Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: देशभरातील आंदोलनांच्या रेट्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामाही झाला.

पार्श्वभूमी
Maharashtra Live Breaking Marathi News: देशभरातील आंदोलनांच्या रेट्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामाही झाला. मात्र पॅलेट गनच्या वापरामुळे सुरु झालेल्या आरोपांच्या तोफा अजूनही थंडावलेल्या नाहीत...राहुल गांधींनी लोकसभेत मोदी-अमित शाहांवर यथेच्छ...More
धक्कादायक... अमरावती विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकीचे कॅन्टींग सील...
अन्न व औषध प्रशासन (एफ डी ए) ची धडक कारवाई...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य कॅन्टीनमध्ये प्रचंड अस्वच्छता आणि अधिकृत परवानाशिवाय सुरू असल्याचे उघड
अन्न औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांची कारवाई...
अमरावती विद्यापीठाची कॅन्टींन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची कॅन्टीन पूर्णपणे बेकादेयशीर आणि विनापरवाना...
अन्न व औषध प्रशासनाचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला पत्र..
जळगाव जिल्ह्यासह हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि हतनूर धरणाचे उपअभियंता यांनी हतनूर धरणातून होणाऱ्या विसर्गाची संयुक्त पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
पाण्याची आवक वाढल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हातनूर धरणाचे सर्व ४१ रेडियल दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले असून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
३१ जुलै दुपारी १२ वाजेच्या आकडेवारीनुसार हातनूर धरणाची पाणीपातळी २११.७५० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता २६८.५० दशलक्ष घनमीटर (६९.२० टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा १३५.५० दशलक्ष घनमीटर (५३.१४ टक्के) इतका आहे.
धरणातून ८,९२६ घनमीटर प्रति सेकंद (सुमारे ३,१५,२२२ क्युसेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, सर्व ४१ रेडियल दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवण्यात आले आहेत. कालपासून पाणलोट क्षेत्रात ८६ मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान २५८ मिमी इतके झाले आहे. कालव्यामधून ५.६६ घनमीटर प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू असून आर.एस. गेटद्वारे कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
स्कॉर्पिओच वापरणार; इतर गाड्यांचा आग्रह नाही – सभागृह नेते गणेश खणकर यांचे आयुक्तांना पत्र
मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी नव्याने महागड्या गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते गणेश खणकर यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नव्या गाड्यांची मागणी आम्ही कधीच केली नसून, आम्हाला देण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाड्याच वापरायच्या आहेत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
खणकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, नव्या गाड्यांच्या खरेदीमुळे मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाकडून गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचे धोरण राबवले जात असून, विरोधकांकडून याबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तसेच, नव्याने कोणत्याही गाड्यांची मागणी आम्ही केलेली नसून, यासंदर्भात कोणतेही पत्रही दिलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्कॉर्पिओ व्यतिरिक्त इतर गाड्यांची विशेष सुविधा रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
याशिवाय आयुक्त आणि महापौर वगळता इतर सर्व अधिकारी आणि वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांना एकाच दर्जाच्या स्कॉर्पिओ गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून सर्वांमध्ये समानता राहील, असेही खणकर यांनी पत्राद्वारे सुचवले आहे.

पूर्णा नदीला महापूर, काठावरील गावात व शेतीत शिरलं पाणी.
पुरामुळे जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव चा संपर्क तुटला.
अकोला अमरावती व वाशिम जिल्ह्यात बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातून वाहणारी पूर्णा नदीला महापूर आला आहे या पुरामुळे पुराचे पाणी नदीत पात्र बाहेर वाहत असून काठावरील गावात व शेतीचे पाणी शिरलं आहे त्यामुळे शेतीचे नुकसान झालं असून जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव व मानेगाव या गावातील घरांमध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरला आहे तर तालुक्यातीलच गोळेगावचा पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे संपर्क तुटला आहे.
Amravati : अमरावती जिल्ह्यात 39 महसूल मंडळात अतिवृष्टी...
मागील 24 तासात जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नांदगाव मंडळात सर्वाधिक 296 मिमी पावसाची नोंद...
अमरावती तालुक्यातील 9, भातकुली 4, नांदगाव खंडेश्वर 8, चांदुर रेल्वे 5, मोर्शी - दर्यापूर - अंजनगाव प्रत्येकी 1, चांदुर बाजार 3 तर धामणगाव रेल्वे येथील 7 मंडळात अतिवृष्टी...
नांदगाव खंडेश्वर येथील मेंढी नाल्यात एक व्यक्ती दुचाकीसह गेला वाहून... जिल्हा शोध व बचाव पथकतर्फे शोधकार्य सुरु...
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांना फटका बसला आहे. पर्लकोटा आणि पामुलगौतम नदीचे पाणी गावात शिरल्याने भामरागडमधील 700 पेक्षा अधिक नागरिकांना गुरुवारी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी भामरागडचा संपर्क तुटला होता. आजही पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणीच असल्याने भामरागडसह तालुक्यातील पन्नासहून अधिक गावांचा संपर्क दोन दिवसापासून तुटलेलाच आहे. दरम्यान गेल्या 30 तासांपासून भामरागडसह तालुक्यातील वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवा बंद असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. आजही सध्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील 12 मार्ग बंद आहेत. यात हेमलकसा-भामरागड राष्ट्रीय महामार्गावरील पर्लकोटा नदी, सिरोंचा तालुक्यातील सोमणपल्ली नाला, एटापल्ली-गट्टा मार्गावरील बांडिया नदी पूल, अलदंडी पूल तसेच जांबिया आणि नेंडेर परिसरातील मार्ग अद्याप पाण्याखाली आहेत. अहेरी, भामरागड, चामोर्शी आणि देसाईगंज तालुक्यातील अनेक रस्त्यांवरही पूराचे पाणी असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आष्टी-आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावरील दिना नदीचे पाणी ओसरले असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पुण्याकडून चाळीसगावकडे जाणाऱ्या लक्झरी बस व नांदगावहून - राहुरीला जाणाऱ्या अल्टो कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात राहुरी येथील अल्टो कार मधील पती गंभीर तर त्याची पत्नी किरकोळ जखमी झाले..हा अपघात नांदगाव - येवला रस्त्यावरील बेलदारवाडी घाटाजवळ घडला..दरम्यान, बेलदारवाडी घाट वळण रस्त्यावर गेल्या महिन्याभरापासून तीन मोठे अपघात घडले असून वळण रस्ता कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपाय योजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे..
गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील नद्या-नाल्यांना पूर आला असून काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बीड दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली. तसेच, नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी व कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये,यासाठी प्रशासनाला अत्यंत सतर्क राहून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
बोरिवली स्काय वॉक वर ड्रग्स आणि दारू पिणारे व्यक्तींचा अड्डा
स्काय वॉक वरून चालत जाणारी महिला, मुली आणि विद्यार्थ्यांच्या या दारुडे खोरांकडून छेडछाड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रग्स फ्री देश या मोहिमेच्या अंतर्गत भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी आज केली बोरिवली स्काय वॉक नशा मुक्त
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश ड्रग्स फ्री व्हावी यासाठी मोहीम राबवत आहेत
याच मोहिमेचा अंतर्गत आज बोरिवली मध्ये भाजप आमदार संजय उपाध्याय कडून नशा मुक्त (Drugs Free) कार्यक्रमाचे आयोजन
ड्रग्स फ्री मोहिमेच्या अंतर्गत आज बोरिवली पश्चिम स्टेशन परिसरात असलेला स्काय वॉक आमदार संजय उपाध्याय कडून ड्रग्स फ्री करण्यात आले
बोरिवली रेल्वे स्टेशन परिसरात असलेला स्काय वर सकाळी गांजा पिताना काही नागरिकांना आमदार संजय उपाध्याय यांनी पकडले
त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्काय वॉक वर दारूची बाटल्या सुद्धा जप्त केली आहे
बोरिवली स्टेशन परिसरात असलेल्या स्काय वॉक हा येण्या जाण्याकरिता आहे मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरदुल्यांकडून नशेसाठी वापर केला जात आहे
बोरिवली स्काय लॉक वर ड्रग्स आणि दारू पिऊन या गर्दुल्ल्यांकडून महिला,विद्यार्थी,शाळकरी मुलींच्या छेड काढली जाते आणि त्यांच्यापासून त्यांना धोका आहे
आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून रेल्वे प्रशासन आणि पालिका कडे मागणी करण्यात आली आहे बोरिवली येथील स्काय वॉक वर महिलांनी मुलींचे सुरक्षा च्या दृष्टीने लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरा सोबत स्वच्छ ठेवला पाहिजे...
त्यासोबत बोरिवली येथील स्काय वॉक वर एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट ला गेट लावून रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद केला पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी दारुडे बसू नये...
