Lonavala Politics News: लोणावळा नगरपालिकेत सध्या विकासापेक्षा वादच विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे. एकीकडे निवडणुकीत बहुमत मिळवत सत्ता स्थापन झाली. पण दुसरीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील संघर्षाने आता उग्र रूप धारण केलंय. मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे विकासकामे रखडत असल्याचा आरोप होत असतानाच, नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे (Rajendra Sonawane) आणि नगरसेवकांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकत संताप व्यक्त केलाय. मात्र, यानंतर प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. नगराध्यक्ष सोनवणे यांनी मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष यांचं नातं ‘नवरा-बायकोसारखं’ असल्याचं सांगत, “पालिकेत मुख्याधिकारी बायको बाहेर फिरते आणि लोकप्रतिनिधी नवरा कार्यालयात बसतो,” असं वादग्रस्त वक्तव्य केलंय. या वक्तव्यामुळे प्रशासनातील वातावरण चांगलंच तापलं असून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय.

Lonavala Politics : लोणावळ्यात बायको फिरते बाहेर अन नवरा बसतो घरात...! नगरपरिषदेत पेटला वाद?

एकीकडे सत्तेसाठी धडपड, तर दुसरीकडे अधिकारांच्या संघर्षात अडकलेलं प्रशासन आता प्रश्न एकच लोणावळ्याचा विकास होणार की वादच सुरू राहणार? याकडे लोणावळाकरांचे लक्ष लागले आहे.

Lonavala News : लोणावळा चिक्कीच्या उत्पादनात घट, गॅस टंचाईचा फटका!

लोणावळ्यातील प्रसिद्ध मगणलाल चिक्कीला आखाती युद्धाचा मोठा फटका बसला आहे. कमर्शियल गॅसच्या तुटवड्यामुळे उत्पादनात तब्बल 75 टक्क्यांची घट झाली आहे. युद्धापूर्वी 100 टक्के उत्पादन सुरू असताना, आता केवळ एकाच भट्टीवर काम सुरू ठेवावं लागत आहे. या परिस्थितीचा परिणाम केवळ उत्पादनावरच नाही, तर ग्राहकांवरही होत असल्याचं मगणलाल चिक्कीचे मालक अनंत अग्रवाल यांनी सांगितलं. वाढत्या अडचणींमुळे मागणी असूनही पुरवठा मर्यादित ठेवावा लागत आहे. 

Pune News : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात वनव्यामुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रात्री लागलेल्या वनव्यामुळे संपूर्ण डोंगरात मोठ्या प्रमाणात आग पसरली होती. सकाळपर्यंत डोंगरतील संपूर्ण भागात वणवा पसरून डोंगरातील गवत जळून गेले. मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना रात्री काही काळ धुराच्या समस्येमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. संपूर्ण डोंगरावर पसरलेली आग रात्रीच्या अंधारात विद्युत रोषणाई प्रमाणे दिसत होती. सध्या कोकणात माळराणावर अशा पद्धतीने वनवे लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे जंगलातील वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत असल्याचे समोर येत आहे. जंगलात लागणारे वनवे रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असून शेतकरी देखील चिंतेत आहेत.

 इतर महत्वाच्या बातम्या