Maharashtra Live Blog Updates: सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, अजित पवार अमर रहेच्या घोषणा

Maharashtra Live Blog Updates: अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे.

मुकेश चव्हाणLast Updated: 31 Jan 2026 07:08 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...More

Sunetra Pawar first reaction : दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन : सुनेत्रा पवार

"आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन."  - सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री