= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोंढव्यातील मिठानगरमध्ये टोळक्याने वाहनांची तोडफोड करून माजविली दहशत; पोलिसांकडून 3 अल्पवयीन ताब्यात कोंढव्यातील मिठानगरमध्ये टोळक्याने वाहनांची तोडफोड करून माजविली दहशत
घटनेचा वीडियो समोर
पोलिसांकडून 3 अल्पवयीन ताब्यात
अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. त्याचा राग चौघा जणांच्या टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या कोंढव्यातील मिठानगर येथील वाहनांवर काढला. ३ रिक्षा आणि २ कारच्या काचा फोडून त्यांनी परिसरात दहशत माजविली. कोंढवा पोलिसांनी रात्रीतून चौघांपैकी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
काल शनिवारी मध्यरात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास ३ ते ४ जण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी हा गोंधळ घातला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Beed News: दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या बीडच्या आहेर धानोरा गावातील महिलांनी दारू विक्रीविरोधात आक्रोश करत थेट पोलिस अधीक्षक कार्यालयावर ठिय्या दिला. दारूमुळे गावातील सामाजिक वातावरण ढासळत असून महिला आणि तरुणींना त्रास सहन करावा लागत असल्याचा महिलांचा आरोप आहे. याआधी जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन मागणी केली होती. मात्र दारूबंदीवर काहीच हालचाल न झाल्याने महिलांनी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. आंदोलनकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टीमेटम देत, दारूबंदी न झाल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, 15 ऑगस्टला पालकमंत्री अजित पवारांकडेही महिलांनी दारू बंदीची मागणी केली होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वर्ध्याच्या चिंचोली इथं शेतकऱ्याची आत्महत्या; पोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्यानं संपविलं जीवन - वर्ध्याच्या चिंचोली इथं शेतकऱ्याची आत्महत्या
- पोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्यानं किटकनाशक औषध घेत संपविलं जीवन
- महादेव कुरवाडे असं मृत शेतकऱ्याचं नाव
- अल्पभूधारक शेतकरी असुन त्याच्याकडे अडीच एकर शेती आहे.
- शेतकऱ्याकडे बँकेचे 1 लाख तर खासगी 50 हजाराचे कर्ज
- शेतकऱ्याचा मृतदेह अजूनही शेतातच पडून
- आत्महत्येचे कारण अद्यापी गुलदस्त्यात
- आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पोळ्यानिमित्त अनोखी परंपरा, एक एक बोटाने उचलला तब्बल 100 किलो दगड छत्रपती संभाजीनगर: राज्यभरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला मात्र छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पोळा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. पोळा सणानिमित्त एक घर पाडळी येथील बुरा दिन बाबा यांच्या प्रसिद्ध दर्ग्यासमोर 100 किलो वजनाचा दगड आहे. हा दगड बारा जणांनी एक एक बोट लावून उचलत पोळा सण साजरा केला. अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे. या परंपरेतील वैशिष्ट्य म्हणजे बारापेक्षा एक व्यक्ति देखील अधिक झाला तर दगड उचलला जात नाही असे या गावचे ग्रामस्थ सांगतात. ग्रामस्थांनी दगड उचलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गावर कोसळली दरड; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली असून रस्त्यावर आता चिखल आणि राडारोडा पसरलाय. पुरंदर किल्ला हा सध्या सैनिकांच्या ताब्यात आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता देखील बनवण्यात आलेला आहे.. या किल्ल्यावर दररोज अनेक शिवभक्त भेट देत असतात. पर्यटक देखील या किल्ल्यावर मोठ्या संख्येने येत असतात. मात्र मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील जमिनीची पकड सैल झाली असून रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्यावर एका ठिकाणी दरड कोसळली असून यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही. हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. सकाळी गडावर जाणाऱ्या काही स्थानिक लोकांच्या निदर्शनास ही गोष्ट आली आहे. त्यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे.. तर याबाबतचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलढाणा जिल्हा परिषद सेवेत असलेल्या 199 महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; लवकरच कारवाई बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या 199 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी या सर्व महिलांना अपात्र ठरवून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी दिला आहे. त्यामुळे शासकीय सेवेतील या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; कोकणकंन्या तब्बल 3 तास उशिरा रत्नागिरी- ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
