एक्स्प्लोर

Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल

Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.

Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडलं त्याचा निकाल काल हाती लागला. या निकालात सत्ताधारी महायुतीनं पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं. सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला. 12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजप, तीन जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना आणि पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली. तर नगरपालिका आणि नगरपंचायत त्यापाठोपाठ महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकालात विजयाची हॅटट्रिक साधत भाजपच नंबर वनचा पक्ष ठरला आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही भाजपनं पकड मिळवली असून विरोधकांच्या महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीत सपशेल पराभव स्वीकारावा लागला. (Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026)

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट दुसऱ्या स्थानी राहिला आहे. यापूर्वी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीतही विक्रमी जागा जिंकत भाजपने यशाचे शिखर गाठले होते. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. जिल्हा परिषदेत 731 जागांपैकी भाजपचे सर्वाधिक 233 सदस्य निवडून आले आहेत. त्याखालोखाल अजित पवार गट 167 आणि शिंदेसेना 162 जागा जिंकल्या आहेत. महायुतीने 731 पैकी तब्बल 562 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस 56, शरद पवार गट 26 आणि उद्धवसेना 43 अशा महाविकास आघाडीने अवघ्या 125 जागा जिंकल्या आहेत. (Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026)

12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता? (12 Zilla Parishad Result 2026)

रायगड जिल्हा परिषदेचा निकाल- (Raigad ZP Election Result 2026)

एकूण जागा 59

शिवसेना =21
राष्ट्रवादी =16
भाजप=15
उबाठा शिवसेना =05
कॉग्रेस =02

रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निकाल- (Ratnagiri ZP Election Result 2026)

एकूण जागा : 56 

भाजप- 04

शिंदे शिवसेना - 40

राष्ट्रवादी अजित पवार गट- 5

शिवसेना ठाकरे गट - 6

मनसे -1

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निकाल- (Sindhudurg ZP Election Result 2026)

एकूण जागा- 50
भाजपा - 27 
शिंदे सेना - 14
उबाठा - 3 
अपक्ष - 6

पुणे जिल्हा परिषदेचा निकाल- (Pune ZP Election Result 2026)

एकूण जागा- 73
भाजप -- 10
शिवसेना -- 5
राष्ट्रवादी -- 51
शरद पवार गट --1
ठाकरे गट -- 6
काँग्रेस --0
अपक्ष -- 0

सातारा जिल्हा परिषदेचा निकाल- (Satara ZP Election Result 2026)

एकूण जागा- 65

भाजप - 27 
राष्ट्रवादी - 20
शिवसेना - 15 
काँग्रेस -1
इतर -2

सांगली जिल्हा परिषदेचा निकाल- (Satara ZP Election Result 2026)

एकूण जागा- 61

भाजपा - 16

राष्ट्रवादी अजित पवार - 06

शिंदेसेना - 07

काँग्रेस - 11

राष्ट्रवादी शरद पवार - 18

शिवसेना ठाकरे पक्ष - 01

रयत क्रांती संघटना - 01 

जनसुराज्य शक्ती पक्ष - 01

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल- (Kolhapur ZP Election Result 2026)

एकूण-जागा 68

भाजप - 12
शिवसेना (शिंदे) - 9
राष्ट्रवादी - 20
काँग्रेस -   14
शिवसेना (ठाकरे) - 1
जनसुराज्य - 5
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4

सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल- (Solapur ZP Election Result 2026)

एकूण जागा- 68

भाजपा - 38
राष्ट्रवादी अजित पवार - 11
राष्ट्रवादी शरद पवार - 5
शिवसेना (शिंदे गट) - 8
शेकाप - 3
करमाळा स्थानिक आघाडी - 2
तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल- (Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026)

एकूण जागा- 63
भाजप :   23
शिवसेना :   21
शिवसेना UBT:   9
NCP : 4
NCP SP ; 1
काँग्रेस :   1
वंचित :    00
MIM:  0
अपक्ष : 4 ( 2 भाजप समर्थक, 1 शिंदे समर्थक, 1 प्रहार )

परभणी जिल्हा परिषदेचा निकाल- ( Parbhani ZP Election 2026)

एकूण जागा- 54

भाजप : 24
Ncp:- 15
शिवसेना : 05
शिवसेना UBT: 06
काँग्रेस :   03
वंचित :    00
MIM:  00
अपक्ष :01

धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल- (Dharashiv ZP Election 2026)

एकूण जागा- 55

भाजप - 19
शिवसेना (शिंदे गट) - 15
ठाकरे गट (शिवसेना उ.बा.ठा.) - 7
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) -6
काँग्रेस- 3
अपक्ष - 3
अपक्ष (भाजप पुरस्कृत) - 1
समाजवादी पक्ष - 1

लातूर जिल्हा परिषदेचा निकाल- (Latur ZP Election 2026)

एकूण जागा- 59
भाजप :  18
काँग्रेस : 23
शिवसेना : 01
शिवसेना UBT: 01
NCP अजित पवार : 11
NCP शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02

संबंधित बातमी:

Maharashtra Election : राज्यात भाजप पुन्हा नंबर वन, 'देवेंद्र-रवींद्र'च्या जोडीची निवडणूक विजयाची हॅट्रिक

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget