Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: राज्यात 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र त्याआधी एक महत्वाची राजकीय घडामोड घडली आहे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तब्बल 38 अपक्ष उमेदवार आज शिवसेना शिंदे गटात (Shivsena Shinde Group) प्रवेश करणार आहेत. (Latur Municipal Corporation Election 2026)

एकाचवेळी भाजप आणि काँग्रेसला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लातूरमध्ये मोठी खेळी केल्याचं दिसून येत आहे. तब्बल 38 अपक्ष उमेदवारांचा आज शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. 

लातूर महानगर पालिका निवडणूक -2026 (Latur Municipal Corporation Election 2026)

एकूण प्रभाग 18 - जागा 70

भाजप - 70 सर्व जागा स्वतंत्र लढत आहे. 

काँग्रेस  - 65 वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करून 70 पैकी 65 जागेवर काँग्रेस पाच जागेवर वंचित बहुजन आघाडी

वंचित - 05

राष्ट्रवादी अजित पवार गट - 60  दहा जागेवर पुरस्कृत उमेदवार देणार...अशाच 70 जागा लढत आहे (उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल)

राष्ट्रवादी शरद पवार गट - 17 जागेवर अधिकृत उमेदवार आहेत.. स्वतंत्र लढत आहे. 

शिवसेना शिंदे - 11 जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत..स्वतंत्र लढत आहे. 

शिवसेना ठाकरे - 09 जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत..स्वतंत्र लढत आहे.

MIM -09 जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत..स्वतंत्र लढत आहे.

लातूर महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत काय घडलं? (Latur Mahanagarpalika Election 2017)

2014 मध्ये राज्य व देशात भाजपाची सत्ता आल्यानंतर राजकीय वातावरण बदलले होते. त्याचा थेट फायदा लातूर भाजपाला झाला. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूरमध्ये सत्तांतर झाले. भाजपाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 36 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसला 31 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना खाते उघडता आले नव्हते.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

लातूर महानगरपालिकेत 18 प्रभागांतील 70 जागांसाठी रणसंग्राम, काँग्रेसह भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी