पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या गॅस टंचाईचा फटका आता विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही बसू लागला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा जवळपास बंद झाल्यामुळे शहरातील बहुतांश हॉटेलकडे केवळ एक-दोन दिवसांचा गॅस शिल्लक असून अनेक हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दररोज पंढरपूरमध्ये सुमारे एक लाख भाविक येतात, तर शनिवार-रविवारी ही संख्या अडीच ते तीन लाखांपर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत हॉटेल बंद पडल्यास भाविकांना चहा-नाश्ता आणि जेवणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तीर्थक्षेत्राचा विचार करून किमान काही प्रमाणात तरी व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरू करावा, अशी मागणी हॉटेल चालक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग बापट यांनी केली आहे.
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...
Advertisement
मुकेश चव्हाणLast Updated: 13 Mar 2026 04:13 PM

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा (Iran Israel War) फटका आता भारतीय स्वयंपाक घराला बसत असल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत (Gas Shortage) निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या...More
Maharashtra Live Blog Updates: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा (Iran Israel War) फटका आता भारतीय स्वयंपाक घराला बसत असल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत (Gas Shortage) निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात केंद्र सरकारने सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार, ग्रामीण भागात आता 45 दिवसांनंतरच एलपीजी सिलेंडर बुक करता येणार आहे, तर शहरी भागात 25 दिवसांचे अंतर ठेवून बुकिंग करता येईल. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत ही माहिती दिली. यापूर्वी देशभरात सिलेंडर बुकिंगसाठी 21 दिवसांचा कालावधी निश्चित होता, जो अलीकडे 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता ग्रामीण आणि शहरी, या दोन्ही भागांसाठी वेगवेगळी कालमर्यादा ठरवण्यात आली आहे.
Continues below advertisement
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा दणदणीत विजय
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा दणदणीत विजय
अध्यक्षपदासाठी भाजपच्या अर्चना पाटील यांना 45 मतं
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कांचन मला सांगवे यांना 9 मते
गॅस शेगडी थंड, चुली पेटल्या; साताऱ्यातील हॉटेल व्यवसाय संकटात..
आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता साताऱ्यातील हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांना चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.गॅस शेगडीवर काम करणे सोपे असताना आता चुलीवर स्वयंपाक करणे कामगारांसाठी अवघड ठरत आहे. त्यामुळे हॉटेल लाईनमध्ये कामगार मिळणेही कठीण झाले आहे.पूर्वी हॉटेलमध्ये ३० ते ३५ प्रकारचे मेनू उपलब्ध असायचे, मात्र गॅस टंचाईमुळे आता केवळ ७ डिशेसच तयार केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्याही घटत असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.दरम्यान, सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हॉटेल व्यवसायासाठी किमान एक तरी व्यवसायिक गॅस सिलेंडर रोज उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दादा रेस्टॉरंटचे मालक प्रशांत फडतरे यांनी केली आहे.
Continues below advertisement
Pune News : पुण्यातून 90 लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त; सीमा शुल्क विभागाच्या नार्कोटिक्स विभागाची कारवाई
पुण्यातून ९० लाख रुपयांचे एम डी ड्रग्स जप्त
सीमा शुल्क विभागाच्या नार्कोटिक्स विभागाची कारवाई
८९८.९४ ग्रॅम वजनाचे ८९.८९ लाख रुपयांचे एम डी जप्त
पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथून एका व्यक्तीला अटक
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा शुल्क पुणे विभागाच्या नार्कोटिक्स सेल यांना एक व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असता त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ८९८ ग्राम वजनाचे एम डी हे अमली पदार्थ मिळून आले. बाजार भावानुसार त्याची किंमत ९० लाख रुपये इतकी आहे
इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम; डोंबिवली MIDC मधील 100 हून अधिक कंपन्या संकटात
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्याचा फटका आता स्थानिक उद्योगांनाही बसत असल्याचे चित्र आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरातील जवळपास १०० हून अधिक कंपन्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने हॉटेल व्यावसायावर आधीच संकट आले आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसत आहे. डोंबिवली एमआयडीसीतील अनेक कंपन्यांकडे केवळ एक ते दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.या परिस्थितीत कंपन्यांना पुन्हा एकदा पर्यायी इंधनाचा पर्याय शोधावा लागत आहे. मात्र ते इंधन देखील मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असल्याने उद्योजकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गॅस टंचाई कायम राहिल्यास कंपन्यांचे उत्पादन थांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयात-निर्यात व्यवहारांवरही परिणाम झाला असून उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून उद्योगांना आर्थिक फटका बसत आहे.या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकांकडून करण्यात येत आहे.
मनसेला मराठी कलाकारांची साथ; राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेकांनी सभासदत्व स्वीकारले
मनसेला मराठी कलाकारांचीसाथ; राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेकांनी सभासदत्व स्वीकारले
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक मराठी कलाकारांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारले
दादरमधील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सभासद नोंदणीचा कार्यक्रम पार पडला
अभिनेते पुष्कर श्रोत्री, भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे आणि ऍड गुरु भरत दाभोलकर यांची कार्यक्रमाला उपस्थिती
मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि नेत्या शालिनी ठाकरेही उपस्थित
मनसेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाकडून राज्यभर सभासद नोंदणी अभियान राबवले जात आहे
जालन्यातील अंबडमध्ये पुरवठा विभागाची धडक कारवाई; 9 घरगुती गॅस सिलिंडर जप्त
जालन्यातील अंबड तालुक्यात पुरवठा विभागाने अवैध गॅस वापरांविरोधात धडक मोहीम राबवत ९ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले.जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आणि तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक किरणकुमार खांडेभराड यांच्या पथकाने शहरातील हॉटेल,रेस्टॉरंट व व्यावसायिक आस्थापनांची अचानक तपासणी केली.यावेळी व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलिंडर वापर होत असल्याचे आढळून आले होते.या प्रकरणी ‘जीवनावश्यक वस्तू कायद्या’अंतर्गत ९ सिलिंडर जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.दरम्यान, पथकाने तालुक्यातील ३ पेट्रोल पंपांचीही तपासणी करून साठा, विक्री नोंदी आणि इंधन वितरणाबाबत सूचना दिल्या.घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास कडक कारवाई केली जाईल,असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या लोहखाण विरोधी अन्नत्याग सत्याग्रहाला वाढता पाठिंबा, चंद्रपूरकरांनी मागण्यांच्या समर्थनार्थ उभारली मानवी साखळी
चंद्रपुरात वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या लोहारडोंगरी लोहखाण विरोधी अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा वाढत असल्याचं दिसत आहे. आज चंद्रपूरकरांनी बंडू धोत्रे यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ मानवी साखळी उभारली. चंद्रपूरकरांचा श्वास कोंडणाऱ्या खाणी नकोत, वाघ आणि वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात येणाऱ्या खाणी रद्द करा, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा उपाययोजना लागू करा अशी आंदोलकांची स्पष्ट भूमिका आहे. नवव्या दिवशी देखील बंडू धोत्रे यांचा अन्नत्याग सत्याग्रह सुरूच असून प्रशासन मात्र मौन बाळगून आहे.
मोदी सरकारच्या गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
मोदी सरकारच्या गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन...
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करत त्याठिकाणीच चूल पेटवत स्वयंपाक केला...
मोदी सरकारने अचानक घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 60 रुपये वाढ करून सर्वसामान्य जनतेवर मोठी आर्थिक बोजा टाकला आहे..
महाराष्ट्रातील अमरावतीसारख्या शहरांमध्येही ही वाढ लागू असून, स्थानिक दर सुमारे 937-946 रुपयांपर्यंत गेले आहेत.. व्यावसायिक (कॉमर्शियल) सिलेंडरची किंमतही 115 रुपयांनी वाढवण्यात आली.. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आजपर्यंत गॅस सिलेंडरच्या दरात किमान 50 वेळा वाढ झाली आहे..
काँग्रेस सरकारच्या काळात 400 रुपयांच्या आसपास असलेला घरगुती गॅस सिलेंडर आज 900 रुपयांपुढे गेला आहे..
व्यावसायिक सिलेंडरच्या वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स, छोटे उद्योग आणि खाद्य व्यवसायांवर मोठा परिणाम होणार असून याचा सर्वाधिक फटका महिलांना, गृहिणींना, सर्वसामान्य कुटुंबांना आणि हॉटेल उद्योजकांना बसणार आहे..
या अन्यायकारक दरवाढीविरोधात आणि दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अमरावती शहर जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जोरदार धरणे आंदोलन करत त्याठिकाणीच चूल पेटवत स्वयंपाक केला...
सुनेत्रावहिनी पवार यांचा जनता दरबार; लाडक्या बहिणींच्या अडचणींचे तात्काळ निराकरण
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार आयोजित केला. या जनता दरबाराला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले. विशेषतः अनेक लाडक्या बहिणी आपल्या विविध अडचणी आणि समस्या घेऊन या दरबारात आल्या होत्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रत्येकाची समस्या संयमाने ऐकून घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या अडचणी त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सामान्य नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्या तातडीने सोडवण्याच्या या उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
इराण मधील नेतृत्व हार मानणारे नाही; अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा अहवाल
इराण मधील नेतृत्व हार मानणारे नाही
इराणची विद्यमान राजवटही कोसळण्याच्या परिस्थितीत नाही
अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा अहवाल
अमेरिका इजराइल विरुद्ध इराण संघर्ष अधिक चिघळणार
प्रत्यक्ष जमिनीवर लष्करी कार्यवाही करावी लागेल
इराणच्या अंतरिम सरकारची देशावरील पकड कायम
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेचा सूत्रांच्या हवाल्याने दावा
मोठा मनस्ताप! गॅस सिलिंडरसाठी गडचिरोलीत ग्राहकांच्या रांगा
गडचिरोली : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता गडचिरोलीतही जाणवू लागला आहे. व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. सकाळपासूनच ग्राहक सिलेंडर घेऊन रांगेत उभे राहत असून सर्व्हर डाऊनमुळे सिलेंडरही बुकिंग होत नसल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यात 22 गॅस एजन्सी असून जवळपास सर्वच ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 22 भरारी पथकेही गठीत केली आहेत. मात्र व्यावसायिक सिलेंडर पूर्णपणे तर घरगुती सिलेंडरचा कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवा; 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
मुंबई : 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक; गिरीश महाजनांची असेल प्रमुख उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक
विधीमंडळात मुख्यमंत्री घेणार सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा
कुंभमंत्री गिरीश महाजनांची असेल प्रमुख उपस्थिती
कुंभमेळ्याच्या तयारीबाबत महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता
कुंभमेळ्यातील अडचणी दूर करण्याबाबत होणार चर्चा
आज दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन
त्रंबकेश्वर मंदिरातील भाविकाला मारहाण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार; जिल्ह्या न्यायाधीशांनी दिले आदेश
त्रंबकेश्वर मंदिरातील भाविकाला मारहाण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार
जिल्ह्या न्यायाधीशांनी दिले आदेश
सात दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे कनिष्ठ न्यायाधीशांना आदेश
प्रांत अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असतानाच न्यायाधीश मार्फ़त चौकशी करण्याचे आदेश
त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायाधीश आहेत, त्यामुळे सत्यता पडताळणीसाठी दिले चौकशीचे निर्देश
दर्शन रांगेत उभा असणारा भाविकाला देवस्थान च्या सुरक्षा रक्षकांनी केली होती मारहाण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला होता व्हायरल
गॅस तुटवड्यामुळे पुण्यातलं 25 हजार पोळ्या बनवणार केंद्र बंद होण्याच्या मार्गावर; 60 ते 70 महिलांवर घरी बसण्याची वेळ
गॅस तुटवड्यामुळे पुण्यातलं 25 हजार पोळ्या बनवणार केंद्र बंद होण्याच्या मार्गावर
इन्फोसिस, विप्रो, पुण्यातील विविध हॉस्पिटलला पुरवतात पोळ्या
आज पुरता gas साठा शिल्लक
60 ते 70 महिलांवर घरी बसण्याची वेळ
Covid पेक्षाही बिकट परिस्थिती आल्याचं केंद्राच्या विक्रेत्याच मत
चार ते पाच रुपयाला एक पोळी विकली जाते मात्र आता पोळीची किंमत वाढण्याची शक्यता
पुण्यातील धायरीतील 25 ते 30 हजार पोळ्या करणाऱ्या देशपांडे स्वयंपाकघराला सिलेंडर तुटवण्याचा फटका बसतोय. देशपांडे स्वयंपाक घरातून पुण्यातील हॉस्पिटल, इन्फोसिस विप्रो सारख्या आयटी कंपन्या, खराडी आयटी पार्क मधील काही कंपन्या महत्त्वाचं म्हणजे एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी या ठिकाणी शनिवार रविवार असलेल्या सगळ्या कार्यक्रमांसाठी चपाती म्हणजेच पोळी पाठवली जाते. देशपांडे स्वयंपाक घरात उद्या पुरेल एवढाच सिलेंडरचा साठा आहे. त्यानंतर त्यांनाही चुलीवर पोळ्या करण्याची वेळ येणार आहे. साधारण 60 ते 70 महिला यांच्या दोन युनिटमध्ये काम करतात.
धायरी परिसरात एक युनिट आहे आणि नांदेड फाट्याजवळ दुसरे युनिट आहे. दोन्ही युनिटला सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका बसतोय
Gas Shortage India : गॅस 45 दिवसांनी मिळणार, रिऍलिटी चेक..!
गॅसचा तुटवडा असल्यानं आता गॅस घेण्याची मर्यादा 45 दिवसांची केलीये. याचा रिऍलिटी चेक करण्यासाठी एबीपी माझाची टीम पुण्याच्या तळेगावमध्ये पोहचली तेंव्हा सुधीर राऊळ यांनी याआधीचा गॅस घेऊन 45 दिवस उलटले तरी त्यांचं बुकिंग होईना. त्यामुळं ते हतबल झालेत. तर याचं ठिकाणी काहींचं नशिबी उजळलंय असं म्हणावं लागेल. कारण त्यांना 25 दिवसांच्या मर्यादेत बुक केलेला गॅस मिळालाय. त्यामुळं ते आनंदी आहेत. मात्र त्याचवेळी जे रांगेत आहेत, त्यांना गॅस मिळेल का नाही, याची चिंता लागून आहे. आजवर महिनाभर पुरणारा गॅस यापुढं 45 दिवस कसा पुरवायचा हे कोडं कसं सोडवायचा असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यातून शिंगळा माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यास ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश
सह्याद्रीच्या खोऱ्यातून शिंगळा (कॅटफिश) माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यास ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश
पश्चिम घाटामध्ये 'अमलीसेप्स' वंशाच्या आढळाची आतापर्यंतची सर्वात उत्तरेकडील पुष्टी झालेली नोंद आहे. दुभंगलेली शेपूट, अपूर्ण मध्य रेखा, शेपटीच्या मध्यभागी असणाऱ्या शिरांमध्ये आकड्यासारख्या आकाराचा अभाव अशी नव्या माशाची वैशिष्ट्ये आहेत.
शिंगळ्याच्या नव्या प्रजातीचा मासा उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळतो. अशा प्रवाहांच्या तळाशी असलेले वाळू, गोटे आणि दगड यांचे मिश्रण नव्या दुर्मिळ माशाला लपण्यासाठी तसेच अन्न शोधण्यासाठी योग्य सूक्ष्म अधिवास उपलब्ध करून देते.
संशोधनामध्ये स्वतंत्र संशोधक बालाजी विजयकृष्णन आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे व अभिषेक शिर्के यांनी सहभाग घेतला. फाऊंडेशनने यापूर्वीही दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला असून संशोधन कार्याची देश-विदेशात दखल घेतली गेली आहे.
शेपटीच्या 'डोर्सल प्रोकरंट' (पृष्ठीय प्रवाह) भागास एकरूप न होता स्पष्टपणे वेगळा असलेल्या 'अडिपोझ फिन'ची रचना वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. 'अमलीसेप्स वायव्य' या नव्या प्रजातीचा शोध पश्चिम घाटात संवेदनशील अधिवासाच्या पर्यावरणीय अभ्यासाची गरज अधोरेखित करीत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांच्या संशोधन कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक केले
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज निवड; भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज निवड; भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती
32 दिवसांच्या सहली नंतर आज जिल्हा परिषद सदस्य धाराशिव मध्ये परतणार, जिल्हा परिषद सदस्यांचा रात्री सोलापुरात मुक्काम
भाजप शिवसेना महायुती म्हणूनच जिल्हा परिषद सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती
आमदार तानाजी सावंत महायुतीसोबत असणार, शिवसेनेचे सर्व जिल्हा परिषद सदस्य एकत्र धाराशिवकडे
सत्ता स्थापनेत उपाध्यक्ष पद शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती
महायुतीचा सत्ता स्थापनेचा अधिकृत फॉर्मुला अजूनही जाहीर नाही, शेवटच्या दिवसांपर्यंत सस्पेन्स
खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; नागपुरातील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच अंत, सहा जण गंभीर
- राजस्थानातील सालासर रोडवर भीषण अपघातात कामठीतील पारसे कुटुंबातील तिघांचा मृत्यू.
- आई-वडील आणि मुलगा जागीच ठार सहा जण गंभीर जखमी.
- मृतांमध्ये महादेव पारसे, त्यांची पत्नी कांता मुलगा घनश्याम यांचा समावेश आहे.
- खाटू श्याम बाबा दर्शनासाठी जात असताना टवेरा गाडीला पिकअपची जोरदार धडक.
- जखमींमध्ये चालक मनोज चिंदमवारसह आराधना पारसे, पायल पारसे , पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे.
- सर्व जखमींवर सालासर येथील रुग्णालयात उपचार सुरू.
- अपघाताची माहिती मिळताच कामठीतील कचरीपुरा परिसरात शोककळा.
- मृतदेह शवविच्छेदनानंतर कामठी येथे आणण्यात येणार.
Raigad News : भाजपचे राजेश मापारा यांची भाजप मधून हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस
एकीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड तर दुसरीकडे पक्षविरोधी कारवायांमुळे भाजपचे सुधागड तालुक्यातील प्रमुख नेते राजेश मापारा यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत परस्पर महाविकास आघाडी सोबत युती करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काम करून भाजप उमेदवारांना पडण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आलीय. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या लेटर वर अधिकृत पत्र काढत ही हकालपट्टी केलीय. शिवाय केलेल्या या कृतीबद्दल भाजप कडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
गोंदिया जिल्ह्यात पुन्हा हत्तीच्या कळपाचे आगमन; गोठणगाव परिसरात मका पिकाची नासधूस
गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात मागील काही वर्षांपासून हत्तींच्या कळपाचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरत असून गोंदिया जिल्ह्यात पुन्हा हत्तींच्या कळपाने प्रवेश केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सुमारे 20 ते 22 हत्तींचा कळप गोठणगाव वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात फिरताना आढळून आला असून परीसरातील मक्का पिकाची नासधूस केली असल्याची माहिती आहे. दरम्यान, वन विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असताना परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोठणगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी मिलिंद पवार यांनी ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा जंगलाच्या दिशेने जाणे टाळावे. तसेच हत्तींच्या हालचालींवर वनविभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनकर्मचारी सतर्क असल्याची माहिती त्यांनी दिली....
गोंदिया जिल्ह्यात पुन्हा हत्तीच्या कळपाचे आगमन; गोठणगाव परिसरात मका पिकाची नासधूस
गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात मागील काही वर्षांपासून हत्तींच्या कळपाचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरत असून गोंदिया जिल्ह्यात पुन्हा हत्तींच्या कळपाने प्रवेश केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सुमारे 20 ते 22 हत्तींचा कळप गोठणगाव वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात फिरताना आढळून आला असून परीसरातील मक्का पिकाची नासधूस केली असल्याची माहिती आहे. दरम्यान, वन विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असताना परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोठणगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी मिलिंद पवार यांनी ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा जंगलाच्या दिशेने जाणे टाळावे. तसेच हत्तींच्या हालचालींवर वनविभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनकर्मचारी सतर्क असल्याची माहिती त्यांनी दिली....
युद्धाची झळ आता थेट टिफीन सेवा देणाऱ्यांच्या स्वयंपाकघरात!
आखाती देशांमधील युद्धाचे ढग आता केवळ नकाशावर मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्याचे चटके थेट सर्वसामान्यांच्या चुलीपर्यंत पोहोचले आहेत. गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि गगनाला भिडलेले दर यामुळे मोठ्या हॉटेल्स पाठोपाठ आता घरगुती टिफिन सेवा देणाऱ्या लघु उद्योजकांनाही लागली आहे. १३ वर्षांची परंपरा जपणाऱ्या खेताडे कुटुंबानंही आता बंद ठेवलेली चुल सुरू केली आहे. युद्धामुळे गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. सिलिंडर मिळत नाहीये आणि मिळालाच तर त्यासाठी अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागत आहे. १३ वर्षांपासून आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांची परवड होऊ नये, त्यांना वेळेवर आणि चविष्ट जेवण मिळावे, यासाठी या कुटुंबानं 'चुलीवरचा स्वयंपाक' सुरू केला आहे.
वाहतूक पोलिसावर हल्ला; काशिमीरा परिसरातील घटना, आरोपी फरार
मिरा रोड येथील काशिमीरा परिसरात कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिसावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक पोलीस किरण सहाणे हे अमर पॅलेस परिसरात वाहतूक नियंत्रणाचे काम करत असताना दोन दुचाकीस्वारांमध्ये एकमेकांना कट मारण्याच्या कारणावरून जोरदार वाद सुरू झाला. सदर वाद मिटवण्यासाठी पोलीस किरण सहाणे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी एका दुचाकीस्वाराने संतापाच्या भरात सहाणे यांच्यावरच हल्ला करत त्यांना मारहाण केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर मारहाण करणारा दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या पोलिसावरच हल्ला झाल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रातील सर्व खासदारांना राष्ट्रपतींकडून ब्रेकफास्ट निमंत्रण
महाराष्ट्रातील सर्व खासदारांना राष्ट्रपतींकडून ब्रेकफास्ट निमंत्रण
सकाळी सर्व लोकसभा - राज्यसभा खासदारांना निमंत्रण
महायुतीचे सर्व लोकसभा - राज्यसभा खासदार राहणार उपस्थित
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात काही राज्यातील खासदारांना राष्ट्रपतींकडून निमंत्रण मिळणार असल्याची माहिती
भाजपकडून एसआयआर संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार
भाजपकडून एसआयआर संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार
भाजपकडून १७ मार्च रोजी मतदारयाद्यांचे पुनरावलोकन अभियानाच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी संध्याकाळी ५ वाजता महत्त्वाची बैठक
भाजपचे सर्व आमदार, महापौर, उपमहापौर, गटनेता, स्थायी समिती अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष आणि एसआयआर विधानसभा प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग एसआयआर संदर्भात मार्गदर्शन करणार
के.सी काॅलेजमध्ये १७ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता विशेष बैठकीचं आयोजन
भाजपकडून एसआयआर अभियानाचा प्रारंभ केल्यानंतर पहिलीच महत्त्वाची बैठक पार पडणार
आखातात सुरू असलेल्या युद्धाबाबत पंतप्रधान मोदींनी महत्त्वाचं भाष्य
आखातात सुरू असलेल्या युद्धाबाबत पंतप्रधान मोदींनी महत्त्वाचं भाष्य... युद्धामुळे संपूर्ण जगावर संकट आहे.. तरीही भारतावर सर्व जगाच्या नजरा आहेत.. त्यामुळे या कठीण काळात शांती आणि धैर्याने आपल्याला परिस्थितीचा सामना करावा लागेल, असं मोदींनी म्हटलंय.. दिल्लीतील एका कार्यक्रमात मोदी बोलत होते.. एलपीजीच्या पुरवठ्यावर काही लोक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.. असं असलं तरी कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं मोदी म्हणालेत
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय