मोदीजी, आम्हाला माफ करा! महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच नवनीत राणांना अश्रू अनावर, तिकडे संजय राऊत म्हणाले...
Navneet Rana : लोकसभेमध्ये महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याने भाजप नेत्या नवनीत राणा या अतिशय भावूक झाल्या आहेत. प्रतिक्रिया देताना नवनीत राणाच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.

Navneet Rana: देशाच्या राजकारणात सध्या गाजत असलेलं महिला आरक्षण विधेयक (Womens Reservation Bill) अखेर लोकसभेत (Loksabha) नामंजूर झाले आहे. सरकारला याविधेयकाच्या बाजूने दोन-तृतीयांश बहुमत मिळाले नाही. तसेच महिला आरक्षण विधेयकासोबतच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही मंजूर होऊ शकले नाही. परिणामी, हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विरोधकांना लक्ष्य करत टीकेची तोफ डागली आहे. याच मुद्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटलेय कि आज लोकशाहीचा मोठा विजय झाला आहे. इंडिया आघाडीनं मोदी सरकारचा डाव हाणून पाडलाय, असे म्हणत महिला आरक्षण विधेयकावरुन हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर कडाडून प्रहार केला. तर दुसरीकडे याच मुद्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) या अतिशय भावूक झाल्या आहेत. लोकसभेमध्ये महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याने नवनीत राणाच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.
विरोधकांनी हे विधेयक (Womens Reservation Bill) पास होऊ दिले नाही, त्यामुळे आजचा दिवस हा काळादिवस म्हणून आठवणीत राहील. विरोधकांनी विरोध केला पण महिला तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आजचा काळा दिवस हा विरोधकांनी बनवलाय. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी महिलांना न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना दंडवत. मात्र आम्ही त्यांची माफी मागतो, त्यांना आम्ही पूर्ण बहुमत देऊ शकलो नाही. अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली.
Rohit Pawar : इंडिया आघाडीचा महिला आरक्षणला विरोध नव्हता तर डीलिमिटेशला आम्ही विरोध केला
आम्ही महिला आरक्षण बिलासाठी पाठिंबा दिला होता. मात्र जनगणना होण्याआधी याने अनेकांवर अन्याय झाला असता. महिला आरक्षणला इंडिया आघाडीचा विरोध नव्हता तर डीलिमिटेशला आम्ही विरोध केला, भाजपचा प्रयत्न हणून पडला. कोलकाता आणि तामिळनाडूमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. भाजप यावर 100 टक्के याचे राजकारण करेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
Sanjay Raut: महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होते,ते कोसळले
तर दुसरीकडे याच मुद्यावर बोट ठेवत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सरकारवर कडाडून टीका केली आहे. महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होते,ते कोसळले! अशा शब्दात संजय राऊतांनी तोफ डागली आहे. मोदी आणि त्यांच्या मंडळाच्या घसरणीची ही सुरुवात आहे. मतदार संघांची हवी तशी मोडतोड करून त्याना सर्व निवडणुका जिंकायच्या होत्या, (महिला आरक्षण नावाखाली) ते मनसुबे संसदेत कोलमडून पडले. मनमर्जीने लोकसभेच्या जागा तर वाढवू शकले नाहीत, पण संविधानाची ताकत आणि स्वतःची खरी कुवत समजून गेली आहे. असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
Sanjay Raut on PM Modi : फक्त 16 खासदारांच्या बहुमतावर प्रधानमंत्री पद टिकलेय
फक्त 16 खासदारांच्या बहुमतावर प्रधानमंत्री पद टिकले आहे, 16 कमी झाले तर झोला घेऊन बाहेर पडावे लागेल. हाच आजच्या घडामोडींचा अर्थ आहे.मोदी लवकरच जात आहेत, लिहून ठेवा. राहुल गांधी यांनी 16 चा फास फेकला आहे. थांबा आणि वाट पहा! असेही संजय राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या





















