Laxman Hake: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (Republic Day 2026) एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री ज्या महामानवाने या देशाला संविधान दिलं त्या महामानवाच्या नावाचा उच्चार करत नसेल तर? गिरीश महाजनांनी अक्षम्य चूक केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जर तुम्ही बाबासाहेबांविषयी (Dr Babasaheb Ambedkar) बोलणार नसाल तर तुम्ही नतदृष्ट आहात. कारण तुम्ही पालकमंत्री म्हणून घ्यायचे आणि या मिनिस्ट्रीमध्ये काम करायच्या लायकीचे नाहीत. अशाशब्दांत ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते आणिमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर हल्लाबोलकेलाआहे. (Laxman Hake criticism on Girish Mahajan)
प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2026) शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे नाव न घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला वन अधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेत, “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात?” असा थेट सवाल केल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनाहीबोचरीटीकाकरतथेटलायकीकाढलीआहे.
Laxman Hake: जे पोटामध्ये आहे ते तुमच्या ओठावर आलं, आपली चूक मान्य करा
महाजन साहेब, तुम्ही जर बाबासाहेबांचे नाव घेणार नसाल तर ही चिंता करण्याची गोष्ट आहे. या भाजपने घटनेची पायमल्ली करण्याचे काम सुरू ठेवलं आहे. पक्ष फोडणे, लोकांना विकत घेणे, हे असं असंवैधानिक कामतुम्ही करत आहात. जे पोटामध्ये आहे ते तुमच्या ओठावर आलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही ते दाखवून दिलं, तुम्ही आपली चूक मान्य करा, असेही लक्ष्मण हाकेंम्हणालेत.
Laxman Hake on Sharad Pawar : महानगरपालिकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला नारळही फोडता आला
परभणी जिल्ह्यातील होत असलेल्या निवडणुकांसाठी ओबीसी बांधवांना साथ देण्यासाठी मी जात आहे. पुणेपिंपरी चिंचवड यासह 27 महानगरपालिकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला नारळही फोडता आला नाही. अजित पवारांनाही या निवडणुकीत तुटपुंजी प्रमाणात यश मिळालंय. छगन भुजबळ यांची अनुपस्थिती आणि धनंजय मुंडे यांना बाजूला करून बजरंग सोनवणे आणि क्षीरसागर यांना जवळ केल्याने ओबीसी बांधवांनी यावर लक्ष ठेवले होते आणि याचाच मोठा फटका अजित पवारांना बसला. असेही लक्ष्मण हाकेम्हणालेत.
Girish Mahajan: काय आहे प्रकरण?
दरम्यान, नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याबाबत वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. “भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा सवाल त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित करत मंत्री महाजन यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर या दोघींच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली केली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत.
आणखी वाचा
