Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates Marathi News : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर होणार असून, संपूर्ण राज्याचं लक्ष मंत्रालयाकडं लागलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत सकाळी 11...More
कळव्यातील अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी यांचा शिवसेनेला पाठिंबा
आज कोकण भवन इथे शिवसेनेच्या ७५ नगरसेवकांच्या सोबत उपस्थित राहून पाठिंब्याचे दिले पत्र
प्रमिला केणी या राष्ट्रवादीतून सेनेत आल्या होत्या, मात्र त्यांना तिकीट डावलले होते, त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून शिवसेनेच्याच मनाली पाटील यांचा केला पराभव
महत्वाचे हे आहे की प्रमिला केणी यांच्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या पक्षातील दीपा गावंड यांना माघार घ्यायला लावली होती, आणि प्रमिला केणी राष्ट्रवीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढल्या होत्या, त्यांचा प्रचार स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी केला होता
त्यामुळे आज त्यांनी सेनेला पाठिंबा दिल्याने हा जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का मानला जातोय
परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे एकूण बारा सदस्य विजयी झाले आहेत. त्यानुसार नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटनेता निवडीची प्रक्रिया आज पार पडली परभणी शहरातील भाजप कार्यालयामध्ये शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सौ तिरूमला मिलिंद खिल्लारे यांची सर्वानुमते भाजपच्या गटनेता पदी निवड करण्यात आली आहे. यानंतर शिवाजी भरोसे यांनी सर्व नगरसेवकांनी संघटितपणे कार्य करून परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकाभिमुख निर्णय घ्यावेत, असे आवाहन उपस्थित नगरसेवकांना केले आहे.
नांदेड महापालिकेत 81 पैकी 45 जागा जिंकून भाजपाने एकहाती सत्ता मिळवली, आज आरक्षण सोडतीत नांदेड माहापलिकेचे महापौर पद सर्व साधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. भाजपाकडून सर्व साधारण महिला प्रवर्गातून एकुण 14 उमेदवार निवडून आले आहेत. त्यापैकी चार जणांची नावं महापौर पदासाठी स्पर्धेत आहेत. ज्योती कल्याणकर , सुदर्शना खोमने , वैशाली देशमुख आणि शांभवी साले या चार जणांची नावे सद्या चर्चेत आहेत. अनुभव व तरुणाई या दोन्हीचे मिश्रण केलं तर चांगला अनुभव येईल अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
चाळीसगाव : महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि हरित ऊर्जेच्या भविष्याला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण दावोस (स्वित्झर्लंड) येथे घडला. जागतिक आर्थिक परिषद (World Economic Forum – WEF) 2026 च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करार झाले असून, महाराष्ट्र शासनाने SAF प्रकल्पासाठी अमेरिका स्थित सॅन फॅन्सीस्को येथील ACTUAL HQ या कंपनीशी चाळीसगाव तालुक्यात सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या हरित इंधनाची निर्मिती करणारा हा देशातील मोजक्या आणि जागतिक दर्जाचा महाप्रकल्प चाळीसगाव येथे उभारला जाणार असून, यामुळे तालुक्याच्या औद्योगिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी नोंद होणार आहे.
राज्यात मोठी गुंतवणूक यावी, नव्या उद्योगांना चालना मिळावी आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दावोस येथे उद्योगजगताशी चर्चा करीत आहेत. याच दौऱ्यात चाळीसगाव तालुक्यात मोठा उद्योग यावा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला नवा बाजार मिळावा आणि हजारो युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आमदार मंगेश चव्हाण हे देखील दावोस येथे उपस्थित राहून सातत्याने पाठपुरावा करत होते. वर्षभरापूर्वीच त्यांनी चाळीसगांव येथे मोठा उद्योग येणार असून त्याबाबत बोलणी अंतिम टप्प्यात असून येणारी गुंतवणूक किती मोठी असेल याचा अंदाज देखील कुणी करू शकत नाही असे सूतोवाच केले होते, अखेर आमदार चव्हाण यांनी दिलेला शब्द कृतीत उतरवला असून, चाळीसगावसाठी हा ऐतिहासिक गुंतवणूक करार झाला आहे.
अहिल्यानगर ओबिसी -महिला
1) शारदा ढवण- भाजप
2)पुष्पा बोरुडे-भाजप
3)सुजाता पडोळे -राष्ट्रवादी
4)वर्षा काकडे-राष्ट्रवादी
5)आशाबाई कातोरे-भाजप
6)अश्विनी लोंढे-राष्ट्रवादी
7)आशा डागवाले - राष्ट्रवादी
8) सुनिता फुलसौंदर- राष्ट्रवादी
9)शीतल ढोणे- भाजप
10) वंदना ताठे-भाजप
सोलापूर महापालिकेच्या महापौर पद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झालं आहे. भाजपकडे 49 नगरसेवक हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत. ज्यामध्ये 24 पुरुष आणि 25 महिला विजयी झाल्या आहेत. भाजपकडून महापौर पदासाठी अनेक दावेदार असून त्यामध्ये प्रामुख्याने प्रभाग 12 मधून विजयी झालेले विनायक कोंड्याल, प्रभाग 10 मधून विजयी झालेले प्रथमेश कोठे, प्रभाग 2 मधून जिंकलेले डॉ. किरण देशमुख हे तीन प्रमुख दावेदार आहेत. विनायक कोंड्याल हे महापालिकेत सर्वाधिक मटाधिक्याने निवडून आले असून चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेत. शिवाय आमदार देवेंद्र कोठे यांचे भावजी आहेत. तर प्रथमेश कोठे हे आमदार देवेंद्र कोठे यांचे बंधू असून दुसऱ्यांदा नगरसेवक झालेत. डॉ. किरण देशमुख हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र असून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे भाजप या प्रमुख दावेदारांना संधी देणार की ऐनवेळी धक्कातंत्र वापरून नव्याने एखादा नाव पुढे आणणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल.
नागपूर मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातील महापौर पदासाठीचे प्रमुख दावेदार ..:
1)शिवानी दाणी
2)अश्विनी जिचकार
3) मायाताई इवनाते
4) दिव्या धुरडे
5)नीता ठाकरे
मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेत महापौर पदाच आरक्षण हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी निघालं असून, या खुल्या प्रवर्गासाठी मराठी चेहरा म्हणून, तसेच शिवसेना शिंद गटाचे जिल्हाप्रमुख राजू भोईर यांच्या पॅनलला हरवणा-या प्रभाक क्रमांक १६ अ च्या भाजपाच्या नगरसेविका अनिता पाटील तर भाजपाचे आमदार आणि माजी महापौर डिंपल मेहता (प्रभाग क्रमांक १२ ब ) तर चार वेळा नगरसेविका असलेल्या शानू गोहिल (प्रभाग क्रमांक २ ब) च्या नगरसेविका यांच नाव चर्चेत आहे.
पुण्यात महिला राज
पुण्यात खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण जाहीर झाल त्यात आता पुण्यात दोन अनुभवी महिला नगरसेवकांची नाव चर्चेत आहेत.
-मानसी देशपांडे प्रभाग क्रमांक २० मधून निवडून आल्या आहेत
-नगरसेवक म्हणून त्यांची यंदाची तिसरी टर्म असणार आहे
-मंत्री माधुरी मिसाळ यांच्या त्या भावजई आहेत.
-संघ परिवाराशी निगडित आहेत.
२. वर्षा तापकीर
-प्रभाग क्रमांक ३७ मधून त्या निवडून आल्या आहेत.
-यंदा चौथी टर्म नगरसेविका आहेत
-भाजप प्रदेश उपसध्यक्ष होत्या
-सिनियर नगरसेवकांमध्ये त्यांचं नाव आहे
-महापालिकेच्या विविध समस्यांवर काम केलं आहे.
-विरोधात असताना उपमहापौरचा अर्ज भरला होता.
