जालना : सध्याचे सत्ताधारी लोकशाहीला मानत नाहीत आणि विरोधक विरोधकांची भूमिका नीट पार पाडत नाहीत. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janta Party) माध्यमातून तरूणांच्या मनातील भडास व्यक्त होत असल्याचं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलं. एका क्लिकवर जग एकत्र आलं आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना घरी बसवायला तरुण (Gen Z) मागे पुढे बघणार नाहीत असंही ते म्हणाले. सावध व्हा, नाहीतर तुमचा करेक्ट कार्यक्रम करतील, असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. 

Continues below advertisement

तुम्ही Gen Z ला समजून घेतलं नाही, तर तुमच्यावर सुनामी येईल. ही सुनामी समुद्रातून येईल, आभाळातून येईल की अजून कुठल्या मार्गाने येईल, याची तुम्ही कल्पना करू शकत नाही, असा इशारा यावेळी लक्ष्मण हाके यांनी दिला. तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डचे राजकारण करत असाल, तर ग्रामीण भागामध्ये काय चालू आहे, दीन-दलित, भटक्या-विमुक्त आणि शेतकऱ्यांचे काय चालू आहे, याचाही विचार करा, असा सल्ला त्यांनी दिला.

लक्ष्मण हाके म्हणाले की, "Gen Z ला सिव्हिक सेन्स द्या. त्यांच्याकडे सिव्हिक सेन्स (Civic Sense) नसेल तर इथे लोकशाही, मतदान आणि सत्ता परिवर्तन राहिले बाजूला... नेपाळमध्ये ज्या पद्धतीने उठाव आणि क्रांती झाली, त्याच पद्धतीने हा देशदेखील क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा राहील. तरुण जनरेशनला समजून घ्या."

Continues below advertisement

लक्ष्मण हाके म्हणाले की, "लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली वर्षाला 30-35 हजार कोटी देता. पण तरुणांच्या हाताला रोजगार आणि नोकरी तुम्ही देऊ शकत नाहीत. या तरुणांना बेरोजगार ठेवलं, डिजिटल मीडिया हातात असणाऱ्यांना तुम्ही बेरोजगार ठेवलं, तर क्रांती अटळ आहे. हा देश क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे."

Cockroach Janta Party : काय आहे प्रकरण?

कॉकरोच जनता पार्टी हे नाव सध्या सोशल मीडियासह सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. अवघ्या तीन ते चार दिवसात कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टाग्रामवर 15 मिलियन्स फॉलोअर्स झाले आहेत.कॉकरोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपलाही मागे टाकलं आहे. मूळच्या हिंगोलीच्या अभिजीत दीपके याचा संस्थापक आहे. अभिजीत दिपके सध्या उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेमध्ये राहतोय. 

देशातील वाढती बेरोजगारी, परीक्षांमधील घोटाळे आणि तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी चारच दिवसांपूर्वी या उपरोधिक चळवळीची सुरुवात करण्यात आली. सोशल मीडियावर लोकप्रियता मिळालेल्या या कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगारांना कॉकरोच म्हटल्याचं एक वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं आणि त्यानंतर या चळवळीला सुरुवात झाली. 

ही बातमी वाचा: