Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 'चलो दिल्ली'चा (Delhi) नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर हे अधिवेशन होणार असून लवकरच अधिवेशनाची तारीख करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
दिल्लीत जा, मंडल आयोगाला चॅलेंच करा, जर महाराष्ट्रात परत आला तर माझं नाव दुसरं, तसेच दिल्लीचे तख्त हे होळकर, शिंदे यांनी गाजवले आहे. दिल्लीत काय खाऊ पेंड आहे का? तुम्हाला कोण सल्ले देत आहे? त्यांना विचारा देशाच्या लोकसंख्येत तुमची किती संख्या आहे? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे.
सगळ्या क्षेत्रात मराठा समाज
लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसीचे आरक्षण संपवणारा GR असून त्याचा निषेध करण्यासाठी हिंगोलीत मोर्चा झाला. महाराष्ट्रात तालुके किती आहे आणि मुंबईत किती लोक येतील, याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी. मराठा समाजाच्या किती शिक्षण संस्था आहे? ओबीसीच्या मुलांनी टीसी काढावी का? ओबीसीच्या कुठल्या नेत्याने कुठं मराठा आरक्षणाला विरोध केला आहे? सगळ्या क्षेत्रात मराठा समाज आहे. आम्हाला ब्राह्मणांची भीती घातली. ब्राह्मण, ब्राह्मणोत्तर चळवळ उभी केली. सगळं मराठा समाजाकडे अव्वल क्षेत्र हातात ठेवले. सत्ता ओरबाडून खाण्याचे काम हे यांच्याकडे ठेवले तर मग हे मागास कसे झाले? असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
दिल्लीत काय खाऊ पेंड आहे का?
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, जी प्रमाणपत्र वाटली ती सगळी बेकायदा आहेत. ओबीसीचे आरक्षण महाराष्ट्रात टिकले पाहिजे. मराठा समाजाचे ओबीसीकरण झाले आहे. आयोगाला, न्यायालयाला हे आरक्षण मान्य नाही. मराठा समाज ही राज्यकर्ती जमात आहे. त्यांना मागासमध्ये टाकायचं हे न उलगडणार कोड आहे. त्यांनी उपोषण केले, सरकारचे शिष्टमंडळ भेटायला आले, ओबीसीचं आरक्षण संपवायचे म्हणून असा जीआर काढण्यात आला. तुम्ही संविधानाची भाषा बोला. कायदा काय बोलतो हे बोला. तुम्हाला सर्वोच्च न्यायालय, मुंबई हायकोर्ट, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे निर्णय मान्य नाही म्हणून आम्हाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागलं. आम्ही 60 टक्के आहोत. मुंबईचा प्रत्येक रस्ता आता पॅक होईल. दिल्लीत जा, मंडल आयोगाला चॅलेंज कर, दिल्लीचे तख्त हे होळकर, शिंदे यांनी गाजवले. दिल्लीत काय खाऊ पेंड आहे का? असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
आणखी वाचा
