Laxman Hake बीड : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हाके यांच्या अडचणी वाढल्या आहे. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा असून या व्हायरल व्हिडिओनंतर लक्ष्मण हाकेंवर (Laxman Hake)  सडकून टीका होत असल्याचे चित्र आहे. अशातच या प्रकरणावर आता स्व:त लक्ष्मण हाकेंनी स्पष्टीकरण देत हा खोडसाळपणा असल्याचे सांगितलंय. शिवाय हा व्हिडिओ आपला नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

Continues below advertisement

व्हायरल व्हिडिओ नेमकं काय?

सध्या ओबीसी समाजाचे नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे आले आहे. ही माळी समाजाची पोटदुखी आहे. भुजबळांनी कोणाला मोठे होऊ दिले नाही, अशा पद्धतीचे वक्तव्य करताना लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमात वायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे हाके यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यामुळे ओबीसी एकजूट चळवळीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओनंतर हाके यांनी तात्काळ खुलासा करीत हा व्हिडिओ म्हणजे खोडसाळपणा असल्याचा दावा केला आहे. ओबीसीमध्ये फुट पाडण्याचा हा प्लॅन आहे. याला कोणत्याही ओबीसी बांधवांनी बळी पडू नये, असे आवाहनही हाके यांनी केले आहे.

'तो' व्हिडियो एआयचा वापर करून बनवला- लक्ष्मण हाके

पुढे बोलताना हाके म्हणाले कि, तो व्हिडियो एआयचा वापर करून बनवला गेला असून मी काय आहे, हे सर्व ओबीसी समाजाला माहित असल्याचे हाके यांनी सांगितले आहे. भुजबळ साहेबांसोबत माझं सकाळी बोलणे झाले असून त्यामुळे मला मॉरल सपोर्ट मिळाला आहे. मी छगन भुजबळ यांना आदर्श मानतो. माझं आणि भुजबळ साहेबांचं काय नात आहे, हे भुजबळ साहेबांना माहीत आहे, असं देखील हाके म्हणाले. असे फेक व्हिडियो पसरवून ओबिसी दुभंगनार नाहीये. दोन-चार विघ्नसंतोष लोक आहेत. मी डिपार्टमेंटशी याबाबत बोललो. वेळ पडली तर त्या चार लोकांबाबत प्रेस घेईन, असंही हाके म्हणाले.

Continues below advertisement

.....तर ते सहन केल जाणार नाही- लक्ष्मण हाके

मी चूक केली नाही, माफी मागायचा प्रश्न नाही. नवनाथ वाघमारे हे माझे सहकारी आहेत. काहीं गैरसमज झाला असेल तर त्यांच्याशी बोलेन. आमच्यात काही तरी भांडण लावून कोणी ही लढाई थांबू पाहत असेल तर ते सहन केल जाणार नाही. असेही हाके म्हणाले.

हेही वाचा