Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: विधानसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा संपवून मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. अर्थसंकल्पावरती चर्चा करताना विरोधकांनी मोठ्या प्रमाणावरती आरोप केलेले आहेत. या सर्व आरोपांना मुख्यमंत्री आज उत्तर देणार आहेत....More
रायगड मधील माणगांव पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा
शिंदे शिवसेनेचे विलास शिंदे सभापती तर राष्ट्रवादीच्या मानिषा मालोरे यांची उपसभापती निवड
माणगाव मधून सभापती आणि उपसभापती ची निवडणूक बिनविरोध
शिवसेना राष्ट्रवादी वादावर वरिष्ठांनी काढला तोडगा....अखेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत स्थापन केली सत्ता
अमेरिका–इस्रायल–इराण युद्धाच्या तणावाचे पडसाद आता थेट शेतकऱ्यांवर उमटताना दिसत आहेत. अमेरिका इराण संघर्षामुळे निर्यात मार्गांवर परिणाम झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतमाल देशांतर्गत बाजारात येत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाज्या, फळे आणि इतर शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर कोसळले असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत. तरी विक्री होत नसल्याने व्यापाऱ्यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच हॉटेल व्यवसायात कमर्शियल गॅसचा तुटवडा असल्याने हॉटेलमध्ये होणारी भाजीपाला विक्रीही कमी झाली आहे.आता या परिस्थिती मूळ शेतकरी व व्यापारी हवालदिल झाले आहेत व हे युद्ध कधी थांबणार याच्या कडे सर्व डोळे लावून बसले आहेत
नाशिकमधील बहुचर्चित लोंढे टोळीच्या गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली होती ही कारवाई राज्यभर चर्चेत आली होती. नाशिक पोलिसांची नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मोहीम राज्यात गाजली होती याशिवाय नाशिक मधल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामावर देखील बुलडोझर चालवण्यात आला होता आणि त्याच्या कार्यालयात एक भुयार देखील आढळून आलं होतं या भुयाराचा वापर तो गुन्हेगारी कारवायांसाठी करत असल्याच पोलीस तपासात समोर आले होते. नाशिकच्या सातपूर परिसरात एका बारमध्ये गोळीबार करण्यात आला आणि या प्रकरणानंतर सर्व लोंढे टोळीचे गुन्हे उघडकीस आले होते मात्र या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली असून बार चालकासह एकाने सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं पोलीस तपासात आढळून आला आहे. दोघांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. संपूर्ण लोंढे टोळी हे मुक्कांतर्गत न्यायालयीन कोठडीत आहे मात्र बाहेर पुरावे नष्ट करण्याचं काम नेमकं कोण करत आहे? याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.
नाशिकमधील बहुचर्चित लोंढे टोळीच्या गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली होती ही कारवाई राज्यभर चर्चेत आली होती. नाशिक पोलिसांची नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मोहीम राज्यात गाजली होती याशिवाय नाशिक मधल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामावर देखील बुलडोझर चालवण्यात आला होता आणि त्याच्या कार्यालयात एक भुयार देखील आढळून आलं होतं या भुयाराचा वापर तो गुन्हेगारी कारवायांसाठी करत असल्याच पोलीस तपासात समोर आले होते. नाशिकच्या सातपूर परिसरात एका बारमध्ये गोळीबार करण्यात आला आणि या प्रकरणानंतर सर्व लोंढे टोळीचे गुन्हे उघडकीस आले होते मात्र या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली असून बार चालकासह एकाने सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं पोलीस तपासात आढळून आला आहे. दोघांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. संपूर्ण लोंढे टोळी हे मुक्कांतर्गत न्यायालयीन कोठडीत आहे मात्र बाहेर पुरावे नष्ट करण्याचं काम नेमकं कोण करत आहे? याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.
साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई, यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना अॅक्शन मोडवर
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पर्श्वभूमीवर घरगुती सिलिंडरधारकांना तुटवडा निर्माण होऊ नये म्हणुन कमर्शियल व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केला आहे. जिल्ह्यात गॅस साठी उपलब्ध
काळाबाजार करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 16 पथकाची निर्मीती करण्यात आली. अशा परिस्थितीत जिल्ह्यात कोणी काळाबाजार करतांना आढळल्यास कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मीना यांनी तहसीलदार यांना निर्देश दिले आहे
राज ठाकरे यांचे मनसेच्या सर्व संघटनांच्या प्रमुखांना आदेश; संघटनेतील सर्व सदस्यांची प्राथमिक सदस्य नोंदणी करून घ्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची बैठक आज शिवतीर्थावर पार पडली
या बैठकीत मनसेच्या वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधींना शिवतीर्थावर बोलविण्यात आले होते.
