Maharashtra Live Blog Updates: कुठल्या महानगरपालिकेत कुणाचा महापौर? राज्यातील सर्व घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: ठाण्याच्या महापौरपदावरून सध्या शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे, केवळ ठाण्यात नाही तर कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्येही महाय़ुतीचाच महापौर होईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्केंनी व्यक्त...More
पंढरपूर: आज पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठीचे उमेदवारी अर्ज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित शक्तिप्रदर्शन करून दाखल केले. यावेळी माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर आणि माढा या दोन्ही ठिकाणी घड्याळ व तुतारी एकत्रित येत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये जागावाटप करताना जिल्हा परिषद ची जागा अजितदादांकडे गेली असेल तर पंचायत समिती शरद पवार गटाला अशा रीतीने वाटप केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. पंढरपूर आणि माढा येथील दोन्ही राष्ट्रवादीच्या एबी फॉर्म ची जबाबदारी आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही तरुण आणि कर्तव्यदक्ष उमेदवार निवडले असून पंढरपूर मध्ये भगीरथ भालके यांच्याशी युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
चांदीच्या भावात गेल्या 24 तासात 15 हजार रुपयांची वाढ.
खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत आज चांदी तीन लाख 35 हजार रुपये प्रति किलो.
खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत ग्राहक नसल्याने शुकशुकाट.
कल्याण डोंबिवली मधील शिवसेनेचे ५३ नगरसेवक कोकण भवन येथे दाखल
पक्षाचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात येणार
महायुतीचा महापौर निवडून येणार
मनसे आणि ठाकरे गटाचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत.. असे विचारले असता , यावर वरिष्ठ निर्णय घेतील असे सांगत राजेश मोरे यांनी सस्पेंस वाढवला आहे.
बस मधून नगरसेवक दाखल
शिवसेना ठाकरे गटाच्या एसटी प्रवर्गातील दोन नगरसेवकांवर सत्ताधाऱ्यांची नजर ?
महापौर पद एसटी प्रवर्गासाठी राखीव होणार असल्याच्या चर्चेने सत्ताधारी पक्षांकडून दोन नगरसेवकांवर दबाव आणला जात असल्याची ठाकरे गटाकडून माहिती
शिवसेना ठाकरेंकडे प्रियदर्शिनी ठाकरे आणि जितेंद्र वळवी हे एसटी प्रवर्गातील नगरसेवक आहेत
शिवसेना ठाकरे गटाकडूनही या दोन्ही नगरसेवकांची विशेष काळजी घेतली जातंय
परंतु महापौर पदाचे आरक्षण जुन्या चक्राकार पद्धतीने झाल्यास एसटी प्रवर्गसाठी महापौर पद आरक्षित होण्याची शक्यता जास्त आहे, परंतु नगरसेवक आरक्षण पद्धत जशी नव्याने काढली होती. त्या पद्धतीने महापौर आरक्षणही नव्याने काढले जाणार आहे. जी चक्राकार आरक्षण पद्धतीची सुरूवात समजली जाणाराय.
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव आलेल्या स्कूटीची भीषण धडक बसली. या अपघातात कुठे चालक तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना भंडारा - लाखनी दरम्यान धारगाव जवळ सकाळच्या सुमारास घडली. संकेत सपाटे (३०) असं मृत स्कुटी चालकाचं नावं आहे. तो भंडाऱ्याकडून लाखनीच्या दिशेनं जात असताना हा भीषण अपघात घडला. याप्रकरणी कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात पराभवानंतर शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मतदानाच्या दिवशी काही व्हॉट्सॲप चॅट मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आले असून, त्याचा थेट फटका आपल्याला आणि आपल्या बहिणीला बसल्याचा दावा सरवणकर यांनी केला आहे.
दरम्यान, हे कथित चॅट शिवसेनेचे दादर-माहीम विधानसभा विभाग प्रमुख कुणाल वाडेकर यांनी समोर आणले आहेत. वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत हे चॅट दाखवत आरोप केला की, मतदानाच्या दिवशीच हे मेसेज नियोजनबद्ध पद्धतीने सर्वत्र पसरवण्यात आले होते.
या चॅटमधून सरवणकर कुटुंबाचं काम करू नका, असे आवाहन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हे संदेश मोठ्या प्रमाणावर फिरवल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम मतदानावर झाला, असंही वाडेकर यांनी सांगितलं.
दरम्यान, या आरोपांमुळे दादर-माहीम मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलं असून, भाजपकडून या आरोपांवर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गडचिरोली : राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार दोन दिवस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ग्रामीण विकासासंबंधी जिल्हा परिषद व आदिवासी विकास यंत्रणेचा आढावा जिल्हा परिषद सभागृहात घेतला. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्षात शेवटच्या घटकापर्यंत खात्रीशीर पोहोचविण्यासाठी प्रायोगिक स्तरावर काही गावांची निवड करून त्या गावांतील प्रत्येक कुटुंबाला किमान काही शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल, अशी कार्यपद्धती राबविण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.
बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी अंकिता कवचट या विद्यार्थिनीने शाळेतील मूलभूत सुविधांचा अभाव आणि कथित भ्रष्टाचाराबाबत थेट पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिल्याने याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत गावच्या सरपंच असलेल्या प्रतीक्षा शिंदे यांना माहिती विचारली असता त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री उपमुख्यमंत्री कोण आहेत ते माहिती आहे हाच आमच्या गावचा विकास असून या प्रकरणाची चौकशी व्हावी असे त्या म्हणाल्या आहेत. त्या विद्यार्थिनीला भेटणार असल्यास देखील त्या म्हणाल्या आहेत.
वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा परिसरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने उच्छाद घातला आहे. या कुत्र्याने ५ जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जयवंती पांचाळ, रघुनाथ मोहिते, संतोष शेळके, राजेंद्र पाथरे, परशुराम राठोड या पाच जणांचा कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. यातील दोन वयोवृद्ध आहेत. सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे उपचार सुरू आहेत. तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव देखील वाढला आहे.
Jalgaon Crime : जळगाव महापालिका निवडणुकीतील निकालानंतर सुरू असलेल्या वादातून माजी महापौर तथा शिवसेना शिंदे गटाचे विजयी उमेदवार विष्णू भंगाळे यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ जानेवारी रोजी रात्री विष्णू भंगाळे हे मित्रांसोबत उभे असताना ओळखीचा आरोपी प्रशांत चौधरी व त्याच्यासोबत असलेल्या एका इसमाने त्यांना गाठले. “आमचा उमेदवार निवडणुकीत पडला” असे म्हणत आरोपींनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि “तुमची रक्ताची होळी करू” अशी जिवे मारण्याची धमकी देत तेथून पसार झाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भंगाळे यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली होती. या सर्व घटनांमुळे राजकीय वातावरण तापले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
माहिममधील भाजप पदाधिकारी सरवणकरांविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार करणार
दुपारी १२ वाजता वांद्रेतील सायबर सेलमध्ये तक्रार करणार
सरवणकर यांनी भाजपविरोधात खोटे आणि चुकीचे एसएमएस तयार करून वायरल केल्याचा दावा
भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप
-जळगावच्या धरणगावमध्ये विद्युत तारांमधील मांजामध्ये अडकलेल्या विदेशी पोपटाची सुटका...!
-जीव धोक्यात घालून विद्युत पोलवर चढत तरुणाने पोपटाला सुरक्षित आणले खाली
-वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांसह महावितरण कंपनीचे कर्मचारी व नागरिकांनी पोपटाच्या सुखरूप सुटकेसाठी केली मदत...!
-विजतारांमध्ये अडकलेल्या पोपटावर सुखरूप काढल्यावर पशु वैद्यकीय रुग्णालयात करण्यात आले प्राथमिक उपचार
-धरणगाव नगरपालिकेत जवळील विद्युत खांबावरील विज तारांमध्ये पतंगाच्या मांज्यामध्ये अडकला होता विदेशी पोपट
-पोपटाला वाचवण्याची घटना धरणगाव शहरात चर्चेचा विषय बनला आहे...!
गोंदिया: गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील उमरारी ते चिरचाडी कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, संबंधित कंपनीकडून एफडीसीएम अंतर्गत येणाऱ्या कम्पार्टमेंट मधील नाल्यातून वाळूचा अवैध उपसा करून ती दुरुस्तीच्या कामात वापरली जात होती. तसेच मोठ्या प्रमाणावर वाळूची साठवणूककरून ठेवण्यात आली आहे. हा भाग नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन क्षेत्रातील असल्याने एफडीसीएमचे अधिकारी यांनी धडक देत संबंधितावर कारवाई केली. याप्रकरणी नियमांनुसार जप्तीची कार्यवाही केली असुन एक पोकलॅन मशीन, एक ट्रॅक्टर व एक टिप्पर जप्त करण्यात आले आहे.
नागपुरात आज होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी 20 सामन्याच्या दृष्टीने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे..
-सामन्याच्या दरम्यान वर्धा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने आज मॅचच्या काळात वर्धा मार्गावर जड वाहनाना प्रवेशबंदी असणार..
-तसेच पोलिसांकडून पार्किंगसाठी मैदानाकडे जागा निश्चित करण्यात आली आहे.. स्टेडियमकडे वाहन येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले आहे..
-सोबतच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वेळ वाचविण्यासाठी क्रिकेट रसिकांनी शक्यतोवर मेट्रोचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे...
- एआयच्या माध्यमातून पार्किंगमध्ये किती जागा शिल्लक आहे.. स्टेडियम मध्ये कोणी क्रिमिनल व्यक्ती आला का..? किंवा कोणाकडे शस्त्र आहे का किंवा स्टेडियम मध्ये कोणी गदारोळ करतोय का..?यावर लक्ष असणार आहे..
खालील प्रमाणे वाहतुकीत बदल केले जाणार...
-नागपूर ते वर्धाकडे जाणारी जड वाहतुक ही मुंडले शाळा कटींग येथुन डावे वळण घेवुन सरळ समृध्दी मार्गे
-तसेच जबलपूर कडुन वर्धा कडे जाणारी जड वाहतुक ही पांजरा टोल नाका कडुन सरळ समृध्दी मार्गे झीरो सर्कल पॉईट तेथुन डावे वळण घेवुन दाताळा मार्गे बुट्टीबोरी कडे जाईल.
-चंद्रपुर, हैद्राबाद, वर्धा कडुन नागपूर कडे येणारी जड वाहतुक ही बुट्टीबोरी कडुन दाताळा मार्गे समृध्दी झीरो सर्कल मार्गे उजवे वळण घेवुन माउली कटींग येथुन डावे वळण घेवुन वर्धा- नागपूर राष्ट्रीय माहामार्ग एन.एच-४४ ने नागपूर कडे जाईल.
-हिंगणा अमरावती मार्गे हैद्राबाद चंद्रपुर वर्धाकडे जाणारी जड वाहतुक ही समृध्दी झीरो सर्कल येथुन उजवे वळण घेवुन दाताळा मार्गे बुट्टीबोरी कडे जाईल.
-हैद्राबाद - वर्धा कडुन जबलपुर कडे जाणारी जड वाहतूक ही बुट्टीबोरी कडुन दाताळा मार्गे समृध्दी झीरो सर्कल येथुन उजवे वळण घेवुन एन. सी.आय, पांजरा टोल मार्गे जबलपुर कडे जातील.
-छत्रपती चौक ते डोंगरगाव टोल नाका पर्यंत सर्व जड वाहतूकी करीता बंद करण्यात येत आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्च दोन दिवस पायपीट करून जिल्हाधिकारी कार्यालयावर काल संध्याकाळी सात वाजता धडकला त्यानंतर प्रशासनाकडून कोणताही दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालत दोन्ही प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून हाटेच मोर्चेकर्यांनी आपल्या सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करायला सुरुवात केली आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही अजून दहा दिवस ही या ठिकाणी थांबायला तयार आहोत अन्यथा रेल रोकोही करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
बंद असलेला GST नंबर सुरू करण्यासाठी फिर्यादीनं ऑन लाईन अर्ज सादर करून GST विभागाला चालान भरला. मात्र, तो सुरू झाला नाही. GST नंबर पूर्ववत सुरू करण्यासाठी GST चे भंडारा येथील राज्य कर निरीक्षक मनिष सहारे (५०) यांनी फिर्यादीला ३५ हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून मनिष सहारे याला लाचेच्या रकमेसह अटक केली. या प्रकरणी भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यास यंदाच्या वर्षी विलंब होणार, सत्ता स्थापनेमुळे अर्थसंकल्प सादर करण्यास विलंब
मुंबई महापालिका प्रशासनाने राज्य सरकारला पत्र पाठवून यंदाचा अर्थसंकल्प उशिराने सादर करण्याबाबतची परवानगी मागितली असल्याची माहिती
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी एक महिन्याचे अधिक मुदतवाढ देण्याचे महापालिकेची राज्य सरकारकडे पत्राद्वारे विनंती
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 5 फेब्रुवारी पर्यंत सादर करावा असा नियम आहे...
मात्र मुंबई महापालिका निवडणूक त्यानंतर सत्ता स्थापन प्रक्रिया आणि महापौर निवड या सगळ्यामुळे साधारणपणे महिनाभर अधिक विलंबाने मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाईल अशी माहिती आहे
एकीकडे सत्ता स्थापनेमध्ये कोणाचा महापौर बसणार याची उत्सुकता असताना महापौर बसल्यानंतर आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प किती कोटींचा असणार? याकडे सगळ्यांचे विशेष लक्ष असेल
30 जानेवारी किंवा 2 फेब्रुवारी दरम्यान पहिली महासभा होईल त्यानंतर स्थायी समितीसह इतर समित्या स्थापन होण्यासाठी या सगळ्या प्रक्रिया पार पडण्यास फेब्रुवारी अखेर होईल
त्यामुळे साधारणपणे एक महिना उशीर यंदाच्या वर्षी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लागू शकतो... मागील तीन वर्ष प्रशासक असल्याने स्थायी समिती समोर अर्थसंकल्प सादर केला जात नव्हता मात्र आता नगरसेवक निवडून आल्याने स्थायी समितीसमोर हा अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्च दोन दिवस पायपीट करून जिल्हाधिकारी कार्यालयावर काल संध्याकाळी सात वाजता धडकला त्यानंतर प्रशासनाकडून कोणताही दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालत दोन्ही प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून हाटेच मोर्चेकर्यांनी आपल्या सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करायला सुरुवात केली आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही अजून दहा दिवस ही या ठिकाणी थांबायला तयार आहोत अन्यथा रेल रोकोही करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Blog Updates: कुठल्या महानगरपालिकेत कुणाचा महापौर? राज्यातील सर्व घडामोडी, एका क्लिकवर...