एक्स्प्लोर

Who Is Madhavi Jadhav: गिरीश महाजनांना नडल्या, नाशिकमध्ये कार्यक्रम सुरु असतानाच गोंधळ घातला; कोण आहेत माधवी जाधव?

Who Is Madhavi Jadhav-Girish Mahajan: प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याने मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.

Who Is Madhavi Jadhav-Girish Mahajan: नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचं नाव न घेतल्याने मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. त्यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या वन कर्मचारी माधवी जाधव (Madhavi Jadhav) आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी केली आहे. दरम्यान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधत पाठिंबा दर्शवला आहे.

नेमकं प्रकरण काय? (Nashik Girish Mahajan)

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव भाषणाच्या दरम्यान का घेतलं नाही?, असा आक्षेप घेतला. या दोन महिलांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ घातला पोलिसांनी तत्काळ या दोघांना ताब्यात घेऊन सरकार वाडा पोलीस ठाण्यात आणले. घटनेनंतर माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींच्या समर्थनार्थ पोलीस स्टेशनच्या बाहेर नागरिकांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलीस यासंदर्भात कारवाई करत आहे. ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी वनरक्षक कर्मचारी महिलांनी केली आहे. 

बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही- माधवी जाधव (Madhavi Jadhav Girish Mahajan)

आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतलं नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही मोठी चूक आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी, असं माधवी जाधव म्हणाल्या.

कोण आहेत माधवी जाधव? (Who Is Madhavi Jadhav)

माधवी जाधव या शासकीय नोकरी करतात. माधवी जाधव सध्या वन विभागात वनरक्षक पदावर आहेत. 2011 साली माधवी जाधव भरती झाल्या होत्या. सध्या सिन्नर येथे माधवी जाधव कार्यरत आहेत. 

गिरीश महाजन काय म्हणाले? (Girish Mahajan On Madhavi Jadhav)

मला आज खूप वाईट वाटले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो, नेते येतात हार घालून निघून जातात. पण मी आमच्या गावात, तालुक्यात जयंतीमध्ये असतो.  मी चाळीस वर्षात एकदा पण असे केले नाही. मी मातंग समाजासाठी, वाल्मिकी समाजासाठी जातो, लग्नात जातो. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभा केला. आता अनवधानाने बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव राहिले असेल पण एवढे कशासाठी? हे मला काही समजत नाही, असं मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले. 

माधवी जाधव यांचा नाशिकमध्ये राडा, गिरीश महाजनांवर टीका, VIDEO:

संबंधित बातमी:

Girish Mahajan: मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो, 40 वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असं कधी झालंय का? गिरीश महाजनांच्या नव्या वक्तव्याने वाद आणखी चिघळला

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Babanrao Taywade on Manoj Jarange Patil: तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Tukaram Mundhe Marathi News: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस...कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
ठाकरे, शिंदे, फडणवीस...तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget