Maharashtra Live Blog Updates: मोठी बातमी! वडेट्टीवार गटाने गट नोंदणी संदर्भातील याचिका घेतली मागे; विभागीय आयुक्तांना पत्र
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: अखेर 32 तासांनंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पूर्ववत झालीये. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमधल्या वाहतुकीचा वेग वाढावा म्हणून नव्वदच्या दशकात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बांधण्यात आला...More
चंद्रपूर : महानगरपालिकेचं उपमहापौर पद हे वडेट्टीवार गटाला देण्याचं निश्चित झाल्यानंतरही धानोरकर गटाकडून राहुल चौधरी यांचा उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल... वडेट्टीवार गटाकडून वसंता देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल चौधरी यांनी देखील दाखल केलाय उमेदवारी अर्ज, उपमहापौर पदासाठी वडेट्टीवार आणि धानोरकर गटाकडून उमेदवार देण्यात आल्याने काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतरही शमली नसल्याचं चित्र
भाजप मुंबई महापालिका गटनेते गणेश खणकर यांनी केली पाहणी
भाजप नगरसेवकांसोबत महापालिकेतील नव्या पक्ष कार्यालयाची केली पाहणी
मुंबई महापालिकेतील नव्या कार्यालयाचा भाजप नेते उद्या घेणार ताबा
७ फेब्रुवारीला भाजपचा उमेदवार याच कार्यालयातून महापौर पदाचा अर्ज दाखल करणार
वडेट्टीवार गटाने आपली गट नोंदणी संदर्भातील नागपूर खंडपीठात दाखल केलेली याची मागे घेतली ..
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने चंद्रपूर महापालिकेसाठी राजेश अडूर हे पक्षाचे गटनेते राहतील हे विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून कळविले आहे...
त्यामुळे याचिकाकर्त्यांपैकी एक राजेश अडूर हे गट नेता होण्याचा मार्ग मोकळा झाला , त्यामुळे याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले
काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची व्यक्तिगत पडताळणी आधीच पूर्ण झालेली असताना आता काँग्रेसने एकच गटने त्याचं नाव समोर दिल्यामुळे काँग्रेसची गट नोंदणीची प्रक्रिया मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे
मंत्रालयातील उपहारगृहात आता अॅल्युमिनियम ऐवजी स्टीलची भांडी वापरणार
स्टील भांडी खरेदीसाठी ५ लाख रुपयांची तरतूद
इलेक्ट्रिक इंडक्शन शेगडीसह मायक्रोवेव्ह ओव्हन देखील खरेदी करणार
स्टील डब्यासह राईस जाळी, परात अशी सर्व भांडी स्टीलची वापरली जाणार
अखेर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने चंद्रपूर महापालिकेसाठी राजेश अडूर हे पक्षाचे गटनेते राहतील हे विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून कळविले आहे...
त्यामुळे काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची व्यक्तिगत पडताळणी ( डॉक्युमेंट्स तपासणी ) आधीच पूर्ण झालेली असताना आता काँग्रेसने एकच गटने त्याचं नाव समोर दिल्यामुळे काँग्रेसची गट नोंदणीची प्रक्रिया मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे...
पुणे जमीन गैरवर प्रकरणांची चौकशी करण्यासाठी ज्या समितीला नेमण्यात आलं होतं त्या खरगे समितीने पार्थ पवार यांना क्लीन चीट दिल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीत दोषींवर कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे. असं म्हणत या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. कंपनी ऍक्ट नुसार पार्थ पवार यांना या प्रकरणातून बाजूला ठेवता येणार नसल्याचं सांगत ,जमीन खरेदिचा दस्त नोंदविताना अनियमित झाली हे स्पष्ट असेल तर मग या व्यवहासाठी जबाबदार कोण ?असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रसाशन घेतं का? हा प्रश्न आहे - राज ठाकरे
विधानसभा आणि विधानपरिषद आमदार जाणार लंडन दौऱ्यावर
या दौऱ्यात एकूण १५ आमदार सहभागी होणार असून भाजपकडून विक्रांत पाटील आणि निरंजन डावखरे, शिवसेनेकडून मनीषा कायंदे तर उबाठाकडून सरदेसाई यांचा समावेश
लंडनमधील प्रशासकीय कामकाजाचा करणार अभ्यास
नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांचा करणार अभ्यास
विधिमंडळाचा अभ्यास दौरा आयोजित
१५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान हा दौरा पार पडणार
या भेटीत शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला जाणार
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे पवार कुटुंबीयांची बैठक?
बैठकीला शरद पवार, पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार राहणार उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती
विविध विषयांवर बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला हजेरी लावतात का? याकडे सर्वांचे लक्ष
पुण्यातील गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरण
तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरील कारवाईला स्थगिती
दीनानाथ रुग्णालयाच्या विश्वस्तांवर फौजदारी तक्रार दाखल करण्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने दिली तात्पुरती स्थगिती
मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकार सह इतरांना नोटीस
मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे मागवला अहवाल
21 फेब्रुवारी पर्यंत नोटीसीला उत्तर द्या असे राज्य सरकारला न्यायालयाचे आदेश
आज अर्ध्या पुणे शहराची बत्ती होणार गुल
आज सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत पुणे शहरातील बहुतांश परिसरात वीजपुरवठा राहणार बंद
पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील काही परिसरात वीज पुरवठा उद्या राहणार बंद
वीजपुरवठा महावितरण कंपनीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा राहणार बंद
महावितरण विभागाकडून निवेदन प्रसिद्ध
अजित पवारांच्या अपघाताबाबत महत्त्वाची अपडेट
विमानातील "ब्लॅक बॉक्स" मधील माहिती रिक्व्हर करायला सुरुवात
"ब्लॅक बॉक्स" मधील महत्त्वाची माहिती रिक्व्हर करायला सुरुवात
"डेटा रिकव्हरी" केल्यानंतर नागरी विमान महासंचनालय कडून अहवाल जारी केला जाणार
या अहवालातून अपघाताची माहिती समोर येणार
- राज्यातील राखीव वनक्षेत्र, अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्पात असलेल्या वनखात्याच्या विश्रामगृहात मांसाहारास परवानगी देण्याची मागणी थेट मंत्र्यांनी केली आहे
- महायुती सरकारमधील राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी त्यासंदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे गेल्या वर्षी पत्र पाठवत मागणी केली होती..
* त्यानंतर आता प्रधान वन संरक्षकांच्या कार्यालयाने त्यासंदर्भात वन विभागातील सर्व अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्या संदर्भात काय निर्णय घ्यावा असे अभिप्राय तातडीने मागितले आहे...
- मुळात वन खात्याच्या अख्यारितील विश्रामगृहात मांसाहार व मद्यपानास धोरणात्मक बंदी घालण्यात आली आहे..
- मात्र त्यामुळे बहुतांशी पर्यटक वन विभागातील विश्रामगृहात मांसाहार करता येत नाही, यामुळे खाजगी रिसॉर्ट आणि हॉटेल्स मध्ये थांबतात.. त्यामुळे वन विभागाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम येतो... अगदी विश्रामगृहाचा साधा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च सुद्धा भागत नाही
- त्यामुळे गेल्या वर्षी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी वन मंत्री गणेश नाईक यांना पत्र पाठवत वनविभागातील विश्रामगृहात मांसाहार ची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती...
- त्याच पत्रात आशिष जयस्वाल यांनी मद्यपानास बंदी कायम ठेवा, पण मांसाहारावरील बंदी हटवा अशी मागणी केली होती...
- त्या संदर्भात वन विभागाने आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतला नव्हता... आता मात्र अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षकांनी सर्व प्रमुख वन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून यासंदर्भात काय निर्णय घ्यावा असे अभिप्राय मागितले आहे..
