Maharashtra Breaking News: माणिकराव कोकाटेंची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी

Maharashtra Breaking News: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....

मुकेश चव्हाणLast Updated: 01 Aug 2025 03:38 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: विधिमंडळात रमी खेळल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलीय आहे. माणिकराव कोकाटेंकडून कृषिखात्याचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांना भरणेंकडे असलेल्या क्रीडा, युवा...More

महिला शेत मजुरांचं वाहन झाडावर अडळलं; 21 महिला मजूर जखमी

भात पिकाची लागवड कामासाठी घेवून जाणाऱ्या महिला मजुरांचं भरधाव वाहन झाडावर आदळलं. या भीषण अपघातात वाहनात बसलेल्या २१ महिला मजूर जखमी झाल्यात. ही घटना भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील मासलमेटा गावाजवळ घडली. सर्व जखमींवर लाखणी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.