Maharashtra Live Blog Updates: मुंबई शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? BMC सभेत प्रस्तावावर राजकीय खळबळ

Maharashtra Live Blog Updates:

मुकेश चव्हाणLast Updated: 03 Apr 2026 03:41 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथे महापुरूषांच्या पुतळ्यावरून दोन समाजात तणाव निर्माण झालाय. गावातील खेलोबा मंदिर परिसरात पुतळा उभारण्यावरून २ समाज आमनेसामने आले... या वादात लक्ष्मण...More

बार्शीत वैयक्तिक वादातून दोन गटात तुफान हाणामारी  

बार्शीत वैयक्तिक वादातून दोन गटात तुफान हाणामारी  


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून पुन्हा एकदा गुंडगिरी समोर  


जुन्या वादातून दोन गटामध्ये लाठ्या - काठ्यांनी एकमेकांना मारहाण  


बार्शी शहरातील वैदवस्ती परिसरात घडलेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 


तुफान हाणामारी होऊन देखील अद्याप पर्यंत एकमेकांच्या विरोधात पोलिसात कोणतीही तक्रार दाखल नाही

रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने महिलेला चिरडले; महिलेचा जागीच मृत्यू, गोंदिया जिल्ह्याच्या दासगाव येथील घटना

गोंदिया जिल्ह्याच्या दासगाव येथे रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने महिलेला चिरडल्याची घटना घडली... या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला... डांगुर्ली या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असते. दरम्यान आज रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका महिलेला धडक दिली यातच महिलेचा मृत्यू झाला... या मार्गावर रेतीच्या टिप्परमुळे अनेक वेळा अपघात होतात त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर चांगला रोष व्यक्त केला... घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे...