Live Blog Updates: अयोध्येत हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला भक्ती आणि उत्साहाचा संगम
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: अयोध्येत हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला भक्ती आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळाला. राम मंदिर परिसरात हजारो साधू-संतांनी रामकोटची परिक्रमा केली, जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण शहर उजळलं... गेल्या २१ वर्षांची...More
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर असमतल रस्त्यांवरून उपमहापौर संजय घाडी आक्रमक
पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त नाही केले तर उपमहापौर पालिका आयुक्तांच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डे बुजवले असले तरी पॅचवर्कमुळे रस्ते असमतल झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप उपमहापौर संजय घाडी यांनी केला आहे. याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांची भेट घेऊन या समस्येबाबत निवेदनही दिले आहे. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते व्यवस्थित समतल करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. जर महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले तर महायुतीचा उपमहापौर म्हणून स्वतः रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संजय घाडी यांनी दिला आहे.यामुळे पालिका प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
भिवंडीतील कशेळी येथे फर्निचर मार्केटला भीषण आग; 10 ते 12 दुकाने जळून खाक
भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरातील चामुंडा कॉम्प्लेक्स येथील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत फर्निचरची सुमारे 10 ते 12 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून यामध्ये शेजारील भंगार गोदामही आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर फर्निचर व साहित्य जळाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे फर्निचर चे गोदामे उभारण्यात आले आहेत त्यामुळे ही आग लागली की लावली गेली असा देखील प्रश्न उपस्थित होतो.
घटनेची माहिती मिळताच ठाणे, भिवंडी आणि कल्याण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू असून परिसरात सतर्कता बाळगण्यात येत आहे.
संपूर्ण भारतवर्ष हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या 'गुढीपाडव्या'चा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता निर्माण झाली असली, तरी आज सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक सुखद बातमी समोर येत आहे. भंडाऱ्याच्या सराफा बाजारपेठेत आज सकाळपासूनच मोठी लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरात आज मोठी घट झाली असून, दर १ लाख ४८ हजार ५०० रुपयांच्या घरात स्थिरावल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन वस्तू किंवा सोने खरेदी करणे प्रगतिकारक मानले जाते, त्यातच दरात झालेली ही कपात ग्राहकांसाठी 'दुग्धशर्करा योग' ठरली आहे. आखाती देशांमधील तणावामुळे सोन्याचे दर आणखी वाढतील अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, पाडव्याच्या दिवशीच दर काहीसे खाली झाल्यानं भंडारा जिल्ह्यातील मध्यमवर्गीय आणि गुंतवणूकदारांनी सोन्याच्या दुकानांत गर्दी केली आहे.
भंडाऱ्यात सोने चांदीचे आजचे दर
सोनं २४ कॅरेट - १,४८,५००
Gst - ४,४५५
चांदी प्रति किलो - २,३४,५००
Gst - ७,०३५
पुण्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात
पुण्यातील उपनगरात पावसाची हजेरी
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
शिवणे, धायरी परिसरासह अनेक ठिकाणी पाऊस
सकाळपासून पुण्यात होते ढगाळ वातावरण
हवामान विभागाकडून पुण्यात ही देण्यात आलाय पावसाचा इशारा
- नाशिकच्या अशोक उर्फ कॅप्टन खरात प्रकरणी संभाजी राजे भडकले...
- रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे...
- संभाजीराजे भोसले यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची केली मागणी...
- कॅप्टन खरात प्रकरणाची स्वतः मुख्यमंत्र्यांकडून चौकशी व्हावी...
- कॅप्टन खरातच्या ट्रस्टवर रूपाली चाकणकर आहे आणि त्या त्यांचे पाद्यपूजन करत आहे हे अतिशय निंदनीय...
- खरात प्रकरणात तत्काळ कठोर कारवाई व्हावी, महाराष्ट्राचा हा विषय आहे एकट्या नाशिकचा नाही...
- महिला आयोगाच्या अध्यक्ष ट्रस्टच्या सदस्य आहे यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा...
मुंबई-गोवा महामार्गावर एक मोठी दुर्घटना टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खेडजवळ भरधाव वेगात असलेली एक कार थेट जगबुडी नदीच्या कठड्यावर जाऊन अडकली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वेगावर नियंत्रण सुटल्याने ही कार थेट नदीकाठच्या कठड्याकडे झेपावली होती. मात्र शेवटच्या क्षणी गाडी कठड्यावर अडकली आणि चालकाचा थरारक बचाव झाला. जर कार पुढे गेली असती तर ती तब्बल १०० ते १५० फूट खोल नदीत कोसळण्याची शक्यता होती.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, तर काही काळ वाहतूकही मंदावली होती. माहिती मिळताच खेड पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावरील वेगमर्यादा आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अंधेरी पूर्व येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यासाठी प्रथमच “अंधेरीचा पाडवा” या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले .शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रोहन सावंत यांच्या पुढाकाराने या शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले. अंधेरी परिसरात शोभा यात्रेच्या मार्गावर ३५ गुढ्या उभारून अंधेरीकरांकडून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या निमित्ताने मोगावीरा बँक, गुंदवली ते मालपा डोंगरी या मार्गावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा पथक, लेझिम, कोळी बॅण्ड तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि देखावे सादर करण्यात आले. अंधेरी पूर्व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
जळगाव जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह तुरळक स्वरूपात गारपीट झाली यामुळे कापणीवर आलेल्या गहू हरभरा आणि मक्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. भुसावळ जामनेर बोदवड भडगाव पाचोरा व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये अवकाळी मुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. तर आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळीवारासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बीडच्या परळीतील ज्योतिर्लिंग वैजनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.आज असलेला गुढी पाडवा तसेच नववर्षाचा पहिला दिवस असल्याने मोठ्या संख्येने भाविक वैजनाथ मंदिरात दाखल झाले.सकाळपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.वैजनाथ मंदिरात सकाळी विधिवत पद्धतीने गुढी उभारण्यात आलीये.पुढील दोन-तीन दिवस असलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे वैजनाथच्या दर्शनासाठी राज्यातून भाविक दाखल होणार असल्याने दर्शनाची तयारी वैजनाथ देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आलीये.
स्वघोषित कॅप्टन अशोक खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर रात्री उशिरा क्राईम ब्रँच छापा
- खरातच्या मिरगाव मधीलफार्म हाऊसमधून महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती
- खरातच्या मालमत्ता आणि अन्य काही महत्त्वाचे कागदपत्र पोलिसांनी घेतले ताब्यात
- तर खरातच्या फॉर्म हाऊसमधून एक पिस्तूल देखील पोलिसांनी केलं जप्त
- एक पिस्तूल आणि काही वापरलेले तर काही न वापरलेले काडतूस देखील पोलिसांना सापडल्याची पोलीस सूत्रांची माहिती
वाशिम बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करणारया शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ करणारी बातमी... .वाशिम कृषीउत्पन्न बाजार समिती आज आजपासून पुढील 5 एप्रिल पर्यंत तब्बल 18 दिवस बंद असणार आहे. आर्थिक वर्षांची जुळवा जुळव करण्यासाठी बाजार समिती बंद असणार आहे.. शेतकऱ्यांना त्या मुळे शेतकऱ्यांना आता खाजगी बाजार समितीचा रस्ता धरावा लागणार आहे..त्या मुळे खाजगी बाजारपेठेत विक्री मुळे कमी दर मिळून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे... आर्थिक वर्षाची हिशोब जुळवा जुळवा करण्यासाठी असणार बंद..
गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात पुणेकरांनी सकाळीच मोठी गर्दी केली आहे. राज्यभर गुढीपाडव्याचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय तसाच उत्साह पुण्यात देखील पाहायला मिळतो आहे. बापाला साखरेची माळ अर्पण करण्यात आली आहे आणि सोबतच सुंदर पद्धतीने फुलांची आरास देखील करण्यात आले
साईंच्या शिर्डीतही गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा उत्साह दिसून येतोय.. साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारण्यात आलीये.. आज मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात पार पडत असून साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीये.. आज साईबाबांच्या मुर्तीला कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळ परिधान करण्यात आलीये.. तर साई मंदिर, द्वारकामाई परिसरात देखील यूएसए येथील साईभक्ताच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय..
चैत्र पाडवा अर्थात गुढीपाडवा... मराठी नववर्षाच्या स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज मराठी नववर्षा अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरातून हजारो भाविक शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेऊन नववर्षाचे स्वागत करत आहेत शेगाव शहर हे भाविकांनी फुलून गेला आहे सकाळपासूनच भाविक शेगाव येथील मंदिरात मोठ्या उत्साहाने पोहोचले आहेत.
गुढीपाडवा निमित्त नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिक शहरात ठीक ठिकाणी शोभायात्रा यांना सुरुवात झाली आहे इंदिरानगर,नाशिकरोड सातपूर ,सिडको याप्रमाणेच पंचवटी परिसरांमधून देखील श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून शोभायात्रा आता मार्गस्थ झाली आहे. पारंपरिक वेशभूषा परिधान करून बालगोपाल, महिला सारेच या शोभा यात्रेत सहभागी झाले अहेय, नाशिक च्या महापौर हिमगौरी आडके देखील शोभायात्रा मध्ये सहभागी झाल्या आहेत कुंभमेळा निमित्ताने नाशिक शहरात अनेक विकासकामे सुरू असल्याने यंदा विकासाची गुढी उभारण्याची संधी महापौरांना आहे,
हिंदू नववर्षाची ही मंगलमय पहाट आहे. संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. श्री रामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा. ही गुढी भारताची गुढी असून मोदींच्या नेतृत्वाची ही गुढी दरवर्षी उंच उंच जात रहावी, अशी शुभेच्छा व्यक्त करतो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्रीरामाचे आणि सनातन हिंदू धर्माचे जयघोष करत भाषणाला सुरुवात...
हिंदू नव वर्षाची ही मंगलमय पहाट आहे..
संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे..श्री रामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे..
सर्वांना हिंदू नव वर्षाच्या शुभेच्छा....
ही गुढी भारताची गुढी असून मोदींच्या नेतृत्वाची ही गुढी दरवर्षी उंच उंच जात रहावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो..
पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता हरित लवादान भंडाऱ्यातील सर्व वाळू घाटांवरील उपसा बंद केला आहे. असं असतानाही भंडारा जिल्ह्यातील वाळूचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा करून त्याची चोरटी वाहतूक सुरू असताना वरठी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई करताना ५ टिप्पर आणि त्याचे ५ चालक ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईत एकूण ५० ब्रास वाळू साठ्यासह ५ टिप्पर असा ३ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जागतिक पातळीवरील युद्ध जन्य परिस्थिती थांबावी आणि विश्वात शांती प्रस्थापित व्हावी या करिता बीडच्या श्रीक्षेत्र भगवान श्रीकृष्ण आश्रम या ठिकाणी 108 कुंडी विष्णू महायाग संपन्न होत आहे. याठिकाणी सामूहिक प्रार्थना व शांतिपाठ घेण्यात आलाय यासाठी 25 हजार चौरस फुटाचा बांबूचा भव्य यज्ञ मंडप उभारण्यात आला आहे.याठिकाणी रामकथेचेही आयोजन करण्यात आले असून राम कथेतून आचरणाचे मार्गदर्शन व महाविष्णू यागातून शांतीचा संदेश असा अनोखा संगम या ठिकाणी साधला गेलाय.
छत्रपती संभाजी नगर शहरातही काल रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागातही पाऊस झाला .यामध्ये सिल्लोड, कन्नड तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट होऊन शेतीचे नुकसान झालं. या पावसाचा फटका शेतात उभा असलेला गहू, हरभरा, ज्वारी ,यासह फळबागांना मोठ्या प्रमाणावर बसला.
मुंबईत आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा
शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा
ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा पहिला गुढीपाडवा मेळावा
शिवतीर्थवर राज ठाकरे काय बोलणार?
छत्रपती संभाजी नगर शहरातही काल रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागातही पाऊस झाला .यामध्ये सिल्लोड, कन्नड तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट होऊन शेतीचे नुकसान झालं. या पावसाचा फटका शेतात उभा असलेला गहू, हरभरा, ज्वारी ,यासह फळबागांना मोठ्या प्रमाणावर बसला..
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Live Blog Updates: अयोध्येत हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला भक्ती आणि उत्साहाचा संगम