एनसीपी राष्ट्रीय अध्यक्ष निवड पुढल्या एक महिन्याच्या आधी करण्याच्या हालचाली - सूत्र
अर्थसंकल्प अधिवेशन कालावधीतच एनसीपी अध्यक्ष निवडणूक पार्टी अंतर्गत करण्याच्या हालचाली-सूत्र
पार्टीचे पत्र राज्यातील पदाधिकारी तसंच राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या सहमतीने सुनित्रा पवार यांची निवड बिनविरोध होणार - सूत्र
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या जिल्हा परिषद निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांच्यावर सडकून टोलेबाजी केली होती याला त्याच भाषेत आमदार अभिजीत पाटील यांनी उत्तर दिल्यानंतर आता पालकमंत्री थोडे बॅकफूटवर गेल्याचे चित्र असून काल रात्रीच्या सभेत अभिजीत पाटील यांना जरा दमान घेण्याचा सल्ला गोरे यांनी पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे जाहीर सभेत दिला.
या संपूर्ण निवडणुकीत गोरे आणि आमदार अभिजीत पाटील यांची जुगलबंदी हा जिल्ह्यात चर्चेचा विषय होता. सुरुवातीला शांत असणाऱ्या अभिजीत पाटील यांनी परत गोरेंची तशा शब्दात खिल्ली उडवायला सुरुवात केल्यावर काल अखेरच्या टप्प्यात पालकमंत्री बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले.
तुला अजून लय पुढं जायचं आहे अजून टाईम आहे .. एवढ्या लवकर गाडी एवढ्या वेगाने गेली ना की काय होतं माहिती आहे ... एवढी गडबड बरी नव्ह .. असा सल्ला गोरे यांनी अभिजीत पाटील यांना दिला.
माझ्यावर टीका करायचे करा पण जरा बेताने बोलावं असे म्हणत आमची लढाई इथं विकासाची आहे कोणा चिल्लर माणसाशी नाही .. अनेक लोकांना भ्रम झाला आहे असे सांगताना लोकशाहीने त्यांना निवडून दिले हे आम्ही स्वीकारले .. असल्याचेही गोरे यांनी सांगितले
कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रेडिट मार्क
नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय
नाशिक मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात वेगवेगळ्या कामांमध्ये योगदान देऊन प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट मार्क देण्यात येणार
दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा यंदा नाशिकमध्ये होणार आहे.
कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक जमणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी नियोजन कराव लागत.
वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, सीसीटीव्ही, गर्दी, आपत्ती व्यवस्थापन, संशोधन, पर्यावरण या सारख्या अनेक प्रकारच्या कामांसाठी प्रशासन आणि पोलिसांना विद्यार्थी मदत करू शकतात. त्यामुळे विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे
किमान ६० तास काम करणे आवश्यक आहे आणि क्रेडिट सोबत विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी
आज पर्वती परिसरात ७ तास वीजपुरवठा बंद राहणार
महावितरणची देखभाल आणि दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद राहणार
सकाळी १०:३० ते ५:३० वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार
शिवसेना ठाकरे गट सुद्धा महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार?
