Navneet Rana: देशाच्या राजकारणातसध्यागाजत असलेलं महिला आरक्षण विधेयक (Womens Reservation Bill) अखेर लोकसभेत (Loksabha)नामंजूर झालेआहे. सरकारला याविधेयकाच्या बाजूने दोन-तृतीयांश बहुमत मिळाले नाही. तसेच महिला आरक्षण विधेयकासोबतच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही मंजूर होऊ शकले नाही. परिणामी, हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विरोधकांना लक्ष्य करतटीकेचीतोफडागलीआहे. याच मुद्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मोदी सरकारवर टीका करतानाम्हटलेकि आज लोकशाहीचा मोठा विजय झाला आहे. इंडिया आघाडीनं मोदी सरकारचा डाव हाणून पाडला, असे म्हणत महिला आरक्षण विधेयकावरुन हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर कडाडून प्रहार केला. तरदुसरीकडेयाचमुद्यावरप्रतिक्रियादेतानाभाजपनेत्या नवनीत राणा (Navneet Rana) याअतिशयभावूक झाल्याआहेत. लोकसभेमध्ये महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याने नवनीत राणाच्या डोळ्यात अश्रू आलेआहेत.

Continues below advertisement

विरोधकांनी हे विधेयक (Womens Reservation Bill) पास होऊ दिले नाही, त्यामुळे आजचादिवसहा काळादिवस म्हणून आठवणीत राहील. विरोधकांनी विरोध केला पण महिला तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आजचा काळा दिवस हा विरोधकांनी बनवला. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी महिलांना न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना दंडवत. मात्रआम्हीत्यांचीमाफीमागतो, त्यांनाआम्हीपूर्णबहुमतदेऊशकलोनाही. अशीप्रतिक्रियामाजीखासदारनवनीतराणायांनीदिली.

Rohit Pawar : इंडिया आघाडीचा महिला आरक्षणला विरोध नव्हतातर डीलिमिटेशला आम्ही विरोध केला

Continues below advertisement

आम्ही महिला आरक्षण बिलासाठी पाठिंबा दिला होता. मात्र जनगणना होण्याआधी याने अनेकांवर अन्याय झाला असता. महिला आरक्षणला इंडिया आघाडीचा विरोध नव्हतातर डीलिमिटेशला आम्ही विरोध केला, भाजपचा प्रयत्न हणून पडला. कोलकाता आणि तामिळनाडूमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. भाजप यावर 100 टक्के याचे राजकारण करेल, अशीप्रतिक्रियाराष्ट्रवादीशरदपवारगटाचेआमदाररोहितपवारयांनीदिलीआहे.

Sanjay Raut: महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होते,ते कोसळले

तरदुसरीकडेयाचमुद्यावरबोटठेवतशिवसेनाठाकरेगटाचेखासदारसंजयराऊतयांनीदेखीलसरकारवरकडाडूनटीकाकेलीआहे. महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होते,ते कोसळले! अशाशब्दातसंजयराऊतांनीतोफडागलीआहे. मोदी आणि त्यांच्या मंडळाच्या घसरणीची ही सुरुवात आहे. मतदार संघांची हवी तशी मोडतोड करून त्याना सर्व निवडणुका जिंकायच्या होत्या, (महिला आरक्षण नावाखाली) ते मनसुबे संसदेत कोलमडून पडले. मनमर्जीने लोकसभेच्या जागा तर वाढवू शकले नाहीत, पण संविधानाची ताकत आणि स्वतःची खरी कुवत समजून गेली आहे. असेसंजयराऊतयावेळीम्हणाले.

Sanjay Raut on PM Modi : फक्त 16 खासदारांच्या बहुमतावर प्रधानमंत्री पद टिकले

फक्त 16 खासदारांच्या बहुमतावर प्रधानमंत्री पद टिकले आहे, 16 कमी झाले तर झोला घेऊन बाहेर पडावे लागेल. हाच आजच्या घडामोडींचा अर्थ आहे.मोदी लवकरच जात आहेत, लिहून ठेवा. राहुल गांधी यांनी 16 चा फास फेकला आहे. थांबा आणि वाट पहा! असेहीसंजयराऊतम्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या