Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: बारामतीतील अजित पवारांच्या अपघाती निधनाला दीड महिना पूर्ण झाला..मात्र तपास योग्य पद्धतीनं होत नसल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी अनेक मंत्री आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या..काल आमदार रोहित पवार...More
अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका. महापालिकेतील सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेले सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत रात्री दोन वाजता केला शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी पक्षप्रवेश. चार नगरसेवकांसह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांचाही शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. पक्ष प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये मनोज पाटील सागर भारुका सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे या नगरसेवकांचा समावेश. आता अकोला महापालिकेत ठाकरे उरले फक्त दोन नगरसेवक. प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये नुकतीच महापौर पदाच्या महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबावर उमेदवार असलेल्या सुरेखा काळे यांचाही समावेश.
ग्राफिक्स शिंदे गटात प्रवेश केलेले नगरसेवक आणि पदाधिकारी.
मंगेश काळे (जिल्हा प्रमुख उबाठा)
मनोज पाटील (नगरसेवक उबाठा )
सागर भरुका ( नगरसेवक उबाठा)
सोनाली सरोदे ( नगरसेवक उबाठा)
सुरेखा काळे ( नगरसेवक उबाठा)