Maharashtra Live Blog Updates: शिवभोजन थाळीचे १० महिन्यांचे थकीत बिल; महिला बचत गटांचा महसूलमंत्री बावनकुळे यांना घेराव
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या अचानक घेण्यात आलेल्या पदग्रहण सोहळ्यात पुन्हा एकदा मुनगंटीवार-जोरगेवार वादाचा भडका उडालाय. चंद्रपूर शहराचे स्थानिक आमदार असूनही किशोर जोरगेवार यांना पदग्रहणासाठी बोलवण्यात...More
बोईसर पूर्वेतील दांडी पाडा व लोखंडी पाडा परिसरात उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालघर महसूल विभागाने मोठी कारवाई केली. रमेश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून ही मोहीम राबवण्यात आली. कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात होता. काही व्यक्तींनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली; पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर भूमिका कायम ठेवत, पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
मुंबई: जोगेश्वरी पश्चिमेतील ओशिवरा परिसरात गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली सिटी इंटरनॅशनल स्कूल अचानक बंद करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळेत शिकणाऱ्या सुमारे ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस देण्यात आली असून, यामुळे पालकांमध्ये गोंधळ आणि भीतीचे वातावरण आहे.
शाळा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, शाळेची जागा भाडेतत्त्वावर असून ३५ लाखांवरून थेट ५० लाख रुपये भाडेवाढ करण्यात आल्याने हा खर्च परवडणारा नसल्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.
या निर्णयाविरोधात मनसे आक्रमक झाली असून, वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी शाळा बंद होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. शाळा प्रशासनाने भूमिका बदलली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, पालकांनी शिक्षण विभागाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
रायगडमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीची हालचाल सुरू
शिवसेनेच्या सर्वाधिक जागा ..मात्र युती कोणाशी यावरून गणित ठरणार
शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची गटनोंदणी
शिवसेना गट प्रमुख मानशी दळवी यांची एकमताने निवड
मानसी दळवी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी
आमदार महेंद्र दळवी, युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या उपस्थितीत गट नेते पदाची निवड संपन्न
बीड: परळी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पहा पशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्सपोचे उद्घाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांनी पाच - दहा लाख रुपयांचा फंड मागू नये. बकरे मागा, कोंबडे मागा, आम्ही ते योजनेतून देऊ असे म्हटले. यानंतर अधिकाऱ्यांना सूचना केली की, या ठिकाणी आणलेल्या बकरे आणि कोंबड्यांवर लक्ष ठेवा. काहीजण रात्रीतून त्या गायब करतील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
गडचिरोली : अहेरी येथील काँग्रेस नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मालकीची अवैध बहुमजली इमारत नगर पंचायतीने गुरुवारी भुईसपाट केली. यात अजय कंकडालवार यांचा मोठा खर्च पाण्यात गेला असतानाच आता नगर पंचायतीला इमारत बांधकाम पाडण्यासाठी लागलेल्या 50 लाखांचे दहा पट म्हणजे जवळपास 5 कोटी रुपयांचा खर्च भरावा लागणार आहे. नियमानुसार, अनधिकृत इमारत पाडण्यासाठी प्रशासनाला जो खर्च येतो, त्याच्या दहा पट रक्कम संबंधित मालकाकडून वसूल केली जाते. या इमारतीचे पाडकाम, न्यायालयीन प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय खर्च मिळून सुमारे 50 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. या खर्चाच्या 10 पट म्हणजेच जवळपास 5 कोटी शासनाकडे जमा करावे लागणार आहेत. नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत ही रक्कम भरणे बंधनकारक असते. मुदतीत ही रक्कम भरली नाही, तर त्यावर दररोज 18 टक्के प्रमाणे चक्रवाढ व्याजही आकारले जाते, अशी माहिती आहे.
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका कार चालकांनं एसटी महामंडळाच्या बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत एसटी महामंडळाच्या बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस चा चार चाकी वाहनाला धक्का बसला. यामुळे चारचाकी धारकानं राष्ट्रीय महामार्गावर बस थांबवून बस चालकाला शिवीगाळ करीत मारण्यापिटण्याची धमकी दिली. यामुळे बराचकाळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबली. हा संपूर्ण प्रकार भंडाराच्या नागपूर नाका परिसरात घडला. चार चाकी वाहनधारकाच्या धिंगाणा घातल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. यानंतर बस चालकानं ही बस थेट पोलीस ठाण्यात नेत पोलिसात तक्रार दाखल केली. वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
बीड: महापशुधन एक्सपो आम्ही अजितदादांना समर्पित करत आहोत असे पंकजा मुंडे उद्घाटन प्रसंगी बोलल्या आहेत. आज दादा असले असते तर त्यांना कौतुक वाटलं असतं त्यांनी या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं असतं.अजित पवारांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात एका डेअरी व्यवसायाने केली होती हे त्यांनी सांगितले होते असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. पुढे बोलताना आम्ही शिवरात्रीच्या निमित्ताने महा पशुधन एक्सपोचे आयोजन केले असून याचा लाभ सर्व पशुधन प्रेमींनी घ्यावा. उद्या महा पशुधन एक्सप्रेस साठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी या कार्यक्रमाचं आमंत्रण दिल असून ते उद्या या एक्सपोसाठी उपस्थित राहणार असल्याचं मुंडे यावेळी म्हणाल्या.
राज्यातील शिवभोजन थाळी योजना चालवणाऱ्या महिला बचत गटांच्या महिलांनी थकीत बिलांवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. नागपूर येथील विभागीय कार्यालयात बावनकुळे आले असता महिलांनी त्यांना घेराव घातला महिलांचा दावा आहे की, मागील १० महिन्यांपासून शिवभोजन थाळीची देयके थकीत असून, संपूर्ण राज्यात सुमारे १९५ कोटी रुपये थकबाकी झाली आहे. अनेक बचत गट आर्थिक अडचणीत सापडले असून तातडीने बिल अदा करण्याची मागणी महिलांनी यावेळी केली.
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या 88 रिक्त जागांसाठी 6853 अर्ज दाखल झालेत. त्यानुसार आज पहाटेपासून पोलीस परेड ग्राउंडवर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 300 हून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तात आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. यामध्ये 2000 पेक्षा जास्त उमेदवार हे उच्चशिक्षित असल्याचे समोर आले. यामध्ये एमबीए, एम टेक, बी टेक, बीएड, डीएड यांसह अनेक उच्चशिक्षित उमेदवार सध्या पोलीस भरती प्रक्रियेत आपलं नशीब आजमावत आहेत. वाढती बेरोजगारी आणि सरकारी नोकरी मिळवण्याची संधी असल्याने हे सर्व उच्चशिक्षित पोलीस भरतीत उतरले आहेत. दरम्यान ही भरती प्रक्रिया संपूर्ण पारदर्शीपणे सुरू असल्याचं पोलीस अधीक्षकाने म्हटल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष आणि गटनेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला
शहराध्यक्ष श्रीकांत पाटील आणि गटनेते सोपानकाका चव्हाणा सुनेत्रा पवार यांच्या भेटीला दाखल
आज महापालिका स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाधिकारी सुनेत्रा पवार यांना भेटले
पुणे सर्किट हाऊस येथे भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मुंबई दौऱ्यावर
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदी मुंबईत
१७ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार
इंडो फ्रेंच कल्चरल कार्यक्रमाचे आयोजन तसेच लोकभवनाच्या भेटीसह एका सांस्कृतिक कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजेरी लावणार
शशिकांत शिंदेंच्या लेखाची प्रत सुनील तटकरेंनी मागवली
राष्ट्रवादी मुखपत्रात प्रसिद्ध झाला आहे शशिकांत शिंदेंचा लेख
संध्याकाळी ४:०० वाजता सुनील तटकरे जाहीर करणार भूमिका
अजित पवारांकडे दोन्ही एकत्रित राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व , शशिकांत शिंदेंचा लेखात दावा
झाडू संतांचे मार्ग म्हणत पंढरपूरच्या नूतन नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी शहराच्या सफाई अभियानाची सुरुवात केली. नगराध्यक्ष डॉक्टर भालके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्वच्छ व सुंदर पंढरपूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आज नगरपालिकेचे कर्मचारी आणि शाळकरी मुलांना सोबत घेत या सफाई अभियानाची सुरुवात झाली.
पंढरपूर शहरातील एकही उद्यान सुरू नसल्याने आज गेल्या आठ वर्षापासून बंद असलेल्या पद्मावती उद्यानातही सफाई करण्यात आली. आज संत पेठ पद्मावती उद्यान आणि शहरातील काही भाग सफाईसाठी घेण्यात आले होते. आपल्या शहरात येणारे हजारो पर्यटक आणि वारकऱ्यांच्या साठी शहरातील नागरिकांनी या सफाई अभियानात सहभागी होण्याचे आवाहनही डॉक्टर प्रणिता भालके यांनी केले आहे. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि सर्व इतर अधिकारी वर्गही या सफाई अभियानात सहभागी झाला होता.
नांदेड जिल्ह्यातील नरसी गावात माजी सरपंच असलेल्या दोन कुटुंबात तुफान हाणामारी झालीय, चक्क पोलिसांच्या देखतच दोन गट एकमेकांना जीवघेणी मारहाण करताना दृश्य मोबाईल कॅमेरात चित्रीत झाले आहेत. या हाणामारीत जवळपास पाच जण जखमी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे, काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष संभाजी भिलवंडे यांचा जखमीत समावेश आहे. या दोन गटात सातत्याने वादविवाद होत असतात त्याचे रूपांतर आता तुंबळ हाणामारीत झालेय. मराठवाड्यात भावकीच्या हाणामारी व्हायच्या या घटना तशा नवीन नाहींत मात्र आता कालानुरूप अनेकजण समेट घडवताना दिसतात. मात्र नरसी इथले भिलवंडे कुटुंब एकमेकांच्या जीवावर उठल्याचे या दृश्यातून दिसतंय. या प्रकारामुळे नरसी गावात सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांनी आता बंदोबस्त वाढवला आहे. या हाणामारीत जखमींवर सध्या उपचार सुरू असून परस्पर विरोधी तक्रारी नंतर गुन्हे दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बीडच्या परळीतील नगर परिषदे अंतर्गत असलेल्या डॉ. भालचंद्र वाचनालयाच्या इमारतीला दिवंगत लोकनेते अजितदादा पवार भवन हे नाव देण्यात यावे अशी मागणी परळीतील नागरिकांकडून करण्यात आली आहे.डॉ भालचंद्र वाचनालयाची नवीन अद्ययावत इमारत तयार आहे.दिवंगत अजित पवार यांचे परळीतील विकासाचे योगदान पाहता वाचनालयाच्या इमारतीला लोकनेते अजितदादा पवार भवन असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून याबाबतचे निवेदन आज परळी नगर परिषद कार्यालयात देण्यात आले.यावेळी निवेदन देताना परळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेवेळी आंदोलन करणाऱ्या ८९ मनसे कार्यकर्त्यांना आज वांद्रे कोर्टात हजर राहण्याचे आदेश
सगळ्या ८९ आरोपींना कमिटलसाठी आज हजर राहण्याचे आदेश
तेव्हा मनसेत असलेले आणि सध्या ठाकरेंचे प्रवक्ते अखिल चित्रे तसेच सध्या भाजप मध्ये असलेले हाजी अराफत शेख कोर्टात उपस्थित
२००८ मध्ये रेल्वे भरती परिक्षेदरम्यान उत्तर भारतीय विद्यार्थ्यांविरोधात आंदोलनाप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती
त्यांना वांद्रे कोर्टात आणल असता मानसैनिकांनी मोठ आंदोलन केल होत
या आंदोलना प्रकरणी ८९ मानसैनिकांवर निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
यावर्षी सुद्धा मराठी भाषा दिन दणक्यात सादर केल्या जाणार आहे
अजून नियोजन सुरु आहे झाला की सांगू तुम्हाला
सुपर प्रवक्ता यांना उद्धव ठाकरे यांची भीती वाटतेय का ?
अग अग म्हशी मला कुठे नेशी अशे संजय राऊत आहे
संजय राऊत यांना चंद्रपूरात होईल हे माहिती होत
ठिकठिकाणी रोड खोदून ठेवले आहे
चार दिवस कारवाई करतीय नंतर च काय
- संदीप देशपांडे
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट
- विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धूरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णयही साहेबांच्यासह सर्व नेत्यांनी केला होता असे म्हटले आहे.
प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या अजित पवार यांना समर्पीत करण्यात आलेल्या मासिकाच्या अध्यक्षिय लेखात असे म्हटले आहे.
याचाच अर्थ शरदचंद्र पवार यांचा पक्ष राष्ट्रवादीत विलिन करण्यास शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचे ठरले होते याचा उल्लेख या अध्यक्षिय लेखात करण्यात आलाय.
धुळे महापालिकेतील महापौरांचे दालन गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून बंद ठेवण्यात आले होते अखेर हे दालन महापौरांसाठी आज सज्ज करण्यात आले असून आकर्षक पद्धतीने हे महापौरांचे दालन सजविण्यात आले आहे धुळे महापालिकेच्या महापौर पदाचा मायादेवी परदेशी आणि उपमहापौर पदाचा ज्योत्स्ना पाटील ह्या आपल्या पदभार स्वीकारणार असून यानिमित्त महापालिकेत जय्यत तयारी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे राज्यातील महानगर पालिका निवडणुकीतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष यांचा लवकरच मुंबईत मेळावा होणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या विजयी उमेदवाराचा सत्कार सोहळा पार पडणार आहे
त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिॅदेंच्या हस्ते उपस्थित नगरसेवक आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे
पुढील पाच वर्ष आता निवडणुका नाही, त्यामुळे पक्ष संघटन वाढवणे, पक्ष बळकट करणे
गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या माध्यमातून शिवसेना घराघरात पोहचवण्यात येणाऱ्या काळात दिला जाणार भर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाकडून होणाऱ्या आरोपाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुख संमती?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे, सूरज चव्हाण यांच्याकडून अजित पवारांचा घातपात झाल्याचा दररोज सोशल मीडियातून आरोप
मिटकरी, ठोंबरे आणि चव्हाण यांच्याकडून व्यक्त होणाऱ्या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ फळी नाराज असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती
वरिष्ठांची नाराजी लक्षात येऊन सुद्धा मिटकरी, ठोंबरे, चव्हाण यांच्याकडून आरोपांची मालिका सुरूच
विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात हालचाली
रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता
विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील ५ जागा रिक्त
राज ठाकरे यांनी बोलावली शिवतीर्थावर बैठक
मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि मुंबईतील विभाग अध्यक्ष बैठकीसाठी उपस्थित राहणार
मराठी भाषा दिनाच्या संदर्भात बैठक होणार असल्याची माहिती
बीडच्या प्रयत आजपासून महा पशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले असून या महा पशुधन एक्स्पो चे उद्घाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज 11 वा.केले जाणार असून.या महापशुधन एक्सपोची जय्यत तयारी तहसील समोरील 22 एकर मैदानात करण्यात आली आहे. देशभरातील पशुधन या एक्सपो मध्ये सहभागी होणार असून पशुधनाचे संवर्धन वाढीसाठी चर्चासत्र, शेतकरी व पशुपालनासाठी उपयुक्त तज्ञांचे मार्गदर्शन ,पशुपालनातले प्रयोग, वेगवेगळ्या जातीचे पशु- पक्षी - प्राण्यांचे प्रदर्शन यासह महाएक्सपोमध्ये शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेले तीनशे हून अधिक स्टॉल्स असणार आहेत
- केंद्र सरकारच्या पीएम ई-बस योजनेंतर्गत महापालिकेला ५० ई-बसेस प्राप्त.
