एक्स्प्लोर

Maharashtra Govt 100 Days Report Card: ढिसाळ कामगिरी करणारे तीन विभाग; राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या निकालात तळाला कुणाचा विभाग?

Maharashtra Govt 100 Days Report Card: राज्यातील महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Maharashtra Govt 100 Days Report Card: राज्यातील महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल (Maharashtra Govt 100 Days Report Card) जाहीर करण्यात आला आहे. अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांचा महिला आणि बालविकास विभाग 80 टक्के गुणांसह सर्वोत्तम ठरला आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या तर कृषी विभाग तिसऱ्या स्थानी आहे. तर 48 विभागातील तीन विभाग नापास झाले आहेत. सामान्य प्रशासन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि नगर विकास विभागांची ढिसाळ कामगिरी असल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे असलेला सामान्य प्रशासन विभाग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडील नगरविकास विभाग आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असणारा अन्न-नागरी पुरवठा विभागाची ढिसाळ कामगिरी झाली आहे. तिन्ही विभागांना 35 टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहे. सामान्य प्रशासन विभागाला फक्त 24 टक्के, नगरविकास विभागाला 34 टक्के मार्क, तर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला 33 टक्केच गुण मिळाले आहे. 

सरकारच्या 100 दिवसांच्या कामांत बारा विभागांना शंभर टक्के गुण-

सरकारच्या 100 दिवसांच्या कामांत बारा विभागांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. 12 विभागांनी ठरवलेल्या मुद्यांवर शंभर टक्के काम केले. जलसंपदा,गृह,ग्रामविका,पशुसंवर्धन,बंदरे विभागास 100 टक्के गुण मिळाले. उच्च व तंत्रशिक्षण,कामगार,वस्त्रोद्योग विभागालाही पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. सांस्कृतिक,खणीकर्म, दुग्धव्यवसाय,रोहयो विभाग अव्वल ठरले आहेत. 

सरकारच्या 100 दिवासांच्या कामाचा निकाल, पाहा यादी-

अ.क्र. विभागाचे नाव एकूण मुद्दे कार्यवाही पूर्ण % कार्यवाही प्रगतीपथावर
1 जलसंपदा 37 37 100% 0
2 गृह 31 31 100% 0
3 ग्राम विकास 19 19 100% 0
4 पशुसंवर्धन 18 18 100% 0
5 बंदरे 12 12 100% 0
6 उच्च व तंत्र शिक्षण 11 11 100% 0
7 कामगार 9 9 100% 0
8 वस्त्रोद्योग 8 8 100% 0
9 सांस्कृतिक कार्य 6 6 100% 0
10 खनिकर्म 4 4 100% 0
11 दुग्धव्यवसाय 4 4 100% 0
12 रोजगार हमी योजना 2 2 100% 0
13 ऊर्जा 41 40 98% 1
14 उद्योग 33 32 97% 1
15 महसूल 23 22 96% 1
16 परिवहन 35 33 94% 2
17 शालेय शिक्षण 17 16 94% 1
18 अन्न, औषध प्रशासन 12 11 92% 1
19 मदत व पुनर्वसन 10 9 90% 1
20 विमानचालन 19 17 89% 2
21 कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता 18 16 89% 2
22 महिला व बाल विकास 16 14 88% 2
23 कृषी 29 25 86% 4
24 मत्स्य 7 6 86% 1
25 नगर विकास – 1 34 29 85% 5
26 वैद्यकीय शिक्षण आणि औषध 13 11 85% 2
27 माहिती तंत्रज्ञान 23 19 83% 4
28 सहकार 12 10 83% 2
29 राज्य उत्पादन शुल्क 6 5 83% 1
30 सार्वजनिक आरोग्य 20 16 80% 4
31 मराठी भाषा 4 3 75% 1
32 सार्वजनिक बांधकाम 30 22 73% 8
33 पाणी पुरवठा व स्वच्छता 16 11 69% 5
34 पर्यटन 13 9 69% 4
35 गृहनिर्माण 66 45 68% 21
36 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 40 27 68% 13
37 मृद व जलसंधारण 21 14 67% 7
38 क्रीडा व युवक कल्याण 12 8 67% 4
39 आदिवासी विकास 35 22 63% 13
40 पर्यावरण 20 12 60% 8
41 माहिती व जनसंपर्क 11 6 55% 5
42 वन 9 4 44% 5
43 इतर मागास बहुजन कल्याण 9 4 44% 5
44 पणन 7 3 43% 4
45 दिव्यांग कल्याण 11 4 36% 7
46 नगर विकास – 2 29 10 34% 19
47 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 6 2 33% 4
48 सामान्य प्रशासन (सेवा) 34 8 24% 26
  एकूण 902 706 78% 196

सरकारच्या 100 दिवासांच्या कामाचा निकाल, VIDEO:

संबंधित बातमी:

Mahayuti Government: आदिती तटकरेंचा विभाग अव्वल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी नंबर 1, उल्हासनगरचे आयुक्त पहिल्या क्रमांकावर, सरकारचा 100 दिवसांचा निकाल जाहीर!

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...

व्हिडीओ

MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Embed widget