Kishor Tiwari On Bacchu Kadu : बच्चू कडू जरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाएल्गार (Bacchu Kadu Farmer Protest) मोर्चा घेऊन नागपुरात येत असले तरी विदर्भातील दुसरे शेतकरी नेते आणि वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी बच्चू कडू यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनच्या राज्यमंत्री दर्जाच्या ज्या पदावर मी होतो, माझ्या नंतर ते पद बच्चू कडू यांना हवं होतं, मात्र सरकारने ते दिलं नाही, म्हणून बच्चू कडू (Bacchu Kadu) सरकार विरोधात रान उठवत आहे. असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी बच्चू कडूंवर तोफ डागली आहे.

Continues below advertisement

Kishor Tiwari : ...मात्र बच्चू कडू कधीही तिथे गेले नाही

दिल्लीत किसान आंदोलनामध्ये अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, मात्र बच्चू कडू कधीही तिथे गेले नाही. बच्चू कडू राज्याचे शिक्षण राज्य मंत्री होते. सरकारमध्ये राहताना जे जे गद्दार झाले, त्यामध्ये विदर्भाचा लाडका पुत्र बच्चू कडू हे हि होते. यंदा 40% पीक कर्ज पुरवठा झाला आहे. अशा स्थितीत 100% कर्ज पुरवठा व्हावं यासाठी बच्चू कडू कोणते ही आंदोलन न करता बँका पीक कर्ज वाटप करत असल्याच्या काळात पीक कर्ज माफीचा आंदोलन करतात. यामुळे शेतकरी आत्महत्येचा दारावर पोहोचत आहे. असेही किशोर तिवारी म्हणाले.

Continues below advertisement

Kishor Tiwari On Bacchu Kadu : बच्चू कडू चांगले कार्यकर्ते, मात्र शेती बद्दल अज्ञानी

बच्चू कडू चांगले कार्यकर्ते असले, तरी शेती बद्दल अज्ञानी आहे, कृषी संकटाबद्दल त्यांना काहीही समजत नाही. बच्चू कडू कधीही कोणताही आंदोलन सुरू केल्यानंतर काही दिवसांनी गुंडाळून देतात. बच्चू कडू पंचतारांकित, सप्ततारांकित हॉटेलमध्ये राहतात. उद्धव ठाकरे सरकार मध्ये शिक्षण राज्यमंत्री असताना शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन आणण्याच्या मागे न लागता, शिक्षण संस्था चालवणाऱ्यांशी संपर्क करून पैसे उकळायचे धंदे करता, हे चुकीचे आहे. शेतकरी नेते जेव्हा चुकीच्या मागण्या करतात तेव्हा दुःख होतो. शेतकऱ्यांना कर्जमाफी आवडते मात्र त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही. असेही ते म्हणाले.

आणखी वाचा