Maharashtra Beed Politcal Updates: माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) आगामी विधान परिषद निवडणुकीनिमित्त (Maharashtra Legislative Council Elections 2026) ॲक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. रिक्त होणाऱ्या जागांवर क्षीरसागरांची वर्णी लागावी यासाठी थेट अध्यात्मिक आणि राजकीय दोन्ही आघाड्यांवर क्षीरसागरांची मोर्चेबांधणी सुरू आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगते दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. यानंतर आता नाशिकमध्ये महंत सुधीरदास महाराज आणि जयदत्त क्षीरसागर यांची भेट झालीय. ही भेट भाजपामध्ये प्रवेशाचा मार्ग सुलभ व्हावा, यासाठी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतेय.

Continues below advertisement

Jaydutt Kshirsagar : जयदत्त क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाला मंत्री पंकजा मुंडे यांचा तीव्र विरोध

दरम्यान, भाजप बरोबरच जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांशीही संपर्क असल्याची माहिती आहे. मात्र जयदत्त क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाला मंत्री पंकजा मुंडे यांचा जुना आणि तीव्र विरोध असल्याचे दिसून येत आहे. जयदत्त क्षीरसागर यांची विधान परिषदेवर वर्णी लागली तर स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलू शकतात.

Continues below advertisement

Jaydutt Kshirsagar : कोणआहेत जयदत्त क्षीरसागर?

जयदत्त क्षीरसागर यांची ओबीसी नेते म्हणून ओळख आहे. यापूर्वी त्यांनी दोन वेळी कॅबिनेट मंत्रीपद भूषवले आहे. तसेच अखिल भारतीय तैलिक महासंघाचे क्षीरसागर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अशातच जयदत्त क्षीरसागर यांचा भाजपा प्रवेश झाल्यास त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BJP : केंद्रीय नेतृत्वाला भाजपकडून 30 जणांची यादी पाठवली

विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून दिल्लीच्या नेतृत्वाला यादी पाठवल्याचीमाहितीआहे. केंद्रीय नेतृत्वाला भाजपकडून 30 जणांची यादी पाठवली असल्याचीमाहितीआहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यातआल्याचीमाहितीआहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यातआल्याची सूत्रांची माहिती आहे.

विधान परिषदेच्या 9 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 5 जागा येणार (Maharashtra Legislative Council Elections 2026)

तर विधान परिषदेच्या 9 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 5 जागा येणार असून भाजपकडून 5 नावांसाठी 30 जणांची यादी केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यातआलीआहे. यात माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी अशी नावं यादीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

इतर महत्वाच्या बातम्या