अनसुचित जाती प्रवर्ग महिला आरक्षण - जालना, लातूर
ओबीसी महिला - अहिल्यानगर, अकोला, जळगाव, चंद्रपूर
सर्वसाधारण महिला प्रवर्ग आरक्षण - पिंपरी चिंचवड, भिवंडी- निजामपूर, पुणे, धुळे, मुंबई , नांदेड-वाघाळा,नवी मुंबई, नागपूर, नाशिक
1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण
2. नवी मुंबई: सर्वसाधारण (महिला)
3. वसई- विरार: सर्वसाधारण
4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
5. कोल्हापूर: ओबीसी
6. नागपूर: सर्वसाधारण (महिला)
7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण (महिला)
8. सोलापूर: सर्वसाधारण
9. अमरावती: सर्वसाधारण
10. अकोला: ओबीसी (महिला)
11. नाशिक: सर्वसाधारण (महिला)
12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण (महिला)
13. पुणे: सर्वसाधारण (महिला)
14. उल्हासनगर: ओबीसी
15. ठाणे: अनुसूचित जाती
16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)
17. परभणी: सर्वसाधारण (महिला ) (आक्षेप)
18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )
19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण (महिला)
20. मालेगाव: सर्वसाधारण
21. पनवेल: ओबीसी
22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण (महिला)
23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण (महिला)
24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
25. जळगाव: ओबीसी (महिला)
26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
27. धुळे: सर्वसाधारण (महिला)
28. जालना: अनसूचित जाती (महिला)
29. इचलकरंजी: ओबीसी
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत सलग पाचव्यांदा महिला महापौर बनणार...
चंद्रपूर महानगरपालिका तयार झाल्यापासून आजपर्यंत चंद्रपूरला एकदाही पुरुष महापौर मिळालेला नाही.
जळगाव मनपा : उज्वला बेंडाळे या भाजपाच्या माजी महानगराध्यक्ष राहिल्या आहेत,तसेच त्या तिसऱ्या वेळी विजयी होत असताना, बिनविरोध निवडून आल्या असल्याने त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.
चंद्रपूर : चंद्रपूर महापौर पद महिला ओबीसीसाठी राखीव झाल्याने खालील नगरसेवक ठरू शकतात महापौर पदाचे संभाव्य उमेदवार
काँग्रेस
(1) संगीता भोयर
(2) संगीता अमृतकर
भाजप
(1) आशा देशमुख
(2) संगीता खांडेकर
नवी मुंबई महानगरपालिकेत खुला प्रवर्ग आरक्षण पडल्याने महापौर पदाचे प्रमुख दावेदार सागर नाईक असणार आहेत.
सागर नाईक हे माजी महापौर असून ते गणेश नाईक यांचे पुतणे आहेत. कोपरखैरणे येथून सागर नाईक निवडून आले आहेत.
नाशिक महापौर सर्वसाधारण खुल्या पदासाठी आरक्षित!
भाजपकडे सर्वाधिक 35 उमेदवार असून त्यात अनेक दिग्गज नगरसेवक चर्चेत
* मच्छिंद्र सानप ( माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र)
* माजी महापौर गुरमित बग्गा
* रोहिणी पिंगळे
* हिंमगौरी आडके ( प्रबळ दावेदार)
* अमोल पाटील ( दिनकर पाटील यांचे पुत्र)
* राहुल शेलार ( आमदार देवयानी फरांदे यांचे समर्थक)
* शाहू खैरे ( ज्येष्ठ नगरसेवक)
* योगिता हिरे ( माजी आमदार अपूर्व हिरे यांची पत्नी)
* समाधान देवरे
छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला)
नवी मुंबई: सर्वसाधारण
वसई- विरार: सर्वसाधारण
कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
कोल्हापूर: ओबीसी
नागपूर: सर्वसाधारण
बृहन्मुंबई: सर्वसाधारण
सोलापूर: सर्वसाधारण
अमरावती: सर्वसाधारण (महिला)
अकोला: ओबीसी (महिला)
नाशिक: सर्वसाधारण
पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
पुणे: सर्वसाधारण
उल्हासनगर: ओबीसी
ठाणे: अनुसूचित जाती
चंद्रपूर: ओबीसी (महिला)
परभणी: सर्वसाधारण
लातूर: अनुसूचित जाती (महिला )
भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
मालेगाव: सर्वसाधारण
पनवेल: ओबीसी
मीरा- भाईंदर: सर्वसाधारण
नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
जळगाव: ओबीसी (महिला)
अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
धुळे: सर्वसाधारण (महिला)
जालना: अनसूचित जाती (महिला)
इचलकरंजी: ओबीसी
बृहन्मुंबई (BMC) सर्वसाधारण
नवी मुंबई सर्वसाधारण
वसई-विरार सर्वसाधारण
भिवंडी-निजामपूर सर्वसाधारण
मीरा-भाईंदर सर्वसाधारण
पुणे - सर्वसाधारण
पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण
नागपूर - सर्वसाधारण
नाशिक - सर्वसाधारण
छत्रपती संभाजीनगर- सर्वसाधारण
अमरावती - सर्वसाधारण
नांदेड-वाघाळा सर्वसाधारण
धुळे - सर्वसाधारण
मालेगाव सर्वसाधारण
सांगली-मिरज-कुपवाड सर्वसाधारण
सोलापूर - सर्वसाधारण
परभणी - सर्वसाधारण
1. कल्याण -डोंबिवली - अनुसूचित जमाती अर्थात ST पुरुष
2. ठाणे - अनुसूचित जाती (SC)
3. जालना - अनुसूचित जाती (SC) - महिला
4. लातूर - अनुसूचित जाती - महिला
5. कोल्हापूर - OBC
6. इचलकरंजी - OBC
7. पनवेल- OBC
8. उल्हासनगर- OBC
9. चंद्रपूर - OBC महिला
10. जळगाव - OBC महिला
11. अकोला- OBC महिला
12. अहिल्यानगर- OBC महिला
इचलकरंजी - महिला किंवा पुरूष
पनवेल - महिला किंवा पुरूष
अकोला - महिला
अहिल्यानगर - महिला
उल्हासनगर - महिला किंवा पुरूष
कोल्हापूर - महिला किंवा पुरूष
चंद्रपूर - महिला
जळगाव - महिला
अकोला - महिला- ओबीसी
अहिल्यानगर - महिला- ओबीसी
चंद्रपूर - महिला-ओबीसी
जळगाव - महिला-ओबीसी
'या' 8 महापालिकांच्या महापौरपदी ओबीसी नगरसेवक
यापैकी चार ठिकाणी महिला महापौर असतील
इचलकरंजी -
पनवेल -
अकोला -
अहिल्यानगर -
उल्हासनगर -
कोल्हापूर -
चंद्रपूर -
जळगाव-
29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर
कल्याण -डोंबिवली - अनुसूचित जमाती अर्थात ST पुरुष
ठाणे - अनुसूचित जाती (SC)
जालना - अनुसूचित जाती (SC) - महिला
लातूर - अनुसूचित जाती - महिला
कल्याण–डोंबिवलीत सत्तेचा मोठा ट्विस्ट! अनुसूचित जमातीचा महापौर होणार राजकारणात खळबळ
एकूण ५ महापालिकांच्या चिठ्ठ्या टाकल्या जातायत
त्यातील एका ठिकाणी एसटी महापौर बसेल
कल्याण -डोंबिवली
चंद्रपूर
जळगाव
ठाणे
वसई-विरार
२९ महापौर पदांसाठी आरक्षण
अनुसूचित जमाती - १
अनुसूचित जाती - ३
ना मा प्रा - ८
सर्वसाधारण - १७
मुंबईत अनुसुचित जमातीसाठी लाॅटरी लागण्याची शक्यता कमी
३ पेक्षा कमी जागा या अनुसुचित जमातीला असतील तरचिठ्ठी काढली जात नाही
मुंबईत दोनच जागा असल्याने लाॅटरीमध्ये अनुसुचीत जमातीची चिठ्ठी नसण्याची शक्यता
मुंबईत दोनच जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत
- नाशिकच्या सूर्यकिरण एरोबॅटीक शो सुरू असताना गंगापूर धरण परिसरात तरसाचे दर्शन...
- नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात आज आणि उद्या अशा दोन दिवसांसाठी सूर्यकिरण एरोबॅटीक शो...
- नाशिकमध्ये पहिल्यांदा वायुसेना आणि जिल्हा प्रशासनाकडून शो चे आयोजन...
- महापालिका सुरक्षा रक्षकांच्या जवानांना गंगापूर धरण मागील बाजूस दिसला तरस...