या मध्ये मनसे कामगार सेना, मनसे, चित्रपट सेना, मनसे पर्यावरण सेना अश्या १८ संघटनांचा समावेश होता
मनसेच्या संघटनांच्या प्रमुखांना स्दस्य नोंदणी करण्याचा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या बैठकीत दिले आहेत
एकिकडे रायगडला पक्षाचा सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आता मनसेच्या अंतर्गत वेगवेगळ्या संघटनांनी आपली सदस्य नोंदणी करावी असे आदेश आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत
गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अत्यंयात्रा काढत काँग्रेसकडून निषेध आंदोलन
सोलापूरातील काँग्रेस भवन कार्यालयापासून जिल्हापरिषद कार्यालयापर्यंत हे तिरडी आंदोलन केलं जाणार आहे
काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन केलं जातंय
इजराइल आणि इराण या देशांत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता हॉटेल व्यवसायावर पडत असल्याचे दिसून येत आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा झाला नाही तर हॉटेल व्यवसाय बंद पडेल अशी चिंता गोंदियाच्या हॉटेल व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे... तसेच शासनाच्या वतीने यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे अशी मागणी देखील गोंदियाच्या हॉटेल व्यवसायिकांनी केली आहे.
शुल्लक कारणावरून भर रस्त्यात तरुणाची हत्या
सिगरेट देण्यास नकार दिल्याने २८ वर्षीय तरुणावर भर रस्त्यात चाकूने सपासप वार
वाहिद शेख नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू
मानखुर्दच्या मंडळा परिसरातील धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित
मानखुर्द पोलिसांनी केली सरफुद्दीन खान नावाच्या तरुणाला अटक
आदल्या दिवशी आरोपीने वाहिद शेख कडून सिगरेटची मागणी केली होती मात्र वाहिदने नकार दिला असता आरोपीने त्याला मारहाण केली होती तसेच बघून घेण्याच्या धमकी दिली होती
घरगुती गॅससाठी नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन करून देखील कोल्हापुरात दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस सिलेंडर मिळावा म्हणून नागरिकांनी रांगा लावल्या आहेत... कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही अफवांवर विश्वास ठेवून गॅस सिलेंडर साठी गर्दी करू नये... शिवाय जिल्ह्यात कुणीही अतिरिक्त साठा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.... केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार केवळ हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांना व्यावसायिक गॅस देण्यात येत आहे.... हॉटेल्स आणि इतरांसाठी व्यवसायिक गॅस सिलेंडर देणे बंद केला आहे...मात्र कुणीही अतिरिक्त बेकायदेशीर रित्या साठा करू नये अशा सूचना जिल्हाधिकार्यानी दिल्या आहेत...
सोलापुरात घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांच्या रांगा
सोलापुरातील रामवाडी परिसरातील गॅस घेण्यासाठी लोकांची भली मोठी रांग
इराण-इस्त्राईल युद्धच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवाड्याची भीती लोकांच्या मनात आहे
पुढे गॅस मिळेल की नाही या भीतीने ग्राहक ‘पॅनिक बुकिंग‘ करतायत
अचानक वाढलेल्या बुकिंगमुळे गॅस कंपनीच्या ओनलाईन बुकिंग पद्धतीत तांत्रिक बिघाड
त्यामुळे नागरिक स्वतःच गॅस घेऊन एजन्सीमध्ये येतायत
खर्चाचा बोजा जड; विलेपार्लेतील पालिकेची IB शाळा CBSEकडे वळणार ?
मुंबई महानगरपालिकेने विलेपार्ले येथील आयबी (IB) बोर्डाशी संलग्न शाळेचे सीबीएसई (CBSE) बोर्डात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी पालकांकडून संमतीपत्रे घेतली जात आहेत. आयबी शाळा चालवण्यासाठी मोठा खर्च आणि प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता असल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जात आहे.
मात्र, ‘आयबी बोर्ड पाहूनच मुलांना प्रवेश दिला होता. आता अचानक मंडळ बदलणे म्हणजे पालकांची फसवणूक आहे,’ असा आक्षेप काही पालकांनी घेतला आहे. या निर्णयाविरोधात ग्लोबल पेरेंट्स टीचर्स असोसिएशननेही महापालिका प्रशासनाकडे शाळा बंद न करण्याची मागणी केली आहे.
