Maharashtra Live Blog Updates: अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरींचे गंभीर सवाल; सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

मुकेश चव्हाणLast Updated: 01 Feb 2026 04:07 PM

पार्श्वभूमी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी, काल संध्याकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. पक्षनेता म्हणून सुनेत्रा पवारांकडे सर्व संवैधानिक अधिकारही सोपवण्यात आले. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा...More

Ajit Pawar Death: परभणीत सर्वपक्षीय नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली 

परभणी : अजित पवार अकाली निधनानंतर आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परभणीत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित दादांच्या आठवणी सांगताना राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर, परभणीचे शहराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी, कार्यकर्ते हे भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. सर्वच नेत्यांनी अजित दादांबद्दलच्या आठवणी यावेळी सांगितल्या आणि अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.