Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

मुकेश चव्हाणLast Updated: 12 Mar 2026 02:03 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: राज्यभरात गॅसचा तुटवडा पाहायला मिळत आहे. सोलापुरात घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या ठिकठिकाणी रांगा पाहायला मिळतायत. गॅसची उपलब्धता लक्षात घेत गॅस एजन्सीमार्फत व्यावसायिक तत्वावर पुरवण्यात येणाऱ्या सर्व...More

कला शिक्षक भरतीसाठी आझाद मैदानावर आंदोलन

 यंदाच्या शिक्षक भरतीत कला आणि कार्यानुभव शिक्षकांचीही भरती प्राधान्याने करावी या मागणीसाठी राज्यभरातील कला शिक्षकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे...कला आणि कार्यानुभव शिक्षकांची बिंदूंनामावली स्वतंत्र करावी तसेच कला आणि कार्यानुभव शिक्षकांची जास्तीत जास्त पद भरावीत अशी मागणी शिक्षकांनी केलीये... राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलाताना कला शिक्षकांची पदभरती करू असं आश्वासन दिलं आहे मात्र किती पदे रिक्त आहेत आणि किती पदे भरली जाणार याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही, त्यामुळे कला शिक्षक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे...दरम्यान या शिक्षण व्यवस्थेबाबत जेष्ठ शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केलीये.