Maharashtra Live Blog Updates: मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली. मात्र जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात. राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलंय. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची निवड करण्यात आली. याआधी चंद्रकांत पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते. जातप्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिय सुरळीत राबवणे, मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणे आदी गोष्टी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेत असणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तर राज्यभरात पावसाने सध्या विश्रांती घेतल्याचं दिसून येत आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
कोंढव्यातील मिठानगरमध्ये टोळक्याने वाहनांची तोडफोड करून माजविली दहशत; पोलिसांकडून 3 अल्पवयीन ताब्यात
कोंढव्यातील मिठानगरमध्ये टोळक्याने वाहनांची तोडफोड करून माजविली दहशत
घटनेचा वीडियो समोर
पोलिसांकडून 3 अल्पवयीन ताब्यात
अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. त्याचा राग चौघा जणांच्या टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या कोंढव्यातील मिठानगर येथील वाहनांवर काढला. ३ रिक्षा आणि २ कारच्या काचा फोडून त्यांनी परिसरात दहशत माजविली. कोंढवा पोलिसांनी रात्रीतून चौघांपैकी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
काल शनिवारी मध्यरात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास ३ ते ४ जण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी हा गोंधळ घातला.
Beed News: दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या
बीडच्या आहेर धानोरा गावातील महिलांनी दारू विक्रीविरोधात आक्रोश करत थेट पोलिस अधीक्षक कार्यालयावर ठिय्या दिला. दारूमुळे गावातील सामाजिक वातावरण ढासळत असून महिला आणि तरुणींना त्रास सहन करावा लागत असल्याचा महिलांचा आरोप आहे. याआधी जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन मागणी केली होती. मात्र दारूबंदीवर काहीच हालचाल न झाल्याने महिलांनी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. आंदोलनकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टीमेटम देत, दारूबंदी न झाल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, 15 ऑगस्टला पालकमंत्री अजित पवारांकडेही महिलांनी दारू बंदीची मागणी केली होती.