सध्या या शाळेत सुमारे १५६ विद्यार्थी शिक्षण घेत असून, पालकांच्या संमतीनंतर शाळा सीबीएसई बोर्डाशी संलग्न करण्याचा निर्णय अंतिम होण्याची शक्यता आहे.
चार वर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना काल जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे
एरंडोल शहरातील लांडा पुरा भागात राहत असलेल्या बालिकेच्या शेजारी राहणाऱ्या नातलगानेच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे
मुलीवर अत्याचार झाल्या घटनेची माहिती मिळताच,मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिल्याच्या नंतर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे
या घटनेतील संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे
संशयिताला कठोर शासन व्हावे या मागणी साठी नागरिकांनी काही वेळ साठी रस्ता रोको आंदोलन केले होते
- अमेरिका इस्राईल इराण युद्धाचा इंधनावर मोठा परिणाम...
- नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा...
- अनेक पंपावर LPG दर वाढल्याचा सूचना..
- LPG तुटवड्यामुळे पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा
- LPG गॅस 79 रुपये प्रति लिटर
- मात्र LPG गॅस चा तुटवडा असल्याने रात्रीपासूनच पंपावर रिक्षांची गर्दी
गॅस पंपावर लागले दर वाढीचे फलक
* युद्धजन्य परिस्थितीमुळे ग्राहकांनी समजून घेण्याचे LPG चालकांकडून फलकांवर आवाहन
नाशिक च्या म्हाडा सदनिका घोटाळा प्रकरणी आज विधान परिषदेत चर्चा होण्याची शक्यता
मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे बोलावली बैठक
नाशिकचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावले बैठकीसाठी
गृह प्रकल्पाचे क्षेत्र कमी दाखबून म्हाडा ची फसवणूक करत गरीबांची घरं हडप केल्याच्या 49 प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात करण्यात आलाय गुन्हा दाखल
4 हजार चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या जागेवर गृह प्रकल्प उभा राहिल्यास 20 टक्के सदनिका आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव ठेवणे बंधनकारक
मात्र गृह प्रकल्पाचे क्षेत्र कमी दाखबून शासनाची फसवणूक झाल्याचे उघड
भुमी अभिलेख विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू जवळपास 195 जणांवर गुन्हा दाखल
यात बांधकाम व्यावसायिक, जागा मालकाचा समावेश जागा मालकात काही आजी माजी लोकप्रतिनिधी चा सहभाग
वेगवेगळ्या प्रकरणात 200 हुन अधिक एकर जागेचा घोटाळा झाला असल्याचा संशय
याप्रकरणी पुढील तपास सुरू
विधी मंडळात चर्चा होणार असल्यानं प्रशासकीय पातळीवर कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी धावपळ
शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. बाहेर पडणारे नागरिक स्कार्फ, टोपी, गॉगल आणि रुमालाचा वापर करून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सकाळ पासूनच उन्हाचा चटका जाणवू लागतो. दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता अधिक वाढत असल्याने वाहनचालक, कामगार, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक ठिकाणी नागरिक डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी घालून तसेच चेहरा झाकून बाहेर पडताना दिसत आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने थंड पेयांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक ताक, लिंबूपाणी, फळांचे रस तसेच थंड पेयांचा आधार घेत असल्याचे चित्र शहरातील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.
शोरमा स्टॉल इमारती जवळ लावण्यावरून परळ मध्ये वाद...
अक्षिका मसुरकर यांचा परळ इथल्या लोढा प्रीमो इमारती जवळ शोरमाचा स्टॉल
या इमारतीमध्ये राहणाऱ्या २० ते २२ अमराठी लोकांनी एकत्र येऊन शोरमा स्टॉल चालवणाऱ्या अक्षिता मसूरकर यांना स्टॉल हटवण्यास सांगितले असल्याची माहिती
मराठी व्यावसायिकाला दमदाटी करून गुजराती रहिवासी एकत्र येत हाकलत असल्याचा आता आरोप होत आहे
अक्षिका मसुरकर यांची याप्रकरणी आता मनसे कडे धाव
मनसे नेते अमित ठाकरेंची आज दुपारी 3 वाजता अक्षिका मसूरकर शिवतीर्थ इथे घेणार भेट
युद्धामुळं लग्न सराई संकटात! 450 केटरर्सकडे गॅसचा तुटवडा, 10 हजार लग्न पुढं ढकलण्याची वेळ?
