Prasenjit Fadnavis: राज्यातीलराजकारणआणि निवडणुकीतीलघराणेशाहीच्यामुद्दयांवरूनअनेकदाखडाजंगीझाल्याचेचित्रबघायलामिळालंआहे. नेत्यांच्या मुलांना आणि नातेवाइकांना दिलीजाणारी उमेदवारीवरूनराजकारणतापल्याचंदेखीलबघायलामिळलंय. अशातचगेल्या निवडणुकीत घराणेशाहीकटाक्षानं नाकारणाऱ्या भाजपचेनेतेआणिराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचंमुद्दयावरूनसध्याचर्चेतआलेआहे. त्यालाकारणठरलंआहेते बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालक पद. मुख्यमंत्र्याचे चुलत बंधू प्रसेनजित फडणवीस (Prasenjit Fadnavis) हे सोमवारी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालकांच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. परिणामीत्यांची बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालकपदी वर्णी लागलीआहे. दशकानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालकपदी मराठी माणसालाहेपदमिळाल्याचीमाहितीआहे. मात्र प्रसेनजित फडणवीस यांच्याकडे आधीच अनेक पदे असताना नव्या जबाबदारीमुळे अनेक चर्चेला उधाण आलंअसून संचालकपदी निवडून आल्याने फडणवीसबंधूंवर घराणेशाहीचा आरोप होऊ लागला आहे.
Bank of Maharashtra : दशकानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालकपदी मराठी माणसाची वर्णी
मिळलेल्यामाहितीनुकसार, बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालकपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजित फडणवीस यांची नियुक्ती करण्यातआलीआहे. बँकेच्या समभागधारक संचालक (शेअरहोल्डर्स डायरेक्टर) पदासाठी नुकतीच निवडणूक झाली. यात रीना झा त्रिपाठी, अलोक जैन, रूमा डे आणि प्रसेनजित फडणवीस हे चार उमेदवार रिंगणात होते. अशातच प्रसेनजित फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी बॅंक कर्मचारी संघटनांनी देखील मोठा जोर लावला होता. प्रसेनजित यांचे वडील बाळासाहेब देखील बँक ऑफ महाराष्ट्रमधील अधिकाऱ्यांच्या संघटनेमध्ये अनेक वर्षे पदाधिकारी होते. सोबतच भारतीय मजदूर संघासोबत देखीलते कार्यरत होते. मागील अनेक वर्षात महाराष्ट्र नाव असलेल्या बँकच्या संचालक मंडळातून मराठी माणूस नाहीसा केला जात असल्याची बँक कर्मचारी संघटनांमध्ये चर्चा होती.
Prasenjit Fadnavis : बँकेला मराठी माणूस संचालक मंडळावर मिळत नसल्याने मोठी नाराजी
तर देशातील सर्वच प्रमुख बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे. मात्र बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्यालय हे पुणे शहरात आहे. तरीही, बँकेला मराठी माणूस संचालक मंडळावर मिळत नसल्याने मोठी नाराजी व्यक्तकेल्याजातहोती. याआधी, बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळात एमडी आणि सीईओ राहिलेले रविंद्र मराठे होते, मात्र, डीएसके प्रकरणानंतर त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं. अशातच प्रसेनजित फडणवीस हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य तर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही कार्यरत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
