एक्स्प्लोर

मोठी बातमी ! महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचा बिगुल; निवडणूक आयोगाने बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती व 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत.

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही (Election commision) मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक (Election) पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन हजर राहायचे याबाबतही सांगण्यात आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 हाच या बैठकीचा विषय असून 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. 

राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती व 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीच्या (महानगरपालिका वगळून) पूर्वतयारीचा विभागनिहाय आढावा मा. राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. या बैठकीमध्ये खालील विषयांचा आढावा घेण्यात येईल, असे परिपत्रकच राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे. 

1. निवडणुका घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था
2. मतदार संख्या
3. मतदान केंद्र
4. ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM)
5. आवश्यक मनुष्यबळ
6. वेळेवर उपस्थित होणारे मुद्दे

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सोबतच्या परिपत्रामध्ये माहिती तयार करून ती आयोगास PDF Format मध्ये ई-मेलद्वारे 9 जुलै 2025 रोजी किंवा तत्पूर्वी सादर करण्यात यावी. तसेच उक्त नमूद सर्व मुद्यांसंदर्भातील माहितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीस आपण व्यक्तिशः उपस्थित राहावे, ही विनंती. सदर व्हिडिओ कॉन्फरन्सची लिंक यथावकाश उपलब्ध करून देण्यात येईल,असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना  लिहिले आहे. तसेच, उपरोक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीस आपण उपस्थित राहावे, असेही सांगण्यात आले आहे. 

बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) :-

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (EVM) घ्यावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता सद्यस्थितीत आपल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले कंट्रोल युनिट (CU), बॅलेट युनिट (BU) व मेमरी (DMM) याबाबतची अद्ययावत माहिती देण्यात यावी. तसेच एका कंट्रोल युनिटवर (CU) दोन पेक्षा अधिक बॅलेट युनिट (BU) जोडणे शक्य असल्याचे विचारात घेऊन आवश्यक CU, BU व DMM ची संख्या निश्चित करण्यात यावी.

EVM (FLC) प्राथमिक स्तर तपासणी करून घेण्याचा कार्यक्रम निश्चित करावा.

EVM सुरक्षित ठेवण्यासाठी सद्याची व्यवस्था, त्याचा गोडावूननिहाय तपशील. तसेच नवीन EVM खरेदी करण्याचे प्रस्तावित असल्याने, त्याकरिता आवश्यक असलेली जागा निश्चित करण्यात यावी. 

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात उपलब्ध मास्टर ट्रेनर्स व अतिरिक्त लागणारे मास्टर ट्रेनर्स.

मनुष्यबळ -

आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे किंवा कसे? याबाबत खात्री करावी. अधिकचे मनुष्यबळ अपुरे पडत असल्यास, संबंधित विभागातील विभागीय आयुक्त यांच्याकडे त्याकरिता मागणी सादर करावी.

हेही वाचा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast Alert: दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्र हाय अलर्टवर, मुंबई-पुणे-नागपुरात सुरक्षा वाढवली
Pune High Alert: Delhi तील स्फोटानंतर Pune हाय अलर्टवर, रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त
Nagpur Alert: दिल्ली स्फोटानंतर Nagpur हाय अलर्टवर, संघ मुख्यालयाला तिहेरी सुरक्षा
Mumbai Alert:Delhi तील स्फोटानंतर Mumbai हाय अलर्टवर,Devendra Fadnavis यांनी घेतला सुरक्षेचा आढावा
Delhi Blast: फरीदाबादमध्ये 350 किलो स्फोटकांसह डॉक्टरांना अटक, दिल्ली स्फोटाशी कनेक्शन?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
Embed widget