- बसेसचे लोकार्पण उद्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.
- कोराडी आगार येथे दुपारी १२.३० वाजता समारंभाचे आयोजन. दूरदृश्य प्रणाली च्या माध्यमातून कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर राहणार उपस्थित.
- मागील दीड महिन्यांपासून लोकार्पणाअभावी बसेस डेपोमध्ये सज्ज.
- लोकार्पणानंतर बसेस शहरातील ११ मार्गांवर धावणार.
- पहिल्या टप्प्यात ५० बसेस; केंद्र सरकारकडून टप्प्याटप्प्याने एकूण १५० बसेस उपलब्ध होणार.
- ई-बसेसमुळे कार्बन उत्सर्जनात घट; स्वच्छ व हरित नागपूर मोहिमेला गती.
महाड तालुक्यातील दहिवड गावाजवळ रिक्षाला झालेल्या अपघातात रिक्षाचालक सुजित सकपाळ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर याच रिक्षातील अन्य चौघेजण जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर पोलिसांनी सुजित याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
पुणे महापालिकेच्या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन दिवस शिल्लक
पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अम्नेस्टी योजना सुरू केली आहे.
ही योजना दोन दिवस शिल्लक राहिली असून नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थकबाकीदारांना ५० टक्के सवलत देण्यात येत आहे.
२५ फेब्रुवारीपर्यंत ही योजना लागू राहणार आहे.
योजनेनुसार करदात्यांना थकीत करावर ७५ टक्के दंडमाफी मिळत आहे.
महापालिकेने आतापर्यंत सुमारे १८८ कोटी रुपये थकबाकी वसूल केली आहेत.
उर्वरित थकबाकीदारांनी त्वरित कर भरावा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखालीच विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संबंधित शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल राज्य मंडळाकडे सादर करण्यात आला आहे. परीक्षेनंतर विभागीय स्तरावर समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळल्यास संबंधित मंडळ आणि परीक्षा केंद्र रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
शेतावरून घराकडे परतणाऱ्या एका शेतकऱ्यावर झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने हल्ला केला. यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मासलमेटा इथ घडली. मुकुंद पटले (३४) असं गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नावं आहे. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर शेतकऱ्यानं आरडाओरड केल्यानं अस्वलानं लगतच्या झुडपात धुवून ठोकली. लाखनी वनपरिक्षेत्राच्या वन कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून अस्वलाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अस्वल सध्या शेतशिवारातचं असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत
लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश अपयश लक्षात घेऊन पक्षात बांधणी केली जाणार
कोकण पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना झालेल्या निवडणुकांमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही
यावरून शिंदेंनी ३ ते ४ मंत्र्यांचे कान टोचले असून लवकरच मंत्रीमंडळात त्यांच्या जागी नव्या चेहर्यांना संधी देण्याच्या तयारीत शिंदे असल्याचे कळते
निवडणुकीत मिळालेले यश अपयश लक्षात घेऊन शिवसेनेच्या सर्व जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना दिलेल्या आहे
निवडणुकांमध्ये आपण कुठे कमी पडलो, का पडलो याची कारण मीमासा करण्याच्या सूचनाही दिलेल्या असल्याची सूत्रांची माहिती
मुंबई विद्यापीठाकडून जुन्या अभ्यासक्रमांच्या ३०४ परीक्षा बंद
शून्य नोंदणी असलेल्या १२५ परीक्षा आणि अभ्यासक्रम बंद होऊन १० वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या १७९ परीक्षा बंद
मागील दोन ते तीन शैक्षणिक वर्षापासून ज्या अभ्यासक्रमांना कोणत्याही विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नाही किंवा शून्य नोंदणी आहे अशा १२५ परीक्षा आणि ज्या अभ्यासक्रमांचा कालावधी हा १० वर्षे पूर्ण झालेला आहे अशा १७९ परीक्षा या मुंबई विद्यापीठातर्फे निष्क्रिय परीक्षा म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या परीक्षा यापुढे घेतल्या जाणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आला आहे. यामध्ये शून्य नोंदणी असलेल्या अभ्यासक्रमांच्या
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या २३ परीक्षा
मानवविज्ञान विद्याशाखेच्या १५ परीक्षा
आंतरविद्याशाखा ४२ परीक्षा
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ४५ परीक्षांचा समावेश आहे.
या परीक्षांना मागील दोन ते तीन वर्षांपासून शून्य नोंदणी असल्यामुळे या परीक्षा विद्यापीठाकडून बंद करण्यात येत आहेत.
तथापी या अभ्यासक्रमांना कोणत्याही संलग्नित महाविद्यालयातील किंवा संस्थेकडून विद्यार्थी नोंदणी बाबतचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास फक्त या अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
यासाठी विद्यापीठाकडून या परीक्षा पूणर्रकार्यान्वित केल्या जाणार असून परीक्षा कार्यक्रम, प्रश्नपत्रिका निर्मिती, परीक्षक नियुक्ती व इतर परीक्षा प्रक्रिया विद्यापीठाकडून नियमानुसार राबविण्यात येईल.
मात्र ज्या अभ्यासक्रमांचा कालावधी १० वर्षे पूर्ण झाला आहे अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार नसल्याची सर्व संबंधितांनी यांची नोंद घ्यावी असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विविध विद्याशाखेअंतर्गत अभ्यासक्रम बंद होऊन १० वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या १७९ परीक्षांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील १० परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील ८६ परीक्षा, मानवविज्ञान विद्याशाखेच्या ३८ परीक्षा आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांच्या ४५ परीक्षा यापुढे विद्यापीठामार्फत घेण्यात येणार नसल्याचे विद्यापीठाच्या १० फेब्रुवारी २०२६ रोजीच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
एकतर्फी प्रेमसंबंधातून माथेफिरू तरुणाने तरुणीचा पाठलाग करून तिला मुलुंड रेल्वेस्थानकात नेत आत्मदहनाची धमकी दिली.
याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तरुणी मुलुंडमध्ये सेल्समन म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी घाटीपाडा परिसरात राहत असताना तिची पुरब मनोहर गोरे (२१) याच्याशी ओळख झाली होती.
२०२४ मध्ये दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, वारंवार होणाऱ्या वादांमुळे डिसेंबर २०२५ पासून तरुणीने त्याच्याशी संपर्क तोडला होता. त्यामुळे तिच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर नेहमी पाठलाग करायचा.
बुधवारी ती कामासाठी घराबाहेर पडताच गोरे तिच्या शॉपबाहेर आला. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
तिने नकार देताच तिचा हात पकडून २० ते २५ फूट अंतरावर असलेल्या मुलुंड रेल्वेस्थानकात नेले. तिचा मोबाइल तपासला.
त्यानंतर त्याच्या खिशातून पेट्रोलने भरलेली बॉटल काढून स्वतःच्या अंगावर ओतून घेत, सोबत नाही राहिली तर स्वतःला जाळून घेण्याची धमकी दिली.
तरुणीने आरडाओरडा करताच नागरिक जमताहेत पाहून तो पळून गेला. अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास करत आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Blog Updates: शिवभोजन थाळीचे १० महिन्यांचे थकीत बिल; महिला बचत गटांचा महसूलमंत्री बावनकुळे यांना घेराव