नगरपरिषद कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांनी दिले शिस्तीचे धडे
घंटा वाजवून पुष्पगुच्छ देत कर्मचाऱ्यांना दिल्या वेळेवर येण्याच्या सूचना
गेल्या चार वर्षापासून नगरपरिषदेवर प्रशासक असल्याने कर्मचाऱ्यांना कार्यालयात उशिरा येत होते.याबाबत काही तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या या तक्रारीनंतर नगराध्यक्षांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सकाळी नगर परिषदेच्या गेटवरच सकाळी नगराध्यक्षांकडून शिस्तीचे धडे दिले आहेत.सकाळी पावणेदहापासून नगराध्यक्ष - नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या गेटवर उभे राहत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घंटा वाजवून पुष्पगुच्छ देत गांधीगिरी पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात दररोज वेळेवर येण्यासाठी सूचनाही देण्यात आल्या आहेत.दरम्यान कार्यालयातील वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे देखील नगराध्यक्षांकडून सांगण्यात आलेय.यावेळी केवळ 20 टक्के कर्मचारीच वेळेवर कार्यालयात आल्याचे दिसून आलं.
कोल्हापूर
कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाचा महापौर पदावर दावा
शहरात लावले बाळसाहेबांची स्वप्नपूर्ती, शिवसेनेचा महापौर होणार असे फलक
आमदार राजेश क्षीरसागर यांनी लावले फलक
महायुती मधून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी क्षीरसागर आक्रमक
आरक्षण सोडतीपूर्वी लावले शहरभर फलक
शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी फुटली...
अजित पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांच्यासह गणेश पाटील, युवराज पाटील यांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी...
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश...
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषद मध्ये भाजप आणि एमआयएमची युती...
समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमची एकमेकांना साथ....
एमआयएमच्या नगरसेवकाला मिळाले शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद.
एमआयएमच्या 3 , अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत...
अचलपूर मध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण...
मुंबई–गोवा महामार्गावर पेणजवळील वाशी नाका परिसरात सिलेंडरने भरलेल्या छोट्या पिकअप टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना घडली. वाहनातील इंधन गळतीमुळे पेट घेतल्याचे प्राथमिक अंदाज असून, आगीत सिलेंडरचे एकामागोमाग स्फोट झाले. या प्रकारामुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या आगीत वाहनातील तब्बल 8 सिलेंडरांसह संपूर्ण पिकअप टेम्पो जळून खाक झाला.
नाशिक : जिल्ह्यातील सप्तशृंगगडावर श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या व्यवस्थापनाविरोधात बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे. ट्रस्टकडून कामगार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच व्यवस्थापनाकडून मनमानी कारभार, अधिकारांचा गैरवापर आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी थेट प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले असून ट्रस्ट कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
धाराशिवमध्ये अज्ञातांकडून तीन एसटी बसची तोडफोड, सीसीटीव्हीत कारनामा कैद
तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर येत स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसची तोडफोड
बसची तोडफोड करत ईव्हीएम हटाव लोकतंत्र वाचवाचे पोम्प्लेट चिटकवले
आठवडाभरापासून धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तांदूळवाडी इथ ईव्हीएम विरोधात आंदोलन
गडचिरोली : वनजमिनीवर अवैधपणे उत्खनन केल्या प्रकरणी जप्त केलेल्या ट्रॅक्टरवर दंड कमी करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेताना सिरोंचा वनविभागातील क्षेत्र सहाय्यकाला एसीबी गडचिरोलीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. महेश जयंतराव धामनगे असे लाचखोर क्षेत्र सहाय्यकाचे नाव आहे. ही कारवाई कमलापुर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या राजाराम खांदला उपक्षेत्रात करण्यात आली. त्याच्यावर राजाराम खांदला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नवीन तूर विक्रीस आणली आहे. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक प्रतिक्विंटल 6,740 ते 7,750 रुपये असा विक्रमी भाव तुरीला मिळाला. विशेष म्हणजे हा दर जालना व खामगाव या प्रमुख बाजार समित्यांच्या तुलनेत क्विंटलमागे सुमारे 240 रुपयांनी अधिक असल्याचे बाजारभाव तुलनेतून स्पष्ट झाले आहे. वाशिम बाजार समितीत सुमारे 1,200 क्विंटल तुरीची आवक झाली होती. दर्जेदार व चमकदार दाण्याच्या मालाला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी राहिल्याने दरात वाढ झाली. स्थानिक व्यापाऱ्यांसह बाहेरील जिल्ह्यांतील खरेदीदारांनीही लिलावात सहभाग घेतल्यामुळे स्पर्धात्मक बोली लागून तुरीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवारवाड्याचा आज २९४ वा वर्धापनदिन
आज वर्धापनदिन उत्साहात साजरा केला जाणार.
शनिवारवाड्याबाहेर रांगोळी घालत दिल्ली दरवाजाला फुलाची सजावट करण्यात आली आहे.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवारवाड्याचा वर्धापनदिन समारंभ आयोजित करण्यात आलाय
मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ पाहिलेल्या शनिवारवाड्याचा आज २९४ वा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा करण्यात येतोय.
कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी 907 तर पंचायत समितीसाठी 1530 उमेदवारी अर्ज
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर हातकणंगले राधानगरी तालुक्यात सर्वाधिक अर्ज
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार पर्यंत मुदत
जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि पंचायत समितीच्या 136 गण साठी होणार निवडणूक
तळकोकणात तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र असतानाही सावंतवाडी तालुक्यात आंबोली व मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात तसेच परुळे पंचायत समिती मतदारसंघात महायुतीतील दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
महायुती झाल्याने अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले असून इच्छूक उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे भाजप व शिंदेसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली अंतर्गत बंडखोरी नारायण राणे रोखणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
दरम्यान, ठाकरे सेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आकाराला आली नसली तरी उबाठा सेनेने बहुतांश ठिकाणी उमेदवार उभे करत महायुतीसमोर आव्हान उभे केले आहे. जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २७३ तर पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ४४० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आज अर्जांची छाननी होणार आहे.
भंडारा : अत्यंत धक्कादायक आणि महाराष्ट्र पोलिसांची झोप उडवणाऱ्या बातमीनं भंडारा जिल्हा हादरला आहे. आतापर्यंत आपण निर्जनस्थळी किंवा अंधारात चोऱ्या झाल्याचं ऐकलं असेल, पण चोरांची हिंमत आता इतकी वाढली आहे की, त्यांनी थेट भंडारा पोलीस मुख्यालयालाचं लक्ष्य केलंय. पोलीस मुख्यालयाच्या आवारात जप्त करून ठेवलेला टिप्पर चोरट्यांनी पळवून नेला आहे. भंडाऱ्यातील ही घटना खरोखरचं थक्क करणारी आहे. 'कुंपणानेच शेत खाणे' असं आपण ऐकतो, पण इथे तर कुंपणाच्या आत घुसून चोरट्यांनी चोरी केली आहे. काही दिवसांपूर्वी भंडारा तहसीलदार यांनी अवैध मुरूम वाहतूक करताना एक टिप्पर जप्त केला होता. हा टिप्पर सुरक्षेच्या कारणास्तव भंडारा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उभा करण्यात आला होता. मात्र, कोणालाही कुणकुण लागू न देता, चोरांनी चक्क या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणाहूनचं टिप्पर चोरून नेला आहे. जिथं जिल्ह्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी बसतात, जिथं २४ तास पहारा असतो, अशा ठिकाणाहून टिप्परसारखं मोठं वाहन चोरीला जाणं, हा महाराष्ट्र पोलिसांसाठी मोठा मानहानीचा प्रकार मानला जात आहे. पोलीसच सुरक्षित नाहीत, तर सामान्य जनतेचं काय? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
चंदिगड महापौर पदाच्या खुर्चीवर भाजपला बसविण्यासाठी विनोद तावडे आज तडकाफडकी चंदिगडला रवाना झाले आहेत. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतदानपत्रात खाडाखोड केली होती. हे प्रकरण खूप गाजले आणि सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयीन हस्तक्षेपानंतर आपचा महापौर बनला होता.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप
पालिका आयुक्तांना दिलेली आकडेवारी आणि मतमोजणी झालेली आकडेवारी फरक
करमकर नावाच्या निवडणूक अधिकारी यांनी आयुक्तांना दिलेली मतदार आकडेवारी आणि प्रत्यक्षात मतमोजणी आकडेवारी याच्यामध्ये फरक असल्याची टीका
वसंत मोरे यांनी निवडणूक निकालाची आकडेवारी प्रत पोस्ट करत टीका
जनतेचा कौल मान्य आहे मात्र अधिकाऱ्याने हे निवडणूक जिंकून दिल्याची वसंत मोरे यांची टीका
भिवंडी महानगरपालिका निवडणुकी नंतर काँग्रेस नगरसेवक कोकण भवन येथे नोंद करून गेले अज्ञातस्थळी...
भाजपा कडून अजून गटनेता नियुक्त नाही...
काँग्रेस 30 राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) गटाचे 12 समाजवादी पार्टी 6 सत्ता स्थापन करू शकतात.
कोणार्क विकास आघाडी 4 ,
भिवंडी विकास आघाडी 3 यांची भूमिका निर्णायक
गोंदिया शहरातील भीमनगर रेल्वे पटरीजवळील कृष्णा स्वीट्स विजय गृहउद्योग येथे बालकामगारांकडून काम करून घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बालकामगार संयुक्त कृती दलाने धाड टाकत 13 वर्षीय अल्पवयीन बालकाची सुटका केली. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. धाडीदरम्यान दुकान मालक मनोज हरी साहू (44) हा अल्पवयीन बालकाकडून मिठाई तयार करण्याचे काम करून घेत असल्याचे आढळले. या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात मालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 146 तसेच अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत कलम 75 व 79 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक निवडणूक रिंगणात
नेताजी पाटील पंचायत समिती निवडणूक लढवणार
नेताजी पाटील उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक
कसोप पंचायत समिती गणामधून नेताजी पाटील निवडणूक रिंगणात
जगप्रसिद्ध लोणार सरोवराची पाण्याची पातळी गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सातत्याने वाढत असून ही पातळी आता रेकॉर्डब्रेक स्तरावर आली आहे. लोणार सरोवरातील अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली बुडाली असून वाढत्या जल पातळीमुळे लोणार सरोवरातील पाण्याचे गुणधर्म ही बदलत आहे आणि यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. "एबीपी माझा" ने याविषयी रियालिटी चेक करून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता उच्च न्यायालयाकडून याची दखल घेण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्या. अनिल व न्या. राज वाकोडे यांच्या खंडपीठाने वकील म्हणून मोहित खजांची यांची याप्रकरणी न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली आहे व पुढील सात दिवसात रीतसर जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे
उद्या पुण्यात दुपारनंतर शाळांना सुट्टी
सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा उद्या पुणे शहरात होणार
त्यामुळे पुणे महापालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा दुपारी १२ वाजेपर्यंतच राहणार सुरू
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आदेश
सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा हा बालेवाडी ते बालगंधर्व होणार
यामध्ये एकूण ५८ किलोमीटर अंतर असणार
त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे
बीडमध्ये गोळीबारीची घटना घडली आहे.अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे ही गोळीबारीची घटना घडली. सय्यद अहमदअली मुब्बशीरअली हाशमी याने शेतात असलेल्या कुत्र्यावर गोळी झाडली मात्र ही गोळी शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडला लागली. हा प्रकार पोलिसांना समजल्यानंतर त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्याकडून Made in usa असं नाव असलेली जुनी बंदूक यासह तीन जिवंत पितळी काडतुस यासह त्याची मोटार सायकल जप्त केली आहे.याप्रकरणी बेकायदेशीर शस्त्र बाळगत जीवितास धोका निर्माण करण्याच्या प्रयत्नाने गोळीबार केल्याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करत आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी 907 तर पंचायत समितीसाठी 1530 उमेदवारी अर्ज
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर हातकणंगले राधानगरी तालुक्यात सर्वाधिक अर्ज
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार पर्यंत मुदत
जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि पंचायत समितीच्या 136 गण साठी होणार निवडणूक
पुण्यात गंभीर अपघाताचे ११० ब्लॅक स्पॉट
हडपसर, कात्रज, वारजे परिसरात धोकादायक ठिकाणे
शहरात रस्ते वाहतुकीचा वेग वाढत असताना अपघातांचा धोका ही वाढत चालला आहे
वाहतूक पोलिस आणि प्रशासनाने याकडे गांभरियाने लक्ष देण्याची गरज आहे
महामार्गावर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक
बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात चार वर्षांपूर्वी T1C1 हा वाघ रहस्यमय रित्या बेपत्ता झाला होता त्यानंतर वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पातून 36 महिन्यांचा PKT7CP1 हा वाघ गेल्या तीन जानेवारी रोजी ज्ञानगंगा अभयारण्यात आणला आणल्यानंतर या वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात तयार करण्यात आलेल्या जाळी लावून मर्यादित अधिवासात ठेवण्यात आलं होतं मात्र काल रात्री या वाघाने जाळी तोडून अभयारण्यात पोबारा केला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातूनच बुलढाणा खामगाव हा महामार्ग क्रमांक 753 E जातो व या महामार्गावरून भरदा वाहने सुरू असतात त्यामुळे या वाघाच्या अस्तित्वाला आता धोका निर्माण झाला आहे. हा वाघ आता अभयारण्य परिसरात मुक्त संचार करत असल्याने अभयारण्य नजीक असलेल्या गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना आता वन्यजीव विभागाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मात्र वाघाच्या संरक्षणासाठी अभयारण्यातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करणे आवश्यक असल्याचं बोललं जात आहे.
मुंबईच्या महापौरपदासाठी आज चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. गेल्या वेळी या पदासाठी अनुसूचित जाती महिला आणि खुला प्रवर्गासाठी आरक्षण पडले होते. त्यामुळे कुठल्या आरक्षणाचे पक्षनिहाय किती नगरसेवक विजयी झाले आहेत, याचा लेखाजोखा राजकीय पक्ष तयार करत आहेत. आरक्षण निश्चित झाल्यानंतर महापौरपदासाठी कुणाला संधी देता येईल, याबाबतच्या हालचालींना वेग येणार आहे. राज्य शासनाच्या विभागामार्फत महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत नगरविकास मंत्रालयात गुरुवारी सकाळी ११ वाजता काढली जाणार आहे. या प्रक्रियेकडे सर्वच राजकीय पक्ष, इच्छुक नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघणार यावर इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकाच्या महापौर पदाचं आरक्षण आज निघणार ज्यात अमरावतीचाही समावेश आहे.. मागील चार वर्षांपासून अमरावती महानगरपालिका मधील महापौर यांचं दालन आणि विद्यापीठ मार्गावरील सरकारी बंगल्याला कुकुप लागलेलं आहे.. मनपात असलेलं दालन आज चार वर्षानंतर उघडण्यात आले.. महापौर दालनाच्या खुर्चीवर कोनत्या प्रवर्गाचा महापौर बसेल हे लवकरच कळेल... अमरावती महानगरपालिका मध्ये आज कोणत्या प्रवर्गाचा महापौर राहील हे आज होणाऱ्या आरक्षणाच्या सोडतमध्ये कळेल... पण महापौरच्या खुर्चीवर महाविकास आघाडीचा की महायुतीचा महापौर बसेल हे काही दिवसात स्पष्ट होईलच पण भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महापौर त्यांचाच राहील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे....
नागपूर टेकडी गणेश
गणेश जयंती निमित्य नागपूरच्या प्रसिद्ध टेकड़ी गणेश मंदिरात भाविकांची गर्दी...
या पार्शवभूमीवर टेकडी गणेश मंदिराला आकर्षक फुलांच्या माळांनी सजवण्यात आले...
नागपूर गणेश दर्शनाने दिवसाची सुरवात करतांना दिसत आहे ..
कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड
काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी शिंदेंच्या शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिला असल्याचे सांगितले होते मात्र त्याच्या काही तासातच यू टर्न घेत काँग्रेसने स्वतंत्र गट स्थापन केला आहे.
निवडून आलेले दोन्ही नगरसेवक आमच्यासोबत ,आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही ...
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही