Maharashtra Live Blog Updates: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

मुकेश चव्हाणLast Updated: 02 Mar 2026 01:09 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरु झाले. 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अजित पवारांच्या अकाली...More

शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुरावाला मोठा यश; मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या राहण्यासाठी चिंता मिटली 

 शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुरावाला मोठा यश


मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या राहण्यासाठी चिंता मिटली 


मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबई महानगरपालिकेकडून पहिला वृद्धाश्रम लवकरच होणार सुरू


गोरेगाव घास बाजार परिसरात जेष्ठ नागरिकांसाठी नऊ मजली वृद्धाश्रम  तयार 


शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून आज वृद्धाश्रम ची पाहणी करण्यात आली 


आत्याधुनिक सुविधा पासून लेस असलेली ही नऊ मजली इमारत अनाथ ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासादायक ठरणार 


मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुंबई महानगरपालिकेकडून पहिला ९ मजली इमारत वृद्धाश्रम साठी तयार करण्यात आली आहे 


या इमारतीमध्ये जवळपास 77 ज्येष्ठ नागरिक राहूशकणार 


माजी नगरसेविका साधना माने यांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका सभागृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम तयार व्हावा यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता


मागील काही वर्षापासून शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून मुंबई महानगर पालिकेसोबत या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात होता 


या पाठपुरावाला मोठा यश आलं असून येत्या 14 ते 15 दिवसात या इमारतीचे काम पूर्ण होऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच हा वृद्धाश्रम सुरू होणार आहे