Kishori Pednekar Shivsena UBT Group Leader मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar ) यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बैठकीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव केला होता. (Kishori Pednekar Shivsena UBT)

Continues below advertisement

गटनेतेपदी शिवसेना ठाकरेंच्या पक्षाकडून महापालिकेत विविधपदे भूषवलेल्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव यांची नावे पुन्हा चर्चेत होती. मात्र बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation Election Result 2026) भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1, समाजवादी पार्टीला 2 जागा जिंकल्या. 

महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला- (Maharashtra Municipal Corporation Mayor Reservation)

सर्व 29 महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे. 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे 22 जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल. (Maharashtra Municipal Corporation Mayor Reservation)

Continues below advertisement

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप - 89शिवसेना ठाकरे गट - 65शिवसेना - 29काँग्रेस - 24 मनसे - 6 एमआयएम- 8 एनसीपी - 3 एसपी - 2 एनसीपी शप - 1 --------------एकूण- 227

संबंधित बातमी:

BMC Mayor 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?; RTI कार्यकर्ते अनिल गलगलींनी सगळं सांगितलं!