिळाल्याबाबत 'साहेब आमचं काय चुकलं' असा थेट सवाल भाजप पक्षश्रेष्टींकडे यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून केला आहे
वाॅर्ड क्रमांक २०० मध्ये झालेल्या या बंडखोरीचा फटका भाजपला नक्कीत बसेल, मात्र मत विभाजनामुळे याचा फायदा विरोधी उमेदवाराला होण्याची शक्यता नाकारता येत नाही
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Mahanagar Palika Nivadnuk LIVE: अजितदादांकडून तुरुंगातल्या दोन गुंडाना उमेदवारी, तर गुंड गजा मारणेची पत्नीही निवडणुकीच्या रिंगणात