Local Body Elections Dilip Walse Patil: आयोगाने नव्हे तर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने निवडणुकीच्या तारखा केल्या जाहीर? म्हणाले, 15 डिसेंबरला जिल्हा परिषद अन् महापालिका...
Local Body Elections Dilip Walse Patil: निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. इच्छुक उमेदवारांनी मात्र जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

Local Body Elections Dilip Walse Patil: राज्यात मतचोरीविरोधातील ऐल्गार सभा रंगत असतानाच माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकींच्या (Local Body Elections) संभाव्य तारखाच जाहीर केल्या आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Local Body Elections Dilip Walse Patil: काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वळसे पाटील म्हणाले, मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. आमच्याकडील माहितीनुसार 5 नोव्हेंबर रोजी नगरपालिका,नगरपंचायत निवडणूक जाहीर होतील तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदान होईल आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान होईल आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करत वळसे पाटलांनी निवडणूकांचे वेळापत्रकच जाहीर केले आहे. तर दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचना देखील या मेळाव्यात दिल्या.
Local Body Elections Dilip Walse Patil: वळसे पाटलांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मात्र, निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. इच्छुक उमेदवारांनी मात्र प्रचाराची तयारी सुरू केली असून भेटीगाठी, दौरे आणि कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. महायुती किंवा महाविकास आघाडी होणार की नाही, याची वाट न पाहता अनेकांनी थेट प्रचारयुद्धाला सुरुवात केली आहे. निवडणुकीचं अधिकृत वेळापत्रक निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केलेलं नसतानाही दिलीप वळसे पाटलांच्या ‘अंदाजे’ वेळापत्रकामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या



















