Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट उघडकीस आला आहे.

पार्श्वभूमी
Maharashtra Live Breaking Marathi News: दिल्लीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट उघडकीस आला आहे. संशयित दहशतवादी हमीम मंडलच्या चौकशीतून हा खुलासा झाला...More
नाशिक : पावसाळी पर्यटनाच्या नावाखाली त्र्यंबकेश्वर आणि पहिने परिसरात धिंगाणा घालणे, मद्यपान करून लोकांना त्रास देणे आणि महिलांची छेड काढणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना स्थानिक पोलिसांनी चांगलाच दंडुक्याचा प्रसाद दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.पहिने व त्र्यंबकेश्वर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, अशी मागणी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी यापूर्वी केली होती.
पुणे शहरातील काळेपडळ परिसरात अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिवशी मध्यरात्री मॉडिफाईड सायलेंसर लावलेल्या बुलेट आणि इतर दुचाकींमधून फटाक्यासारखे कर्णकर्कश आवाज करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांविरोधात काळेपडळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून ११ बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच मॉडिफाईड सायलेंसर बसविणाऱ्या तीन गॅरेजवरही कारवाई करत ती सील करण्यात आली आहेत.
पुण्यातील न्याती चौक, उंड्री आणि मोहम्मदवाडी परिसरात काही तरुण मॉडिफाईड सायलेंसर लावलेल्या बुलेट आणि इतर दुचाकींवरून फटाक्यासारखे मोठे आवाज करत भरधाव आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओंची दखल घेत काळेपडळ पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संबंधित तरुणांचा शोध घेत कारवाई केली. या कारवाईत १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून ११ बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय मॉडिफाईड सायलेंसर बसविणाऱ्या तीन गॅरेज चालकांविरुद्धही कारवाई करण्यात आली. संबंधित गॅरेजमधून वाहनांवरील कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर काढून नष्ट करण्यात आले असून गॅरेजही सील करण्यात आले आहेत. नागरिकांची शांतता भंग करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील स्वप्नलोक सोसायटीमध्ये एकाच रात्री पाच घरांमध्ये घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरमालक वैयक्तिक कामानिमित्त बाहेर गेले असताना चोरट्यांनी बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून चोरी केली.
पाचपैकी तीन फ्लॅटमधून चोरट्यांनी 62 हजार 500 रुपयांची रोकड आणि 5 लाख 68 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 6 लाख 39 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. उर्वरित दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.
घरमालकांच्या फिर्यादीनंतर भोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भोर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
भंडारा : जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजाचे दरवर्षी सुमारे १५ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान होत असल्याचा आरोप करत सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने भंडाऱ्यातून 'मंडल जनगणना यात्रा' सुरू करण्यात आली. ही यात्रा विदर्भातील ११ जिल्ह्यांत जाणार आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या यात्रेत सहभागी झाले. मात्र, ओबीसींचे प्रमुख नेते आणि भंडारा जिल्ह्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यांना यात्रेची माहिती देण्यात आली होती का, याबाबतही संभ्रम व्यक्त केला जात आहे.
जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा
उधळपट्टी थांबवा ; जनतेच्या कामांवर फोकस करा
इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी
सभागृह नेते गणेश खणकर यांनी मांडला होता प्रस्ताव
चौफेर टीकेनंतर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की
विश्वसनीय सूत्रांची माहिती
ठाण्यातील चार युवक रायगड जिल्ह्यातल्या केपी वॉटरफॉलवर फिरण्याकरिता आले होते मात्र माघारी परतत असताना या मधील अभिषेक कुसवाहा (वय २३) या तरुणाचा एका सेल्फीच्या नादात निसरड्या ठिकाणी पाय घसरला आणि तो सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळला. त्यानंतर रात्री उशिरा पर्यंत त्याच्यासोबत असणाऱ्या साथीदारांनी स्थानिक ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर खोपोली पोलीस, आणि हेल्प फाउंडेशन यांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. अखेर पहाटे चारच्या सुमारास अभिषेकचा मृतदेह सापडला.यानंतर धोकादायक पर्यटनस्थळी सेल्फी आणि रिल्सचा मोह जीवघेणा ठरू शकतो. पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पालन करावे अस आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ठाणे- कोपरी ब्रिज आणि आनंद नगर टोल नाक्या दरम्यान सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याची चाळण
पिक आवरला खड्ड्यात पडून दुर्घटना होऊ नये यासाठी ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी ठिकठिकाणी खड्ड्यांच्या भोवती लावली बॅरिगेट्स
ठाणे महापालिकेचे काम करताय ट्रॅफिक पोलीस
खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने सकाळपासून दोन ते तीन व्यक्ती या खड्ड्यात पडले
वाशिममध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण देणार मविआला धक्का
मोठ्या संख्येने सरपंच, ग्रामपंचायत सदस्य करणार भाजपात प्रवेश
मिनी विधानसभा असलेल्या ग्रामपंचायत ताब्यात घेण्यास भाजपकडून सुरुवात
आज दुपारी ३ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात होणार पक्षप्रवेश
पिक विमा योजनेतील त्रुटी वरून ओमराजे निंबाळकर यांचा सरकारला घरचा आहेर
अतिवृष्टीचा निकष विमा कंपन्या आणि राज्य सरकारमध्ये असता तर एकही मंडळाला आम्हाला विमा द्या म्हणायची वेळ आली नसती
धाराशिव जिल्ह्यात एकदा नाही एक मंडळात चार चार वेळा अतिवृष्टी झाली
चार ट्रिगरचा समावेश पीकविमा कंपनी आणि राज्य सरकारचा करार झाला त्यामध्ये असायला हवा, अन्यथा शेतकऱ्यावर अन्याय होईल
ट्रिगरचा समावेश नसल्याने विमा योजनेतून धाराशिवमधील 14 मंडळ वगळली गेली
महायुतीमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मी तीच मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती
सरकारने कर्जमाफी करताच, शेतकरी पुत्राने तब्बल दहा महिन्यानंतर घातली पायात चप्पल
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नसल्याचा शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांनी केला होता प्रण
गतवर्षीच्या विजयादशमीपासून फिरत होते दुधगावकर अनवाणी पायांनी
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याने धाराशिवच्या दहिफळ येथील सन्मान कार्यक्रमात दुधगावकरांनी आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांच्या हातून घातली अनवाणी पायात पादत्राणे
कर्जमाफीसाठी दहा महिन्यापासून चप्पल न घालता फिरणाऱ्या शेतकरी पुत्राला इथून पुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील लढ्यासाठी साथ देणार असल्याचा गावकऱ्यांनी केला संकल्प
पुण्यात पोलिस व्हॅनचा भीषण अपघात
सदाशिव पेठेत सात वाहनांना जोरदार धडक
दोन दिवसांपूर्वी घडला होता सदाशिव पेठेत अपघात
अपघाताचा CCTV समोर
अपघातात कार आणि दुचाकींचे मोठे नुकसान
सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही किंवा कुणीही जखमी नाही
व्हॅनने एकामागोमाग सात वाहनांना दिली धडक
पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती नाही
जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात दोन तीन दिवसात पंचनामे पूर्ण करून एनडीआरएफच्या नियमानुसार मदत केली जाणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल आहे. पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, तसेच काही अंशी यावल आणि रावेर या भागांमध्ये अतिवृष्टी झाली. अनेक वर्षानंतर मोठ्या प्रमाणात नदी झाल्यानंतर पूर आले. त्यामुळे मोठं नुकसानही त्याठिकाणी झाला आहे. वॉल कंपाऊंड तुटल्यामुळे अमळनेरमध्ये व्यापारी संकुलात पाणी आलं आणि त्या ठिकाणी धान्य व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 50 ते 55 जनावर वाहून गेलीत, तीन-चार जणांचा मृत्यू झालाय. बऱ्यापैकी नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेय. शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वांचे पंचनामा करण्याचे आदेश तातडीने देण्यात आले आहेत. सर्व पंचनामे होत आहेत. दोन-तीन दिवसात सर्व पंचनामे होतील आणि जेएनडीआरएफच्या निकषानुसार मदत देतायेईल ती सर्वांना देण्यात येईल. अशीप्रतिक्रिया गिरीश महाजन यांनीदिली.
लिफ्टमध्ये अडकलेल्या पाच जणांची सुखरूप सुटका
पुण्यातील दत्तनगर कात्रज परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टमध्ये पाच जण अडकले होते
अडकलेल्यांमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश होता.
काल संध्याकाळी 6:30 वाजता घटना घडली
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाने हायड्रॉलिक उपकरणांच्या साहाय्याने लिफ्ट उघडली.
सर्व पाच जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी या वर्षाच्या अखेरीस डोंबिवलीकरांना वाहतुकीचा एक नवा पर्याय मिळणार असून, राज्य सरकारने मोठागाव जेट्टीवरून रो-रो फेरी, वॉटर टॅक्सी आणि वॉटर मेट्रो सेवांचा पहिला टप्पा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.एमएमआर जलवाहतूक नेटवर्कच्या दृष्टीने मोठागाव रो-रो जेट्टीच्या अप्रोच रस्त्याचे भूमिपूजन पार पडले.
मोठागाव गणेश घाटाशी जोडणारा हा अप्रोच रस्ता सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी आणि वाहनांना जेट्टीवर जाण्यासाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
कल्याण-वसई जलमार्ग उल्हास नदी आणि वसई खाडीतून नॅशनल वॉटरवे-५३ चालवला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकल्पासाठी मोठा निधी मंजूर केला आहे. यामध्ये टर्मिनल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अतिरिक्त १०० कोटी रुपये आणि मोठागाव पॅसेंजर जेट्टीसाठी सुमारे २२ कोटी रुपये समाविष्ट आहेत.
हा प्रस्तावित जलमार्ग कल्याण, डोंबिवली मोठागाव अंजूर दिवे, कलहेर, कोलशेत, पारसिक, नागला बंदर, घोडबंदर आणि वसई यांना जोडणार असून, प्रवाशांना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा अडथळा दूर होणार आहे
पुणे विमानतळावर रविवारी हवाई वाहतुकीचा नवा इतिहास
एका दिवसात 216 विमानांची उड्डाणं
विमानतळावरील उड्डाणांनी द्विशतक गाठलं
33 हजारहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास
एकदाही गो राऊंड करावा लागला नाही
सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर येलो अलर्ट देण्यात आला आहे..धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा, कोयना आणि वेण्णा नद्यांना दुतडी भरून वाहत आहेत.. साताऱ्यातील संगम माहुली परिसरातील छत्रपती शाहू महाराज यांची समाधीला पाण्याने वेडा घातला आहे..साताऱ्याची भाग्यलक्ष्मी असलेल्या *कोयना धरणातील पाणीसाठा 91.42 टीएमसीवर पोहोचला आहे.* पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांपर्यंत खाली आणून एकूण 30 हजार 223 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जाणार आहे.तर धोममधून कृष्णेत 6 हजार, तर कन्हेरमधून वेण्णेत 2 हजार 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत असून काही पूल पाण्याखाली गेले आहेत.पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी धरणातील पाण्याचा विसर्ग कायम असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे
- नागपुरात मागील तीन महिन्यात ३२ खुनाच्या घटना.. त्यामुळे कायदा सुव्यवस्था ऐरणीवर..
- गेल्यावर्षी याच कालावधीत २४ खून झाले होते. यंदा या तीन महिन्यात ८ खुनाच्या घटनेत वाढ..
- यंदा वर्षभराच्या आकडेवारीत आतपर्यंत ५७ खून झाले असून गेल्यावर्षी याच कालावधीत हा आकडा ५२ होता..
- यंदाचा मे महिना नागपुरसाठी सर्वाधिक रक्तरंजित ठरला. या महिन्यात तब्बल १५ खून झाले.. त्यानंतर जुनमध्ये ७ खून झाले तर जुलै मध्ये १० खून झाले..
धरणांमध्ये 90 टक्के पाणीसाठा; मुंबईकरांवरील 10 टक्के पाणी कपात कधी हटणार?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये पाणीसाठा आता 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. समाधानकारक पावसामुळे धरणांमधील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत असली, तरी मुंबईकरांवरील 10 टक्के पाणी कपात अद्याप कायम आहे.
महापालिका प्रशासनाकडून धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, पुढील काही दिवसांचा पावसाचा अंदाज आणि पाण्याचा वापर याचा आढावा घेतला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत 10 टक्के पाणी कपात मागे घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
धरणांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने मुंबईकरांना पाणी कपातीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आता प्रशासनाकडून नेमका काय निर्णय घेतला जातो, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आलीये. कुंभमेळा मंत्रांकडून प्रशासनासोबत सलग झालेल्या बैठकांनंतर आता प्रशासनही खडबडून जागं झालंय.. रस्ते दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी खड्डेमय रस्त्यांची पाहणी केलीये.. महापालिका आयुक्तांनीही शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केलीये...नाशिककरांना ३ ते ४ महिन्यात संपूर्ण रस्ते सिमेंट काँक्रिटचे पाहायला मिळतील, अशी ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी दिलीये..
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी