Maharashtra Live Blog Updates: सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार? घडामोडींना वेग

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

मुकेश चव्हाणLast Updated: 30 Jan 2026 03:47 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर (Ajit Pawar Death) त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे असलेली खाती कुणाकडे द्यावीत,...More

Nalasopara Viral Video : ठाकरे बंधूंविरोधातील आक्षेपार्ह पोस्टनंतर मनसैनिकांचा संताप

नालासोपारा : येथे ठाकरे बंधूंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी चोप देत धिंड काढल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित तरुणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत अर्वाच्च भाषेत वक्तव्य करत त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित केला होता. या पोस्टनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी या तरुणाचा शोध घेऊन त्याला राहत्या घरातून बाहेर काढत चोप देत धिंड काढली. या प्रकारावर विविध स्तरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मनसेच्या अधिकृत ‘मनसे रिपोर्ट’ या ट्विटर हँडलवरूनही याबाबत प्रतिक्रिया देत, प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.