Maharashtra Live Updates: उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूका रद्द करा; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं?

Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 15 Oct 2025 02:23 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Updates: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) वज्रमूठ उगारलीय. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज (15 ऑक्टोबर) पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त...More

भंडाऱ्यात तीन औषध विक्रेत्याकडून जप्त केला बॅन असलेली कप सिरप 

मध्य प्रदेशात उत्पादित करण्यात आलेल्या कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्रातही औषध निर्माण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. महाराष्ट्रातही मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात कप सिरप चा पुरवठा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भंडारा औषध व अन्न प्रशासन विभागाने भंडाऱ्यातील औषध विक्रेत्या दुकानात तपासणी केली असता तीन औषध विक्रेत्यांकडे कप सिरप आढळून आलेत. तीन दुकानात आढळून आलेला औषध साठा भंडारा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. हे औषध विक्रेते डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय कप सिरप विक्री करीत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात ची प्रक्रिया सुरू आहे.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.