बोगस डाॅक्टरकडून किळासवाणा प्रकार-
-१० ते १२ अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक-कृत्याची घटना-
-इयत्ता ७ वी ते १० वी मधील शालेय विद्यार्थ्यासोबत घडलाय प्रकार-
-माढा तालुक्यातील अंबाड गावातील संतापजनक घटना-
-पीडित मुलाने घडलेला प्रसंग घरी सांगितल्यानंतर प्रकार उघडकीस आलाय-
-दत्तात्रय कुलकर्णी या बोगस डाॅक्टर विरोधात बाललैंगिक अत्याचारासह अॅट्रासिटीचा गुन्हा कुर्डूवाडी पोलिसांत नोंद झाला आहे.-
काल दिवसभर उसंत घेतलेल्या पावसामुळं गोसेखुर्द धरण प्रशासनानं दुपारनंतर पाण्याचा विसर्ग कमी करताना केवळ ३ दरवाजे अर्धा मीटरनं सुरू ठेवले होते. मात्र, रात्री पुन्हा सर्व दूर पावसाने जोरदार हजेरी लावली आणि वैनगंगेच्या नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग झाला. जोरदार पावसानंतर वैनगंगा नदी इशारा पातळीच्या जवळ पोहोचल्यानं वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली. गोसेखुर्द धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी पहाटेपासून गोसेखुर्द धरणाचे पुन्हा १७ दरवाजे अर्धा मीटरनं सुरू करण्यात आले आहे. सध्या धरणातून ७३,३५७ क्युसेक प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने चिंचपूर आणि हिळळी बंधारे बुडाला पाण्याखाली, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावांचा संपर्क तुटला
पुणे जिल्ह्यात उजनी धरण लाभक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण तुडुंब भरलंय
त्यामुळे भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली
दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर बंधारा तसेच अक्कलकोट तालुक्यातील हिळळी बंधारा पाण्याखाली गेल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतील सिमवर्ती भागातील गावांचा संपर्क तुटलाय
बांधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने चिंचपूर आणि हिळळी गावातून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे
रत्नागिरी- काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचं नगरसेवक पद रद्द
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
डिसेंबर २०२५ मध्ये राजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काॅग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या झारी
राजापुरात महाविकास आघाडीला धक्का
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने झारी यांचं जात प्रमाणपत्र ठरवलं होतं अवैध
राजापूर नगर परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता, महायुतीकडे आणि महायुतीकडे प्रत्येकी १० नगरसेवकांचे होते संख्या बळ
जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने या जागेवर पोटनिवडणूक होणार का? याकडे सर्वांचं लक्ष
पुण्यातील नदीपात्रात वाहून आली डेड बॉडी
भिडे पुलाजवळ पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल दाखल
सकाळी आठ वाजता डेक्कन पोलिसांना इथे बॉडी पडल्याचा कॉल आला होता आणि त्यानंतर डेक्कन पोलीस इथे दाखल झाले
हा व्यक्ती कोण आहे त्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे याचा संपूर्ण तपास डेक्कन पोलीस करत आहेत
राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे हे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा असल्यानं भंडारा जिल्ह्यातील ज्या कार्यालयाला ते भेट देऊन पाहाणी करणार आहेत, किंवा तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आढावा घेणार आहे, अशा कार्यालय प्रमुखांमध्ये कमालीची धावडपळ बघायला मिळाली. विकास खारगे हे भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप विभागापासून त्यांचा दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. राज्याचे अपर मुख्य सचिव दौऱ्यावर येत आहे म्हटल्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झोप उडणार नाही तर, नवलचं....सायंकाळी ५.३० वाजतानंतर नेहमी ओस पडणारं भंडाऱ्याचं भूमी अभिलेख कार्यकाय रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा रात्री उशिरापर्यंत कार्यालय नीटनेटक, स्वच्छ आणि फाईलांचा बंदोबस्त करतानाचं दृश्य समोर आलं.
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृह पुन्हा सुरू होणार ?
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबत पालिका प्रशासनाची बैठक
माशी, प्लास्टिकचा धागा आणि अस्वच्छता आढळल्याने १० दिवसांपासून उपाहारगृह बंद
एफडीएच्या निर्देशानुसार उपाहारगृह चालकाकडून नियमांची पूर्तता करण्यात येणार
नवा डिजिटल तापमान दर्शवणारा फ्रिज, कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचे रिपोर्ट आणि स्वच्छतेचे वेळापत्रक अपडेट तसेच वेज-नॉनवेज स्टिकरसह कामगारांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण
पुढील आठवड्यात एफडीए पथकाची पाहणी करण्यात येणार, तर तपासणीनंतर उपाहारगृह पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय होणार
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावाचा संपर्क तुटला...
गावाला चारही बाजूने पाण्याने वेडल्याने गावाला बेटाचे स्वरूप आले आहे...
50 ते 6 कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले
पुरात ईर्टिगा कारसह तीनजण वाहून गेली
पती बचावला, पत्नी व दोन चिमुकल्या मुली बेपत्ता
दहेली येथील कुपटी नदीच्या पुलावरील दुर्घटना
पुराच्या पाण्याचा अंदाज चुकल्याने घडली घटना, अविनाश खंडारे झाडावर चढून बचावले
माधवी खंदारे व दोन मुलींचा रात्रीपासून शोध सुरू, लोणीकडे परतताना काळाचा घाला
पूर ओलांडण्याचा प्रयत्न ठरला जीवघेणा, दारव्हा तालुक्यातील दहेली दुर्घटनेने परिसर हादरला
प्रशासनाचे बचाव पथक शोधमोहीमेत व्यस्त
प्राची आणि साची अशा वाहून गेलेल्या दोन्ही मुलीचे नाव आहे
घटनेची माहिती रात्री 3 वाजता माहिती मिळताच पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला तत्काळ मदतीचे आदेश दिले
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना आज मध्यरात्री सुमारे 3 वाजता मौजा दहेली येथील कुट्टी नदीवरील पुलावर घडलेल्या दुर्घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच पालकमंत्री महोदयांनी तातडीने संबंधित पोलीस व महसूल प्रशासनाशी संपर्क साधून घटनास्थळी त्वरित मदत व बचावकार्य सुरू करण्याचे आदेश दिले.
विदर्भात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय.. मागील २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात २४० मिलीमीटर, तर चंद्रपूर जिल्ह्यात २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.. नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि हिंगणा तालुक्यातही १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली...अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट तर चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे..
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश