Maharashtra Live Blog Updates: संजय राऊत यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट; दोन नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांकडून आज देशव्यापी भारत बंदची (Bharat Bandh 12 Feb 2026) हाक देण्यात आली आहे. देशभरातून विविध कामगार संघटनांचे 30 कोटी कामगार आज...More
मुंबई : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत झालेल्या करारामळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारकडून वेतनवाढीच्या रकमेचा हफ्ता न दिल्याने एसटी कर्मचारी संघटनांकडून आक्रमक पवित्रा
मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळ कार्यालयातील आवारात कर्मचारी संघटनेकडून आंदोलन
जवळपास २०० कोटी रुपयांची रक्कम थकीत झाल्याने महामंडळावर आर्थिक बोजा पडणार असल्याचा आरोप
बीड : आज सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचे विकासाचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण आपसातील मतभेद बाजूला ठेऊन एकत्रितपणे वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वतोपरी योगदान देऊ अशी भावनिक साद बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांनी दिल्याचे दिसून आले.मुंडे यांनी स्वर्गीय अजित पवार यांचा निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडल्यानंतर ही साद घातलीय.
पुढे बोलताना स्व.अजितदादा यांचा मला कायम वडीलकीचा आधार होता. त्यांचे आणि माझे संबंध हे खूप वेगळे होते. दादांच्या अकाली जाण्याने खूप मोठी हानी आणि जिल्ह्याचे देखील खूप मोठे नुकसान झाले. दादांनी कमी कालावधीत बीड जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न मार्गी लावण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले. नुकतेच बीड जिल्ह्यात संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ११ वसतिगृहे उभारणीस १५९ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला त्याबाबत दादांनी मला शब्द दिला होता असे मुंडे म्हणाले आहेत.
यवतमाळ नगरपरिषदेत चार वर्षाच्या प्रशासक राजनंतर पार पडलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत नागरिकांच्या प्रश्नांना तीलांजली दिल्या गेली, नगराध्यक्षांकडून भेदभाव केल्या गेला असा आरोप काँग्रेसच्या गटनेत्या वैशाली सवाई यांनी केला. नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी शंभर दिवसांचा कृती आराखडा ठेवला असला तरी त्यात जनहिताचे कुठलेही मुद्दे नाही. पालिकेतील भंगार विक्री, पदाधिकाऱ्यांच्या दालनांचे सुशोभीकरण यासारखे विषय घेतल्या गेले, स्वच्छता पाणी रस्ते याबाबत कुठलेही भाष्य नाही. केंद्राच्या योजनेतून होणारे नमो उद्यान शहर वस्ती बाहेर आहे. शौचालयाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटींची उधळपट्टी झालेली आहे. खाजगीकरण करण्याला देखील काँग्रेसचा विरोध असल्याचे वैशाली सवाई यांनी सांगितले.
परभणीत महापौर निवडणूक, सय्यद इक्बाल विजयी
महापौर पदाचे उमेदवार
शिवसेना
सय्यद इकबाल सय्यद खाजा
पडलेली मते ३९
भाजप
सौ तिरुमला मोकिंद खिल्लारे
पडलेली मते २६
हात उंचाउन पार पडले मतदान
राष्ट्रवादीचे अक्षय देशमुख आणि रजिया बेगम यांनी भाजपला मतदान केले नाही
Beed News : बीड तालुक्यात रिलायन्स जिओ नेटवर्क सेवा वारंवार खंडित होत असल्याने जिओ वापरकर्त्यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. मागील महिनाभराच्या कालावधीत वारंवार जिओ नेटवर्क सेवा खंडित होत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. यात विशेषतः डिजिटल व्यवहार बँक ऑनलाइन कामावर याचा परिणाम पाहायला मिळत आहे. महिनाभराच्या कालावधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काहीच तोडगा निघत नसल्याने, आज लिंबागणेश गावात मोबाईल टॉवर वर चढून हे आंदोलन करण्यात आले.
कल्याण आहिल्यानगर महामार्गावर ओतुर येथे सहलीला आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थींच्या एसटी बसचा भल्या सकाळच्या सुमारास अपघात झाला असुन १० ते १५ विद्यार्थी जखमी झालेत
आहिल्यानगर जिल्ह्यातुन जिल्हा परिषद शाळेतील ५३ विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी ,ओझर,लेण्याद्री परिसरात सहल येत होती यावेळी ओतुर जवळ चालकाचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने एसटी बस डिव्हाईडरला धडक लागुन अपघात झाला या अपघातात एसटी बस पलटी झाली असुन स्थानिक नागरिकांच्या मदतीने विद्यार्थींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले
कोकणात जाणारी मांडवी एक्सप्रेस तब्बल तीन तास उशिराने
अनेक प्रवासी सीएसएमटी दादर अशा वेगवेगळ्या स्थानकांवर रखडले
सकाळी ७:२५ वाजता दादर स्टेशनला मांडवी एक्सप्रेस अपेक्षित असताना दहा वाजल्यानंतर दादर सानकात गाडी आल्याने प्रवाशांचा संताप
कोकणातून येत असताना गाडी उशिरा आल्याने सीएसएमटीवरून सुटायला उशीर झाला असल्याचे मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण
मात्र एक्सप्रेस उशिरा असल्याची कोणतीही उद्घोषणा किंवा माहिती देखील प्रवाशांना दिली नसल्याने प्रवासी संभ्रमात
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आज पहिल्यांदा बैठक
अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक
बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार उपस्थित राहणार
सुनेत्रा पवार मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरसिंगने बैठकीला उपस्थिती लावणार
पुणे विभागीय कार्यालयात बैठकीचे आयोजन
जिल्ह्यातील सर्व अधिकारी देखील बैठकीला उपस्थित
अजित पवार यांच्या निधनानंतर पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार घेणार पहिलीच बैठक
भारत बंदला दिल्लीत संमिश्र प्रतिसाद
सर्वसामान्यांना बंदची कल्पनाही नाही
देशभरात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद राजधानी दिल्लीत पाहायला मिळाला आहे. तर अनेकांना याविषयी कल्पनाही नाही. काही बँकही सुरू आहेत.
Gondia News: पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील गोरठा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली आहे... या प्रकरणात विद्यार्थ्याच्या आईच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.... विद्यार्थी धैर्य मनोज मिश्रा (12) याला शिक्षिका शोभा गिरडकर यांनी बेदम मारहाण केली. मारहाण केल्यामुळे धैर्य याच्या पाठीवर व्रण उमटले त्यामुळे त्याने घरी गेल्यानंतर आपल्या पालकांना सांगितले पालकांनी आमगाव पोलीस स्टेशन गाठून संबंधित शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली.... धैर्य हा आपल्या मित्रासोबत शाळेच्या ग्राउंडमध्ये खेळत असताना मित्राला "लॉलीपॉप दे" असे म्हटले असता संबंधित शिक्षिकेने ऐकले व त्यानंतर आपल्या मुलाला हाताबुक्क्यांनी तसेच छडीने बेदम मारहाण केल्याचे विद्यार्थ्याच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे...
घरात कोणीही नसताना खेळताखेळता काच व खिडकीच्या लोखंडी ग्रीलच्या मधोमध दोन लहान भावंडं अडकून पडल्याचा थरारक घटना भंडारा शहरातील शनयानगर परिसरात काल दुपारी घडली. प्रा. रवी हलमारे यांच्या घरी ही घटना घडली. घरातील वडीलधारे शेजारी गेले असता ७ वर्षाची रियांशी व ४ वर्षांचा श्रीयांश हे दोघे घरातील मुख्य दार आतून लावून खेळतं होते. यावेळी ही दोन्ही भावंडं खेळताखेळता खिडकीवर चढलेत आणि त्यांच्या हातानं अनावधानानं खिडकीचे तावदान बंद झालेत आणि दोन्ही भावंडं खिडकीत अडकलेत. घरातील व्यक्ती जेव्हा घरी परतलेले, तेव्हा दार आतून लावलं होतं आणि मुलं खिडकीत अडकल्याची थरारक घटना समोर आली. यानंतर जेसीबी बोलावून घराच्या पाठीमागे असलेली खिडकी तोडून एका तरुणानं आत प्रवेश करीत दोन्ही बालकांची सुखरूप सुटका केली. तब्बल तासाभरानंतर दोन्ही भावंडांची सुखरुप सुटका झाल्यानंतर आई-वडिलांसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
15 फेब्रुवारीपासून ‘एचएसआरपी’ नसलेल्या वाहनांवर कारवाई
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही प्रतिसाद कमी मिळाल्याने परिवहन विभागाने १५ फेब्रुवारीपासून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील सुमारे २५ लाख वाहनांपैकी १०.७० लाखांनी नोंदणी केली असून ८.६२ लाख वाहनांना प्लेट बसविण्यात आली आहे.
अद्याप १५ लाख वाहने प्रलंबित आहेत. मुदतीनंतर अपॉइंटमेंट घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असून तपासणीदरम्यान विमा, पीयूसी व परवान्याचीही पडताळणी केली जाणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमान स्थिर असून कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे त्यामुळे सकाळी आणि रात्री काहीसा गारवा असला तरी दुपारी उन्हाचा कडाका जाणवत आहे पुढील दोन दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
महाबोधी महाविहार बौद्धांना देण्याची मागणी; जंतर-मंतरवर आजपासून उपोषण
बोधगया येथील जगप्रसिद्ध महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनाबाबत देशाची राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू होणार आहे.
देश-विदेशातून आलेले बौद्ध भिक्खू आणि अनुयायी आज १२ फेब्रुवारीपासून जंतर-मंतरवर उपोषणाला बसणार आहेत.
त्यांची मागणी आहे की, बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कंट्रोल अॅक्ट १९४९ तात्काळ रद्द करण्यात यावा आणि महाविहाराचे पूर्ण प्रशासकीय नियंत्रण बौद्ध समुदायाला देण्यात यावे
बौद्ध संघटनांच्या म्हणण्यानुसार, यूनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या या पवित्र स्थळाचे व्यवस्थापन सध्याच्या कायद्यानुसार धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याक हक्कांच्या विरोधात आहे. आंदोलकांनी इशारा दिला आहे की, मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.

Beed News : बीडमध्ये ड्रोन द्वारे निदर्शनास आलेल्या बारावीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 17 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बारावीच्या पहिल्या इंग्रजीच्या पेपरला मोठ्या प्रमाणात पालकांकडून तसेच नातेवाईकांकडून विद्यार्थ्यांना कॉपीचा पुरवठा केला जात होता. हाच प्रकार ड्रोन कॅमेरा मध्ये कैद झाला. या सर्व प्रकाराची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून नेकनूर पोलीस ठाण्यात 17 जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड तालुक्यातील चौसाळा केंद्रावर हा सर्व कॉपीचा प्रकार समोर आला होता. जिल्ह्यातील 103 परीक्षा केंद्रावर प्रशासनाची सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरा द्वारे नजर आहे. यापुढे देखील कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
रेल्वे अधिकाऱ्याची बनावट सही करून व्हीआयपी कोट्यात तिकीट; एजंटविरोधात गुन्हा दाखल
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट सही करून एसी व्हीआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म केल्याप्रकरणी जीआरपीने एका एजंटविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, मुंबई सेंट्रल–राजकोट ‘सौराष्ट्र मेल’साठी एसी व्हीआयपी कोट्यातून तिकीट निश्चित करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या पत्रावर अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) यांची सही असल्याचे दर्शविण्यात आले होते. मात्र, वेस्टर्न रेल्वेच्या व्यावसायिक विभागातील अधिकाऱ्याला संशय आल्याने त्यांनी ADRM यांच्याकडे चौकशी केली असता ती सही बनावट असल्याचे उघड झाले.
यानंतर तिकीट तपासनीसांना सतर्क करण्यात आले. सौराष्ट्र मेलमध्ये प्रवास करणाऱ्या अमित या प्रवाशाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, राजेश नावाच्या एजंटने त्याचे तिकीट कन्फर्म करून दिल्याची माहिती समोर आली. अमित याला बोरीवली येथे उतरविण्यात आले.
या प्रकरणी संबंधित एजंटविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दर्यापूरच्या तामसवाडी फाट्यावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या वतीने शिवछत्रपती शंकरपटाचे आयोजन करण्यात आले... 9, 10 आणि 11 फेब्रुवारी पर्यंत या शंकरपटात अवघ्या 7 सेकंदात मध्यप्रदेशच्या बैतुल येथील महिला शेतकरी आण्विका राठोड यांच्या देवा आणि कॅप्टन या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावलं.. यावेळी मध्यप्रदेश सह संपूर्ण महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येने बैलजोडी दाखल झाल्या होत्या.. शंकरपट पाहण्यासाठी सुद्धा मोठया चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली....
भूम परंडा वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य पुण्यात एकत्र
तानाजी सावंत यांच्या जे एस पी एम संस्थेच्या पुण्यातील कार्यालयात स्वागत समारंभ
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी पर्यंत सर्व उमेदवार एकत्र सहलीवर पाठवणार असल्याची माहिती
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून चुरस वाढली, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
यापूर्वीच भाजपने आपले उमेदवार एकत्र करत सुरक्षित स्थळी हलवले
बीड - बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे
या घटनेत विजय माला सदाशिव कोकाट ही महिला जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत
मागील काही दिवसांपासून बीड शहरातील एमआयडीसी भागात राहणाऱ्या या दोघा कुटुंबात शुल्लक कारणावरून वाद सुरू आहे
याचेच रूपांतर हाणामारी मध्ये घडले त्यातून हे दोन्ही गट आपापसात भिडले आहे
याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही
रेल्वे अधिकाऱ्याची बनावट सही करून व्हीआयपी कोट्यात तिकीट; एजंटविरोधात गुन्हा दाखल
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट सही करून एसी व्हीआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म केल्याप्रकरणी जीआरपीने एका एजंटविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, मुंबई सेंट्रल–राजकोट ‘सौराष्ट्र मेल’साठी एसी व्हीआयपी कोट्यातून तिकीट निश्चित करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या पत्रावर अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) यांची सही असल्याचे दर्शविण्यात आले होते. मात्र, वेस्टर्न रेल्वेच्या व्यावसायिक विभागातील अधिकाऱ्याला संशय आल्याने त्यांनी ADRM यांच्याकडे चौकशी केली असता ती सही बनावट असल्याचे उघड झाले.
यानंतर तिकीट तपासनीसांना सतर्क करण्यात आले. सौराष्ट्र मेलमध्ये प्रवास करणाऱ्या अमित या प्रवाशाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, राजेश नावाच्या एजंटने त्याचे तिकीट कन्फर्म करून दिल्याची माहिती समोर आली. अमित याला बोरीवली येथे उतरविण्यात आले.
या प्रकरणी संबंधित एजंटविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
परभणी महापौर उपमहापौर निवडणूक अपडेट
सहलीवर गेलेले काँग्रेसचे १० नगरसेवक परभणीत दाखल
उबाठां सेनेचे २५ नगरसेवक येणार रात्री उशीरा
त्यामुळे रात्री उशिरा होणारी बैठक सकाळी पार पडणार
काँग्रेस आणि शिवसेनेची संयुक्त बैठक सकाळी ८ वाजता होणार
आमदार राहुल पाटील हे सर्व नगरसेवक घेवून रात्री उशिरा परभणीत दाखल होणार
उशीर होत असल्याने रात्रीची बैठक सकाळी होणार
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Blog Updates: संजय राऊत यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट; दोन नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा