एक्स्प्लोर

LPG Gas subsidy Ujjwala Scheme: घरगुती एलपीजी गॅसबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 4 पर्यंत घटवली

LPG Gas subsidy Ujjwala Scheme: इराण-इस्रायल युद्धाचा फटका आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेलाही बसला आहे. अनुदानित एलपीजी सिलिंडरची संख्या नऊवरून चारपर्यंत कमी करण्याचा मोठा निर्णय

Pradhan Mantri Ujjwala Yojana LPG Gas subsidy: रालोआ सरकारची लोकप्रियता अनेकपटींनी वाढवणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या गेमचेंजर ठरलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत केंद्र सरकारने एक कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, उज्ज्वला योजनेतील (PM Ujjwala Scheme) सवलतीच्या सिलेंडरला (Gas subsidy) आता कात्री लावण्यात आली आहे. परिणामी  उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी 9 ऐवजी आता फक्त 4 सिलेंडरसाठीच 300 रुपये अनुदान मिळेल. सध्याच्या घडीला देशभरात उज्ज्वला योजनेचे 10 कोटी 55 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. 2016 साली पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरु करण्यात आली होती. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी गॅसची किंमत वाढली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांना सध्या प्रति सिलेंडर (Gas Cylinder) 700 रुपये तोटा होत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने अनुदानिक गॅस सिलेंडरची संख्या घटवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे  14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 942 रुपयांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे आता उज्ज्वला योजनेतीला लाभार्थ्यांना 4 अनुदानित गॅस सिलेंडर संपल्यानंतर 942 रुपये मोजून एलपीजी गॅस विकत घ्यावा लागणार आहे.

युद्धामुळे आतापर्यंत एलपीजी 46 टक्क्यांनी महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 642 रुपयांना अनुदानित गॅस सिलेंडर  मिळत होता. त्यासाठी प्रत्येक अनुदानित सिलेंडरमागे केंद्र सरकार 300 रुपये अनुदान देत होते. आता उज्ज्वला योजनेअंतर्गत 642 मध्ये आता वर्षाला 4 सिलेंडरच मिळतील. चारपेक्षा जास्त गॅस सिलेंडर लागल्यास त्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील कुटुंबाना बसण्याची शक्यता आहे. उज्ज्वला योजना सुरु करण्यात आली तेव्हा हा केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणला गेला होता.  या योजनेची प्रचंड जाहिरात आणि गाजावाजा झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना एलपीजी गॅस वापरण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी पारंपरिक पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करण्याचे सोडून एलपीजी गॅसचा वापर सुरु केला होता. मात्र, आता अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या 9 वरुन अवघी 4 इतकी करण्यात आल्याने वर्षभर स्वयंपाकापासून इतर गोष्टी कशा करायच्या, असा प्रश्न या कुटुंबाना पडण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget