Laxman Hake : राज्यात होत असलेल्या जनगणनेच्या अनुषंगाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) महाराष्ट्रात 100 सभा घेणार असून या सभा दोन टप्प्यात असणार आहेत. यानिमित्त राज्यात ओबीसी जोडो अभियान राबवणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये सांगितले आहे. राज्यातील सभा पार पडल्यानंतर देश पातळीवर ओबीसींची नॅशनल कॉन्फरन्स होणार आहे. जातनिहाय जनगणना होत असली तरी त्यात जातीचा रकाना नाही. त्यामुळे जातनिहाय जनगणना होण्यासाठी राज्यात ओबीसींना (OBC) जागृत केले जाणार आहे.

Continues below advertisement

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी यावेळी पवार कुटुंब आणि मनोज जरांगे पाटील यांना देखील लक्ष केले. 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील, अशी बारामतीकरांची इच्छा असल्याचं जय पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री पदासाठी 288 पैकी 150 पेक्षा जास्त आमदार लागतात. मात्र पवार साहेबांना आणि दादांना देखील ते जमलं नाही. जय पवार यांना जमत असेल तर त्यांना शुभेच्छा देतो. असेहीतेयावेळीम्हणाले.

Laxman Hake : पवार कुटुंब सत्ते शिवाय जगू शकत नाही

Continues below advertisement

पवार कुटुंब सत्ते शिवाय जगू शकत नाही. रोहित पवार यांनी विरोधात भांडायचं आणि दादाच्या कुटुंबाने सत्तेत मांडीला मांडी लावून पद भोगायची. हा उद्योग पवार कुटुंबाचा असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली. तर मनोज जरांगे पाटील यांना लक्ष करत अशिक्षित माणसाच्या मागण्याला सरकार बळी पडलं. ओबीसी आरक्षण जरांगे नावाच्या येडपट माणसामुळे देऊन टाकले, हा खूप मोठा द्रोह केला. याबाबत मात्र कोणताही ओबीसी नेता बोलला नाही. असे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. तर थलपती मुख्यमंत्री झाले आणि इकडे परत जरांगे पाटील यांना स्वप्न पडत आहेत. जरांगे पाटील पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे म्हणत हाकेंनी जरांगे पाटलांना डिवचले.

 Jay Pawar: नेमकंकाय म्हणालेजयपवार?

अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं ही बारामतीकरांसह राज्यातील अनेकांची इच्छा होती, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याने ती इच्छा अपूर्ण राहिली. मात्र, आता सुनेत्रा पवार ह्याच मुख्यमंत्री बनून दादांची इच्छा पूर्ण करतील अशी आशा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि बारामतीकर बाळगत आहेत. त्यातच, आज जय पवार यांनी 2029 मध्ये सुनेत्रा पवार ह्याच बारामतीच्या उमेदवार असतील हे स्पष्ट केले, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या उमदेवार म्हणून त्या निवडणूक लढवती अशी आम्हाला आशा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

इतर महत्वाच्या बातम्या