Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड

Maharashtra Budget Session 2026: विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा 293 च्या प्रस्तावावरती चर्चा होणार आहे.

मुकेश चव्हाणLast Updated: 04 Mar 2026 02:13 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Budget Session 2026: विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा 293 च्या प्रस्तावावरती चर्चा होणार आहे. विरोधी पक्षाकडून 293 च्या प्रस्तावावर चर्चा करत असताना दावोस दौऱ्यादरम्यान झालेल्या करारासंदर्भात आज आदित्य...More

मेहकर- खामखेड मार्गावरील औद्योगिक क्षेत्र परिसरात आढळला युवकाचा मृतदेह; प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

मेहकर - खामखेड मार्गावरील औद्योगिक क्षेत्र परिसरात आज सकाळी एका 32 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. राहुल बाजड असं मृतकाची ओळख असून तो तालुक्यातील बेळगाव येथील रहिवासी आहे. काल होळीनिमित्त राहुल व त्याची इतर चार मित्र पार्टी करण्यासाठी गेले होते. मात्र राहुलचा आज सकाळी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान प्रेम प्रकरणातून राहुलची हत्या करण्यात आल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला असून पुढील चौकशी मेहकर पोलीस करत आहे. यामुळे मात्र मेहकर परिसरात खळबळ उडाली आहे.