गणेशोत्सवाच्या जादा रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळे कोलमडलं वेळापत्रक कोलमडलं
कोकणकंन्या तब्बल 3 तास उशिरा, तुतारी एक्स्प्रेस एक तास 30 मिनिटे, राजधानी एक्सप्रेस 4 तास, उशिरा
पनवेल सावंतवाडी तब्बल साडेतीन तास उशिरा, CSTM गणपती स्पेशल दोन तास, ltt सावंतवाडी गणपती स्पेशल दोन तास उशिराने
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे 325 हून अधिक फेऱ्या
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बंधाऱ्यात वाहून गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृतदेह सापडला; पोळ्याच्या दिवशीचं शेतकरी कुटुंबावर दुःखाचं डोंगर शेतातील पाळीव जनावरं आणण्याकरिता बंधारा ओलांडून जात असताना पाण्याच्या प्रवाहात तरुण शेतकरी किसन गायधने (३८) हा वाहून गेला होता. पोलीस, स्थानिक मच्छीमार बांधव आणि बचाव पथकानं शोधकार्य राबविला. बंधाऱ्यापासून 2 किमी अंतरावर किसनचा मृतदेह आढळून आला. पोळ्याच्या दिवशीचं शेतकरी कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.

संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून नोकरीस लागलेल्या तरुणाची राहत्या घरी आत्महत्या; दोन संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल परळी : वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरीस लागलेल्या तरुणाला संस्थाचालकाने अपमानास्पद वागणूक दिल्याने त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना परळी तालुक्यातील नंदागवळ येथे घडली. या प्रकरणात दोन संस्थाचालकांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनाथ गोविंद गित्ते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
श्रीनाथ चे वडील गोविंद गित्ते हे केज येथील साने गुरुजी आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. 2010 मध्ये त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर 2016 पासून गित्ते कुटुंब श्रीनाथ याला अनुकंपा तत्वावर नोकरीस घ्यावे अशी विनंती साने गुरुजी आश्रम शाळेच्या उद्धव कराड यांच्याकडे करत होते.. परंतु त्याने गित्ते कुटुंबाची विनंती मान्य न करता त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.. यानंतर गित्ते कुटुंबाने प्रशासन दरबारी पाठपुरावा करत परळीत असलेल्या वसंत नगर तांडा येथील आश्रम शाळेत नोकरी मिळण्याबाबत ऑर्डर मिळवली.
संस्थाचालक संजय राठोड यांनी देखील गित्ते कुटुंबाला त्रास दिला. तसेच श्रीनाथ याला अपमानास्पद वागणूक देत अतिरिक्त काम करण्यास भाग पाडले.या सर्व प्रकाराचा ताण सहन न झाल्याने श्रीनाथ याने दिनांक 22 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आता परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय राठोड व उद्धव कराड या दोन संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी ग्रामीण पोलिस करत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांची धावपळ नाशिक महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मनपा प्रशासन ऍक्शन मोडवर
- रात्री उशिरापर्यंत प्रभाकर रचना लावण्याचे काम करण्यात आले
- प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांची धावपळ
- नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन येथील मुख्यालयात प्रभाग रचना लावण्याचे काम
- नागरिकांना सूचना आणि हरकती मांडण्यासाठी मनपाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली प्रभाग रचना
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भंडाऱ्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलीवर अत्याचार घराशेजारी राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला विविध प्रलोभन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यात तिला दिवस गेल्यानं ती गर्भवती राहिली. कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आली. मात्र, समाजात बदनामी होईल या भीतीपोटी त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगडमध्ये लाचखोरी प्रकरणी यशस्वी सापळा रायगड जिल्हा परिषदेतील दोन लोकसेवक आणि एका खाजगी ठेकेदाराला लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडलं आहे.२५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पेण तालुक्यातील शेणे गावात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेचे सबंधित ठेकेदाराला पैसे काढण्यासाठी बिल मंजुरी करून घेण्यास 35 ही लाचेची मागणी करण्यात आली. त्यामधील 25 हजारावर तडजोड करत असताना या तिघांना रंगेहाथ पकडून ही कारवाई करण्यात आली.