भाजप आणि शिंदे शिवसेनेचे संख्याबळ जास्त असताना सुद्धा शिवसेना ठाकरे गट सुद्धा महापौर उपमहापौर पदाचा उमेदवार देण्याची शक्यता आहे
7 फेब्रुवारीला शिवसेना ठाकरे गट महापौर उपमहापौर पदाचा उमेदवाराचा अर्ज भरणार का? याकडे लक्ष असेल
या सगळ्या संदर्भात गटनेता किशोरी पेडणेकर व इतर काही अनुभवी नगरसेवकांना बैठकीसाठी मातोश्रीवर बोलवली असल्याची माहिती
संख्याबळ नसलं तरी महापौर उपमहापौर पदाचा अर्ज भरण्याचा ठाकरे च्या शिवसेनेचा विचार सुरू असल्याची माहिती
मुंबई महानगर पालिकेत महापौर भाजपचा बसणार हे जवळपास निश्चित असताना
शिॅदेंच्या शिवसेनेला उपमहापौर आणि सुधार समिती दिली जाणार आहे
यातही आता उपमहापौरपदी महिलेची निवड हे जवळपास निश्चित मानले जात आहे
त्याकरिता पक्षातील दोन वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेविकांची चर्चा असून सुधार समितीचं पद पुरूषांमधून नेमणूक केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती
उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
२०१४ ला तृष्णा विश्वासराव या सभागृह नेत्या होत्या, तर त्याच वेळी महापौरपद हे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असताना
महापौर पदासाठी यामिनी जाधव यांचेही नाव चर्चेत होते. मात्र त्यावेळी स्नेहल आंबेकर यांची निवड झाल्याने जाधव यांना महापौर पदानं हुलकावणी दिली होती
आता या पदी शिंदे कोणाची नेमणूक करतात हे पाहणे महत्वाचे
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील गॅसचा टँकर 32 तासांनी हटवण्यात आला. त्यानंतर मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण मळवली जवळ एक ट्रक बंद पडलाय तसेच अनेक अवजड वाहनांचे चालक झोपी गेल्यानं कामशेत जवळ वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. आता महामार्ग पोलीस झोपी गेलेल्या वाहन चालकांना उठवून गाड्या पुढं काढण्याचे प्रयत्न करतायेत. त्यामुळं आडोशी बोगड्याजवळ वाहतूक सुरळीत असली तरी प्रवाश्यांना काहीवेळ ताटकळत बसावे लागले आहे.
लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर येथील डॉक्टरांनी एका 22 वर्षीय मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. मुलीला अंडाशयाच्या मोठ्या ट्यूमरने ग्रासले होते, ज्यामुळे तिच्या जवळजवळ संपूर्ण पोटात वेदना आणि अस्वस्थता होती.
रुग्ण गेल्या तीन महिन्यातील वाढत्या पोटदुखीची तक्रार घेऊन एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात आली. रुग्णाला असह्य वेदनादेखील होत्या.
तातडीने भरती झाल्यानंतर रुग्णाचे अल्ट्रासोनोग्राफी आणि एमआरआय तपासणीसह सखोल क्लिनिकल मूल्यांकन करण्यात आले.
इमेजिंग अभ्यासातून असे दिसून आले की, जवळजवळ संपूर्ण पोटाच्या पोकळीत एक मोठा अंडाशयाचा (ओव्हेरियन) ट्यूमर होता जो आजूबाजूच्या अवयवांना दाबत होता. निष्कर्ष लक्षात घेता, स्टेजिंग लॅपरोटॉमीची योजना आखण्यात आली.
नुकतीच प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या अनुभवी तज्ञांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या प्रक्रियेदरम्यान, सुमारे 14 किलोग्रॅम वजनाचा उजव्या अंडाशयाचा एक मोठा गोळा पूर्णपणे काढून टाकण्यात आला.
ट्यूमरच्या फ्रोझन सेक्शन विश्लेषणातून बॉर्डरलाईन ओव्हेरियन ट्यूमर असल्याचे दिसून आले. बॉर्डरलाईन ओव्हेरियन ट्यूमर कमी किंवा अनिश्चित घातक क्षमतेचे ट्यूमर असतात आणि तरुण वयात दुर्मिळ असतात. परंतु नंतरच्या वयात त्यांची लक्षणे पुन्हा दिसून येऊ शकतात. रुग्णाचे तरुण वय लक्षात घेता, सर्जिकल टीमने तिच्या भविष्यातील प्रजनन क्षमता जपून ठेवण्यासाठी सर्वोत्तम आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धत निवडली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला तिच्या त्रासापासून लक्षणीय आराम मिळाला आणि ती बरी झाली. तिला स्थिर प्रकृतीत डिस्चार्ज देण्यात आला आणि पुढील मूल्यांकनासाठी तिला नियमित फॉलोअपचा सल्ला देण्यात आला आहे.
मतिमंद तरुणीवर झालेल्या बलात्काराप्रकरणी पाच महिन्यांनंतर अखेर तरुणीच्या वडिलांना अटक
अर्भकाचा डीएनए वडिलांच्या डीएनएशी मॅच झाल्यानंतर अटक
याप्रकरणी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील १७ जणांच्या डीएनए चे नमुने घेण्यात आले होते
सप्टेंबर महिन्यात कफ परेड येथील मतिमंद तरुणीवर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली होती
सुरवातीला तरुणीच्या पोटात दुखत असल्याने तिला कामा रुग्णालयात भरती करण्यात आल असता तपासणी ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आल होत
मुलगी मतिमंद असल्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार नेमके कोणी केले हे तिला सांगत येत नव्हते
तसेच वडिलांनी तक्रार करण्यास दिला होता नकार
पोलिसांनी त्यांनतर सामाजिक संस्थेच्या मानसोपचार तज्ञांच्या मदतीने चित्र काढून तसेच फिंगर डॉल पद्धतीचा वापरून तरुणीचा जबाब नोंदवून घेतला होता
तसेच तरुणीच्या जाबाबानुसार समोर आल्या बाबी आणि उपलब्ध पुरव्यांआधारे परिसरातील ३५ वर्षीय इसमाला अटक करण्यात आली होती तसेच एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होत
याप्रकरणी अटक आरोपीविरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आल आहे
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात पुतणे धनंजय सावंत यांनी बंड करत जिल्हा परिषद आखाड्यात उडी घेतली. भाजपच्या पाठिंबावर तानाजी सावंत यांच्या विरोधात अपक्ष निवडणुकीच्या मैदानात असलेल्या धनंजय सावंतांसाठी मुलगी सखी सावंत निवडणूक प्रचाराच्या आखाड्यात उतरली आहे. माझ्या बापाला कोणीतरी गुरे राख्या म्हटलं, सात तारखेला शेतकऱ्यांच्या गुरे राख्याची ताकद दिसेल. प्रेम करणाऱ्या लोकांसाठी भूमिका घेतली म्हणून माझ्या बापाला ठरवून टार्गेट केला जात असल्याची टीका सखी सावंत यांनी केली. लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी असल्याचा सांगत ही कहाणी कायम राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार अशी चर्चा होतेय. मात्र याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली त्यामुळे याबाबत त्यांना विचारणा होईल असेही सरनाईक म्हणाले. शिवाय महायुती सरकारमध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो सामूहिक रित्या घेतला जातो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार याबाबत निर्णय घेतील असं मत त्यांनी व्यक्त केले. धाराशिव मध्ये जिल्हा परिषद प्रचाराच्या सभेदरम्यान ते बोलत होते.
मतिमंद तरुणीवर झालेल्या बलात्काराप्रकरणी पाच महिन्यांनंतर अखेर तरुणीच्या वडिलांना अटक
अर्भकाचा डीएनए वडिलांच्या डीएनएशी मॅच झाल्यानंतर अटक
याप्रकरणी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील १७ जणांच्या डीएनए चे नमुने घेण्यात आले होते
सप्टेंबर महिन्यात कफ परेड येथील मतिमंद तरुणीवर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली होती
सुरवातीला तरुणीच्या पोटात दुखत असल्याने तिला कामा रुग्णालयात भरती करण्यात आल असता तपासणी ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आल होत
मुलगी मतिमंद असल्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार नेमके कोणी केले हे तिला सांगत येत नव्हते
तसेच वडिलांनी तक्रार करण्यास दिला होता नकार
पोलिसांनी त्यांनतर सामाजिक संस्थेच्या मानसोपचार तज्ञांच्या मदतीने चित्र काढून तसेच फिंगर डॉल पद्धतीचा वापरून तरुणीचा जबाब नोंदवून घेतला होता
तसेच तरुणीच्या जाबाबानुसार समोर आल्या बाबी आणि उपलब्ध पुरव्यांआधारे परिसरातील ३५ वर्षीय इसमाला अटक करण्यात आली होती तसेच एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होत
याप्रकरणी अटक आरोपीविरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आल आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Blog Updates: मोठी बातमी! वडेट्टीवार गटाने गट नोंदणी संदर्भातील याचिका घेतली मागे; विभागीय आयुक्तांना पत्र