एक्स्प्लोर

Vidip Jadhav: सातारचा रांगडा गडी, अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Vidip Jadhav: विदीप जाधव यांनी राज्यासाठी दिलेले बलिदान आणि कुटुंबाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता, त्यांच्या पत्नीला मानवतावादी दृष्टिकोनातून 'विशेष बाब' म्हणून शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव (Vidip Jadhav) यांच्या पत्नीला शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी आग्रही मागणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे निष्ठावान अंगरक्षक विदीप जाधव (Vidip Jadhav) यांचेही निधन झाले. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अनिल देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव या विदीप जाधव यांच्या मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीदरम्यान जाधव कुटुंबाने विदीप यांच्या पत्नीच्या नोकरीबाबतची कैफियत मांडली होती. तसे पत्र सुध्दा संध्या जाधव यांनी अनिल देशमुख यांना दिले होते. (Vidip Jadhav)

अनिल देशमुख यांच्या पत्रातील प्रमुख मागण्या

विदीप जाधव यांच्या पत्नी श्रीमती संध्या जाधव या सध्या 'छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा (ठाणे)' येथे 'औषध निर्माण अधिकारी' (Pharmacist) म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती २०२० मध्ये 'कोविड भरती' अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती.

कायमस्वरूपी नियुक्तीची मागणी: विदीप जाधव यांनी राज्यासाठी दिलेले बलिदान आणि कुटुंबाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता, त्यांच्या पत्नीला मानवतावादी दृष्टिकोनातून 'विशेष बाब' म्हणून शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे. 

पात्रता आणि अनुभव: संध्या जाधव यांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांनी कोविडच्या कठीण काळात दिलेली रुग्णसेवा विचारात घेऊन हा निर्णय घेण्याची विनंती पत्रात करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या प्रतिलिपी: अनिल देशमुख यांनी या पत्राच्या प्रतिलिपी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्तांना देऊन या प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. "स्व. विदीप जाधव यांनी दिलेली दीर्घकालीन सेवा आणि त्यांच्या कुटुंबावर ओढवलेला हा आघात लक्षात घेता, त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत स्थैर्य देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन तातडीने आदेश द्यावेत," अशी भावना अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

2009 च्या बॅचचे पोलीस हवालदार

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विदीप जाधव हे 2009 च्या बॅचचे कॉन्स्टेबल होते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील लोणंद गावचे रहिवासी. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ते परिचित होते. विमान दुर्घटनेतील त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि सहकाऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या प्रचार बैठकांसाठी अजित पवार आज बारामतीला जात असताना ही दुर्घटना घडली.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

Embed widget