Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर... भारत विश्वविजेता! टीम इंडिच्या वाघांची ऐतिहासिक गर्जना, न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा 'चॅम्पियन'Team India Champions T20 World...More
पुणे महापालिकेचे तब्बल १३ हजार कोटींचे अंदाजपत्रक
पुणे महापालिका आयुक्त यांनी आज सादर केले १३ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक
महापालिकेचे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 13 हजार 995 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर
पुणे शहरातील वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद
पुणे महापालिकेत पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक २०७७ कोटी रुपयांची तरतूद
मलनिस्सारण प्रकल्पाला १२१६ कोटी, घनकचरा व्यवस्थापन साठी १३९० कोटी तर पथ विभागाला १८६६ कोटी रुपयांची तरतूद
प्राथमिक शिक्षण विभागासाठी तब्बल ९७९ कोटी रुपयांची तरतूद
भवन रचना विभासाठी ६५० कोटी, विद्युत विभाल २६५ कोटी रुपयांची तरतूद, समाज विकासाला १४३.५० कोटी रुपये, उद्यान विभागाला २०५ कोटी, आरोग्य विभागासाठी ८८ कोटी, नगर रचना नियोजनासाठी ६४.५० कोटी रुपये, पर्यावरण विभागाला ५१.५९ कोटी रुपये
माहिती व तंत्रज्ञान विभागाला ५६.७३ कोटी रुपये, हेरिटेज सेल साठी २८.५० कोटी
पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाला १७१.३१ कोटी रुपयांची तरतूद