एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar: अबू आझमींचं निलंबन, सुधीर मुनगंटीवारांनी 'छावा'मधला शेर ऐकवला, आख्खं सभागृह चेतवलं! 

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेबाबद्दल (Aurangzeb) केलेलं वक्तव्य त्यांना चांगलेच भोवलं असून अबू आझमींवर सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे.

मुंबई: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेबाबद्दल (Aurangzeb) केलेलं वक्तव्य त्यांना चांगलेच भोवलं असून अबू आझमींवर सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव आज सभागृहात मांडला असून यावर बहुमताने अधिवेशन काळात अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहाने स्वीकारला आहे. त्यामुळे अबू आझमींनी औरंगजेबाचे केलेलं उदात्तीकरण चांगलेच भोवलं आहे. 

दुसरीकडे, याच मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या विषयावर भाष्य करून छावा सिनेमातील शेर ऐकवत  आख्खं सभागृह चेतवल्याचे बघायला मिळले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी सभागृहात महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) आणि  अबू आझमींच्या वक्तव्यावरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यावर उत्तर देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे.

नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

चंद्रकांतदादा पाटील यांनी सादर केलेल्या अबू आजमींच्या निलंबनाच्या प्रस्तावात अजून काही बाबींचा समावेश करण्याची आवश्यकता आहे. विधान परिषदेच्या या प्रस्तावात अबू आजमींचे निलंबन हे केवळ या अधिवेशनापुरतेच का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. विधान परिषदेमध्ये एका सदस्याने भर सभेत जाहीर देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल भाष्य केलं. तेव्हा तुम्ही काय शिक्षा केली? त्यावेळी आमदारांची समिती गठित करण्यात आली, तोपर्यंत त्याचे सदस्यत्व रद्द केलं. सोबतच त्याचा पगार रद्द केला. रेल्वे कुपन बंद केलं. आमदार निधीही बंद केला. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देवापेक्षा जास्त मानतो. नथुराम गोडसे बद्दल एकाने वक्तव्य केलं तर त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा हा अप्रत्यक्षपणे अपमान नाही आहे का? असेही ते म्हणाले. 

..पर जंजीर मे जकडा शंभू राजा मेरा अब भी सब पे भारी हैं

औरंगजेब बदमाश लुच्छा, लफंगा आणि छत्रपती संभाजी महाराज छावा आमच्यासाठी अभिमान, स्वाभिमान आणि गर्व आहे. औरंगजेबाने स्वतः आपल्या बापाला कैद करून त्याला पाणी देखील पाजले नाही. गर्मीच्या दिवसांमध्ये जेव्हा त्याने पाणी मागितलं तेव्हा औरंग्याने बापाला जिवंत राहायचं असेल तर राहा, अथवा मर असं सांगितलं. यावर शहाजानंनी कवितेतून प्रत्युत्तर देताना म्हटलं की, तुझ्यापेक्षा इथले  भारतीय बरे तू जिवंतपणी आपल्या बापाला पाणी देत नाही. पण हा देश आणि इथले लोक पितृपक्षात आपल्या मेलेल्या पूर्वजांचीही पूजा अर्चना करून पाणी पाजतात. त्यात तु कसा पुत्र आहे जो जिवंत बापालाही पाणी देत नाहीस. सध्या देशभरात छावा सिनेमा सुरू आहे. त्या छावा सिनेमातील एक कवी कलशांचा संवाद आहे, त्यात ते म्हणतात 'हाती-घोडे, तोफ,तलवारे फौंज तेरी सारी हैं, पर जंजीर मे जकडा शंभूराजा मेरा अब भी सब पे भारी हैं. अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात भाष्य केलंय.        

हे ही वाचा 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi MahanagarPalika Mayor Election 2026: भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
Nagpur News : नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
Shoaib Akhtar On Ind vs Pak: 2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
Nagpur Crime : खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी

व्हिडीओ

Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi MahanagarPalika Mayor Election 2026: भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
Nagpur News : नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
Shoaib Akhtar On Ind vs Pak: 2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
Nagpur Crime : खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Maharashtra live blog updates: भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला, नगरसेविकेचा पती व भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
Maharashtra LIVE: भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला, नगरसेविकेचा पती व भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
Embed widget