Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांची आज 396 वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...
जे काही घडेल ते उद्याच घडेल; भिवंडी प्रकरणावर भाजप चे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलणे टाळल
भिवंडी प्रकरणावर भाजप चे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलणे टाळल…
जे काही घडेल ते उद्याच घडेल…
त्यावर आता बोलून काय होऊ शकत नाही… रवींद्र चव्हाण यांचा सुर…
भिगवण अपहरण प्रकरणामुळे भिगवणमध्ये सतर्कता… तरुणाच्या घराबाहेर 50 हुन अधिक पोलीसांचा पहारा
इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये येथील 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाने संपूर्ण गावात तणावाचे वातावरण झाले होते, या अपहरण प्रकरणानंतर काल भिगवण कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांसह आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात होता. तरुणी व संबंधित तरुण अद्याप घरी परतले नसून, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अपहरणकर्ता तरुणाच्या घराबाहेर 50 पेक्षा अधिक पोलीस तैनात आहेत.
