पिंपरी चिंचवड शहरातील पुढील दोन महिन्यांत तब्बल दहा हजार लग्न सोहळे होणार आहेत. मात्र हे लग्न सोहळे पुढं ढकलण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जातीये. आनंदाच्या क्षणी हे संकट उभं ठाकल्यानं लग्न कुटुंबातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पाहायला मिळतंय. युद्धामुळं गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, परिणामी शहरातील साडे चारशे केटरर्स या लग्नातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करतायेत, केटरर्सकडून तसा निरोप वर आणि वधूच्या कुटुंबियांना देण्यास सुरुवात ही झालीये. त्यामुळं लग्न सोहळे पुढं ढकलायचे का? असा विचार करण्याची वेळ शेकडो कुटुंबियांवर येऊन ठेपली आहे. त्यातून ही अधिकचे पैसे मोजून गॅसची जुळवाजुळव केल्यास, केटरर्स प्रती थाळीमागे 10 ते 20 टक्के दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं लग्न सोहळ्यात उत्तम मेजवानी हवी असल्यास खिश्याला चाप ही बसू शकतो. मात्र काहीही केलं असता गॅस उपलब्ध झालाच नाही तर मात्र केटरर्सना मोठा फटका बसणार आहे. सोबतचं त्यांच्याकडील 45 हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ही निर्माण होणार आहे. आनंदाच्या क्षणी ज्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट निर्माण झालंय
युद्धामुळं लग्न सराई संकटात! 450 केटरर्सकडे गॅसचा तुटवडा, 10 हजार लग्न पुढं ढकलण्याची वेळ?
पिंपरी चिंचवड शहरातील पुढील दोन महिन्यांत तब्बल दहा हजार लग्न सोहळे होणार आहेत. मात्र हे लग्न सोहळे पुढं ढकलण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जातीये. आनंदाच्या क्षणी हे संकट उभं ठाकल्यानं लग्न कुटुंबातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पाहायला मिळतंय. युद्धामुळं गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, परिणामी शहरातील साडे चारशे केटरर्स या लग्नातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करतायेत, केटरर्सकडून तसा निरोप वर आणि वधूच्या कुटुंबियांना देण्यास सुरुवात ही झालीये. त्यामुळं लग्न सोहळे पुढं ढकलायचे का? असा विचार करण्याची वेळ शेकडो कुटुंबियांवर येऊन ठेपली आहे. त्यातून ही अधिकचे पैसे मोजून गॅसची जुळवाजुळव केल्यास, केटरर्स प्रती थाळीमागे 10 ते 20 टक्के दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं लग्न सोहळ्यात उत्तम मेजवानी हवी असल्यास खिश्याला चाप ही बसू शकतो. मात्र काहीही केलं असता गॅस उपलब्ध झालाच नाही तर मात्र केटरर्सना मोठा फटका बसणार आहे. सोबतचं त्यांच्याकडील 45 हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ही निर्माण होणार आहे. आनंदाच्या क्षणी ज्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट निर्माण झालंय
युद्धामुळं लग्न सराई संकटात! 450 केटरर्सकडे गॅसचा तुटवडा, 10 हजार लग्न पुढं ढकलण्याची वेळ?
ऍंकर : पिंपरी चिंचवड शहरातील पुढील दोन महिन्यांत तब्बल दहा हजार लग्न सोहळे होणार आहेत. मात्र हे लग्न सोहळे पुढं ढकलण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जातीये. आनंदाच्या क्षणी हे संकट उभं ठाकल्यानं लग्न कुटुंबातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पाहायला मिळतंय. युद्धामुळं गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, परिणामी शहरातील साडे चारशे केटरर्स या लग्नातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करतायेत, केटरर्सकडून तसा निरोप वर आणि वधूच्या कुटुंबियांना देण्यास सुरुवात ही झालीये. त्यामुळं लग्न सोहळे पुढं ढकलायचे का? असा विचार करण्याची वेळ शेकडो कुटुंबियांवर येऊन ठेपली आहे. त्यातून ही अधिकचे पैसे मोजून गॅसची जुळवाजुळव केल्यास, केटरर्स प्रती थाळीमागे 10 ते 20 टक्के दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं लग्न सोहळ्यात उत्तम मेजवानी हवी असल्यास खिश्याला चाप ही बसू शकतो. मात्र काहीही केलं असता गॅस उपलब्ध झालाच नाही तर मात्र केटरर्सना मोठा फटका बसणार आहे. सोबतचं त्यांच्याकडील 45 हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ही निर्माण होणार आहे. आनंदाच्या क्षणी ज्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट निर्माण झालंय
पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधासाठी एसआयटी स्थापन
एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केली एसआयटी
एसआयटीच्या प्रमुख पदी पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले
एसआयटीच्या आठ जणांच्या टीम मध्ये पोलीस उपअधीक्षक यांच्यासह तीन पोलीस निरीक्षक यांचा देखील समावेश
गेल्या दोन महिन्यांपासून पाटगाव चे माजी सरपंच महेश पिळणकर आहेत बेपत्ता
नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कारवाई....
मोटर सायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक....
18 मोटरसायकली जप्त अजूनही गुन्हे उघड होण्याची शक्यता....
आरोपींनी शेजारील मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात केल्या होत्या मोटरसायकलींच्या चोऱ्या....
गुजरात आणि मध्यप्रदेश पोलीस घेणार आरोपींचा ताबा..
जिल्ह्यात होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आडा बसण्याची शक्यता
पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिली माहिती
व्यावसायिक सिलेंडरच्या उपलब्धतेसंदर्भात सरकारकडून अनेक दावे केले जात असले, तरी मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला रोज जेवढ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा पुरवठा आवश्यक आहे, तेवढ्या प्रमाणात व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नाहीये.. त्यामुळे अनेक मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट समोर पुढील तीन - चार दिवसानंतर काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे... दरम्यान नागपूरच्या "फॉर्महाऊस किचन" या रेस्टॉरंट ने सिलेंडरचा तुटवडा झाल्यास रेस्टॉरंट बंद करण्याऐवजी लाकडी चुलीवरचा जेवण तयार करण्याची पर्यायी योजना आखली आहे... त्या अनुषंगाने लाकडांची खरेदी करून साठा करणे ही सुरू केले आहे.... सावजी जेवणासाठी ओळखल्या जाणाऱ्या "फार्महाऊस किचन" रेस्टॉरंट मध्ये सध्या ही 25 टक्के मेनू (चिकन मटण आणि इतर नॉनव्हेज पदार्थ) लाकडी चुलीवर तयार केले जाते... जर येणाऱ्या तीन चार दिवसानंतर व्यावसायिक सिलेंडरचा हवा तितका पुरवठा शक्य झाला नाही, तर आम्ही इतर पदार्थही चुलीवर तयार करू अशी भूमिका रेस्टॉरंट चालकांनी स्वीकारली आहे...
24 तासात जिल्ह्यातून एक विवाहिते सह सहा मुली बेपत्ता.
एक जानेवारी ते 10 मार्च पर्यंत जिल्ह्यातून 200 महिलांसह 289 जण बेपत्ता.
बुलढाणा जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींसह महिला व सज्ञान मुली बेपत्ता होण्याचा प्रमाण लक्षणीय वाढलं असून गेल्या 24 तासात जिल्ह्यातील सहा मुलींसह एक विवाहिता बेपत्ता झाली आहे. तर एक जानेवारी ते 10 मार्च पर्यंत जिल्ह्यातील 289 जण बेपत्ता झाले आहेत त्यात 200 च्या वर महिला आहेत. बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचं प्रमाण वाढलं असल्याने सर्वसामान्य पालकांमध्ये चिंतेच व दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींचे किंवा महिलांचे नंतर काय होतं याबाबत कुठलीही माहिती समोर येत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. याबाबत मात्र पोलीस बोलण्यास तयार नाहीत
धुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. देवगावकर यांना पदाच्या अधिकारांपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत काही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर पुढील निर्णय शासनाकडून घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रशासन आणि आरोग्य सेवांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आखातातील युद्धामुळे देशभरात पॉली प्रोपिलीन प्लास्टिक पॅकिंग बॅगचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. पॉली प्रोपिलीन प्लास्टिक बॉल हे एक पेट्रोकेमिकल बाय प्रॉडक्ट आहेत. या उद्योगाचा कच्चामाल असलेल्या या बॉल्सची निर्मिती पेट्रोकेमिकल कंपन्यांनी थांबवली आहे. केमिकल कंपन्यांना तातडीने एलपीजी निर्मितीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्नरत राहण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा कच्चामाल तयार करण्यापेक्षा एलपीजी निर्मितीकडे सर्वांचा भर आहे. परिणामी देशभरातील पॉलिमर बॅग तयार करणारे उद्योग ठप्प पडण्याची शक्यता आहे. या मुळे राज्य आणि देशातील सिमेंट, साखर आणि अन्नधान्य पॅकिंग करणाऱ्या उद्योगांवर मोठा परिणाम होणार आहे. पॅकेजिंग बॅगच्या तुटवड्याचा पुरवठा साखळीवर परिणाम होणार असून अखेर ग्राहकांना यांची झळ सोसावी लागणार आहे तर उद्योजकांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे संकटातील उद्योजकांनी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने दखल देण्याची मागणी केली आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- राजकारण
- Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम